आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

चार्ल्स चक: अवघ्या 30 सेकंदात 16 शत्रुंचे धडाधड डोके उड़वनारा स्नाइपर


चित्रपटांमध्ये आपण अगदी एक से बढ़कर एक स्नाइपर बघतो. साधारणपणे बॉलीवुड च्या चित्रपटात आपन नेहमी हेच बघतो की विलनच्या विरोधात साक्ष देण्यासाठी एखादा सरकारी वकीलबाबू किंवा माफीचा साक्षीदार कोर्टमध्ये जाण्यापुर्वी विलन एखाद्या प्रोफेशनल स्नाइपरला पैसे देतो आणि त्याला गोळी  घालून ठार करायला सांगतो. तेवढाच काय तो आपल्याला स्नाइपर माहिती.

पण खऱ्या  आयुष्यात हे स्नाइपर किती चपळ आणि हुशार असतात याचा तुम्हाला आजच्या लेखातून अंदाज येईलच. अगदी तसुभरही न हलता तासनतास एका जागी बसणे, रायफलच्या ट्रिगरवर बोट ठेवणे आणि रायफलवर बसविलेल्या स्कोपच्या सहाय्याने शत्रुवर एकटक नजर ठेवणे आणि शत्रु दिसताच क्षणाचाही विलंब न करता गोळी घालणे हे काम फ़क्त प्रोफेशनल स्नाइपरच करू शकतात.

Sniper Pictures | Download Free Images on Unsplash

new google

मित्रांनो आजच्या आर्टिकल मध्ये आपण एका अशा स्नाइपरविषयी बोलणार आहोत ज्याच्या शौर्याला आणि साह्साला तुम्ही देखील सलाम कराल. कारण साधारणतः सैनिकांनी शत्रुचा बंदुकीच्या सहाय्याने फडशा पाडलेल्या अनेक साहसकथा आपण ऐकल्या आहेत. पण अशी कथा क्वचितच ऐकली असेल की एका सैनिकाने काही तासात नाहीं तर अवघ्या काही सेकंदात 16 शत्रुंचे डोके उडवले. होय! चार्ल्स चक नावाच्या अमेरिकी स्नाइपरने चक्क 30 सेकंदात 16 शत्रुना कंठस्नान घातले होते.

व्हिएतनाम युद्धामध्ये अमेरिकन सैनिकांना जंगलात काहीही दिसले नाही, तेथे चार्ल्स शत्रूचा शोध घेतहोता आणि त्याला ठार मारत होता.

व्हिएतनामच्या युद्धामध्ये अमेरिकन सैनिकांना जंगलात जिथे काहीही दिसले नाही, तिथे चार्ल्स चक शत्रूचा शोध घेत होता आणि त्याला ठार मारत होता. याच खतरनाक स्नाइपर विषयी आज आपन जानुन घेउया की चार्ल्सने स्वतःला युद्धासाठी कशा प्रकारे तयार केले ज्यामुले अमेरिकेतल्या सर्वाधिक धोकादायक स्नाइपर मध्ये त्यांचे नाव लिहिल्या गेले.

वडिलांचे अनुकरण करत सैन्यात दाखल .

अमेरिकेत वाढलेल्या, चार्ल्सचे वडील सैन्यात नोकरी करत होते. वडीलांप्रमाने एक दिवस आपल्याही अंगावर
लष्करी गणवेश असेल अशी सैन्याची स्वप्ने बघत चार्ल्सचे बालपण गेले. त्याचे वडील दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेच्या वतीने लढले होते. वडीलांसारखी आपल्या देशासाठी युद्धाला जाण्याची संधी मिळायला हवी अशीही चार्ल्सची इच्छा होती.त्यासाठी सैन्यात भरती होण्याशिवाय त्याच्याकड़े दुसरा उत्तम मार्ग नव्हता. म्हणूनच चार्ल्सने स्वतःलालहानपणापासूनच सैन्यासाठी तयार करण्यास सुरवात केली. चार्ल्सने नुकतीच १९६७ मध्ये शाळा पूर्ण केली होती की लगेच त्याने मरीन ट्रेनिंगमध्ये प्रवेश घेतला. आणि म्हणतात न ‘ जहा चाह, वही राह !’याप्रमाणे मरीन ट्रेनिंगनेच त्याला स्नाइपर बनवले.


