आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अचानक गायब झालेल्या या पंतप्रधानांचा शोध अजूनही लागला नाहीये!


तुम्हाला कदाचित हे ऐकून किंवा वाचूनच बऱ्यापैकी आश्चर्य वाटेल किंवा उत्सुकता अशी निर्माण होईल की, असंही होऊ शकतं का? किंवा असं खरचं झालयं का? तर त्याच उत्तर “हो” आहे. कारण जगातला एखादा असा पंतप्रधान आजवर घडून गेगेला आहे जो अगदी रहस्यमय पद्धतीने गायब झाला होता. आणि नंतर कधीच त्याचा शोधमात्र काही केल्या लागलाच नाही.

तसं म्हटलं तर आजवर जगभरातील विविध होऊन गेलेले पंतप्रधान त्यांच्या काही ना काही विशिष्ट प्रकारच्या भुमिका, काम अथवा इतर काही बाबींमुळे ओळखल्या गेलेले आढळून येतात. परंतु इथे गोष्ट मात्र जरा वेगळीच पहायला मिळते आहे. एक गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीने पाकिस्तानने त्यांचे पंतप्रधान असलेल्या जुल्फिकार अली भुट्टो यांना थेट मध्यरात्रीच्या २ वाजेच्या सुमारास फाशीवर लटकावलं, त्याचप्रमाणे एक असेही पंतप्रधान होऊन गेले की ज्यांचा शोध अजूनही लागलेला नाही.पंतप्रधान

चला तर मग जरा आपण अशा खास अनोख्या पंतप्रधानाबद्दल थोडसं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. हे पंतप्रधान होते ते म्हणजे, ऑस्ट्रेलिया या देशाचे. सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मताधिक्य मिळवत यांनी ऑस्ट्रेलियावर आपला पंतप्रधानपदाचा विजय प्रस्थापित केला होता. “हेरोल्ड एडवर्ड होल्ट” असं या पंतप्रधानांच नाव आहे. १९६६ सालात त्या काळचे ऑस्ट्रेलियाचे आधीचे पंतप्रधान निवृत्त झाल्यावर होल्ट यांना निवडणुका लढवणं आणि एकहाती विजय मिळवणं सोप्प राहिलं होतं.

new google

हेरोल्ड यांना खरतरं पोहणे आणि मासे पकडणे यांची प्रचंड प्रमाणात आवड होती. त्यांच्या विविध ठिकाणच्या आवडीच्या अनेक गोष्टी आजही ऑस्ट्रेलियात संग्रहीत म्हणून जमा आहेत. १९०८ या सालात ५ ऑगस्ट रोजी होल्ट यांचा जन्म झाला. न्यू साऊथ वेल्स येथे जन्म झालेले हेरोल्ड हे त्यांच्या कुटूंबातील मोठे भाऊ होते. आश्चर्याची बाब म्हणजे ज्यावेळी हेरोल्ड यांचा जन्म झाला त्याच्या केवळ ६-७ महिने आधी त्यांच्या आई-वडीलांच लग्न झालं होतं. हेरोल्ड यांच्या जन्माच्या तब्बल दोन वर्षानंतर त्यांचा छोटा भाऊ असलेला क्लिफोर्ड या जगात आला.

पंतप्रधान

ऑस्ट्रेलियाला नाईलाजाने त्यांच्या पंतप्रधानांना अधिकारीक मुद्यावर मृत घोषित करण्याची वेळ १९६७ सालात ओढावली. त्याला कारणदेखील तसंच काहीसं ठरलं होतं. आश्चर्याची बाब म्हणजे आपली पोहण्याची आवड असलेली गोष्टच पंतप्रधान हेरोल्ड यांच्या अचानक गायब होण्याला कारण ठरली. हेरोल्ड हे १९६७ मधे विक्टोरिया या बिचवर पोहायला गेलेले असताना नेमके अचानक गायब झाले.

तमाम ऑस्ट्रेलियाने त्यांच्या प्रिय पंतप्रधानांची शोधमोहीम राबवली, सर्व प्रयत्न करूनही कधीच कुठेही त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. गायब झाल्याच्या तीन दिवसांनंतर त्यांना मृत घोषित केल्या गेलं परंतु त्यांच शव मात्र अजूनही मिळालेलं नाही. आज अगदी रहस्यमय पद्धतीने गायब झालेल्या या पंतप्रधानांच्या अनेक नानाविध प्रकारच्या कथा ऑस्ट्रेलियात ऐकायला मिळतात.

अनेकांच्या मते एलियन येऊन त्यांना घेऊन गेले, काहींच्या मते त्यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला, काहींना वाटतं की एखाद्या मोठ्या शार्कसारख्या बलाढ्य माशाने त्यांचा काटा काढला असावा परंतु साऱ्या गोष्टी कितीही म्हटलं तरी अनुत्तरीत राहतात. जगातल्या एकमेव गायब झालेल्या या पंतप्रधानांची गोष्ट काहीशी नवल आणि खंत वाटावी अशीच आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

हेही वाचा: जगाला सुगंधित करणाऱ्या परफ्यूमचा इतिहास सुद्धा तेवढाच सुगंधित करणारा आहे..!

या मुलीने गाढवाच्या दुधापासून सुरु केलेला हा व्यवसाय आज जगभरात प्रसिद्ध आहे…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here