हेही वाचा…

तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेतून घराघरात प्रसिद्ध असलेले “नट्टू काका” आज कायमचं जग सोडून गेलेत…

आपल्या मुलाने सेक्स करावं, ड्रग्स घ्यावे अशी इच्छा शाहरुख खानने 24 वर्षापूर्वीच बोलून दाखवली होती..

करपका विनायक मंदिरातील दोन हात असलेल्या बाप्पांच्या मूर्तीचा इतिहास…!


जेव्हा त्याला स्नाइपरचे प्रशिक्षण दिले जात होते तेव्हाच त्याने प्रोफेशनल स्नाइपर बनन्याचे ठरवले होते. असे म्हणतात की त्याने आपल्या बॅचमध्ये चार्ल्स ने इतकी तयारी केली की सर्वांनाच आश्चर्य वाटले. त्याचे लक्ष्य दिवसेंदिवस प्राणघातक होत चालले होते.

त्याने नुकतेच आपले प्रशिक्षण संपवले होते की व्हिएतनाम युद्धावर जाण्याचे आदेश दिले गेले होते. हे ऐकून चार्ल्सच्या आनंदाला मर्यादा नव्हती. त्याला देशासाठी युद्धावर जाण्याची इच्छा होती आणि शेवटी त्याला ती संधी चालून आली होती. चार्ल्स मरीन विभागात एक रायफलमन म्हणून सामील झाला आणि लवकरच त्याला सैन्याच्या विमानाने व्हिएतनामला युद्धठिकाणी पाठवण्यात आले.

जिथे अनेक सैनिक व्हिएतनामच्या धोकादायक जंगलात लढायला घाबरत होते तिथेच दुसरीकडे, चार्ल्स आनंदात होता कारण त्याचे कौशल्य तपासण्यासाठी स्नाइपरसाठी यापेक्षा चांगली संधी ती कोणती असूशकते? आता तो फक्त मिशनवर जाण्याची वाट पाहत होता.

चार्ल्स ज्या गोष्टीची वाट पाहत होता अखेर ती संधि त्याच्या समोर आली कारण त्याची टीम मिशनवर पाठविली गेली. चार्ल्सने स्वत: साठी एक एम -40 स्कोप ही रायफल निवडली. त्याला माहित होते की, वेगवान गोळीबार करणारी बंदूकच व्हिएतनामच्या जंगलात त्याला मदत करेल. व्हिएतनामच्या जंगलात लढाई करणे खूप कठीण काम होते. शत्रू तिथे केव्हा व कसा येईल हे कोणालाही ठाऊक नव्हते. अशा परिस्थितीत, प्रत्येक संघाकडे एक स्नाइपर होता, तो बाजूला बसून आपल्या टीमला कव्हर देत असे.

चार्ल्सनेही असेच केले. जेव्हा त्याची टीम नदी किंवा दाट रस्ता ओलांडत होती तेव्हा तो कुठेतरी लपून संपूर्ण परिसरावर नजर ठेवून असायचा. अशा परिस्थितीत बऱ्याच  वेळा शत्रू त्याच्यासमोर आले तर कधीकधी चार्ल्सने शत्रूला शोधून काढले आणि ठार केले. असे म्हणतात की, त्यावेळी शत्रूला सोडणे म्हणजे त्याच्या साथीदारांच्या मृत्यूची शक्यता वाढवणे. अशा परिस्थितीत चार्ल्सने स्वतःसाठी असा नियम बनविला होता की तो कोणत्याही शत्रूला पळून जाऊ देणार नाही.

Longest recorded sniper kills - Wikipedia

इतकेच नाही तर फ़क्त एकाच गोळीत शत्रूचा नाश करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी खूप संयम व अचूक नेम आवश्यक होते. पहिला शॉट हरवला असता तर शत्रू सतर्क झाला असता व पळून गेला असता ही शक्यता नकारता येत नव्हती. आणि म्हणूनच हे काम एकाच गोळीमध्ये करावे लागले, मग ती सकाळ असोत की रात्र. चार्ल्सनेही तसेच केले. जिथे त्याने शत्रूला पाहिले तेथेच त्याने त्याला जागेवर ठार मारले.

समोरच्या व्यक्तीचे वय काय आहे हे त्याने पाहिले नाही. जर त्या व्यक्तिच्या हातात बंदूक असेल तर तो आपल्या टीमसाठी धोका आहे हे गणित डोक्यात ठेवला.. यानंतर कोणालाही अपेक्षित नसलेल्या ठिकाणी हळूहळू चार्ल्सने शत्रूचा शोध घेत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. एक एक गोळीतच त्याने शत्रूला यमसदनी पाठवले.

स्नाइपरसाठी सर्वात कठीण काम म्हणजे अगदी दूरवरुन अचूक लक्ष्य साध्य करणे. कारण अंतर जास्त असेल तर वाऱ्याच्या बदलत्या वेगामुले नेम चुक्न्याची शक्यता जास्त असते. दुसरीकडे, व्हिएतनामच्या जंगलांमध्ये, जेथे प्रत्येक क्षणाला वारा बदलत राहतो, तेथे अचूक लक्ष्य करणे कधी कधी अशक्य होते. तथापि, हे अशक्य देखील चार्ल्सने शक्य करून दाखवले. त्याच्या शॉटसाठी, त्याने शत्रूच्या येण्याची खुप वाट बघितली. संपूर्ण परिस्थिती त्याला अनुकूल होईपर्यंत त्याने अजिबात गोळीबार केला नाही.

चार्ल्स चक


व्हिएतनामच्या जंगलात चार्ल्स जितका जास्त वेळ घालवत होता, तितकेच त्याचे लक्ष्य शत्रुसाठी अधिक धोकादायक बनले. पूर्वी तो 300 यार्डच्या अंतराववरुन लक्ष्य करीत असे. नंतर, त्याने ते अंतर थेट दुप्पट म्हणजे 800 यार्ड इतके केले. इतकेच नाही तर अनेकदा 1000 गज दुर वरुन नेम धरून एकाच गोळीत शत्रूला ठार केले. चार्ल्सचे हे रूप आणि त्याचे कौशल्य बघून त्याच्या टीम मधील सैनिक हैरान होऊन जात.

चार्ल्स हे इतकया दुरून कसे करतो हे कोणालाही समजू शकले नाही. दुसरीकडे, चार्ल्सची मृत्यू यादी दिवसेंदिवस वाढत होती. यापूर्वी, कोणत्याही अमेरिकन स्नाइपरला इतक्या वेगाने लोकांना मारण्यात यश आले नाही. हे साहस करणारा चार्ल्स हा पहिला अमेरिकन मरीन होता.

30 सेकंदात 16 डोके उडवले!

तो व्हॅलेंटाईन डे च दिवस होता. जिथे एकीकडे जग हा प्रेमाचा दिवस साजरा करत होता तिथेच दुसरीकडे, चार्ल्स आणि त्याचे साथीदार मृत्यूच्या मार्गावर चालले होते. रात्रीची वेळ होती आणि त्या अंधारात त्याची टीम नदी ओलांडत होती. नेहमीप्रमाणे चार्ल्स आपली रायफल घेऊन दूर उभा होता आणि त्या परिसरावर लक्ष ठेवून होता. त्याने रात्रीसाठी बंदूक बदलली होती. आता त्याच्याकडे एक नाइट व्हिजन स्कोप असलेली एम -14 ही रायफल होती.

चार्ल्सची टीम पुढे जात नेमके तेव्हाच चार्ल्सने बघितले की अनेक व्हिएतनामी नदीच्या दुसर्‍या टोकाकडून बंदुका घेऊन जात आहेत. चार्ल्सला समजले की आपल्या टीमवर ते हल्ला करण्यासाठी सज्ज आहेत आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता ताबडतोब आपली बंदूक उठवली आणि शत्रूच्या दिशेने नेम धरला. वेळ खुप कमी होता आणि एक एक सेकंद महत्वाचा होता. एक चूक आणि त्याची संपूर्ण टीम संपली अशी परिस्थिति होती. आता सर्व चार्ल्सच्या हातात होते. चार्ल्सने एक दीर्घ श्वास घेतला आणि पहिल्या शॉटसाठी तो सज्ज झाला. त्याने ट्रिगर दाबला आणि गोळी

थेट व्हिएतनामी सैनिकाच्या डोक्यात घुसली. बुलेटचा आवाज ऐकताच प्रत्येकजण सावध झाला, परंतु चार्ल्सने शत्रूला काहीही करण्याची संधीच दिली नाही. त्यानंतर त्याने एका वेळी एक गोळी झाडली आणि सुमारे 30 सेकंदा नंतर चार्ल्सने गोळीबार थांबविला. तोपर्यंत त्याने अर्ध्याहून अधिक व्हिएतनामींची हत्या केली होती. त्या 30 सेकंदात त्याने एकून 16 गोळ्या झाडल्या आणि त्या 16 थेट शत्रूच्या डोक्यात गेल्या. त्या दिवशी चार्ल्सने केवळ आपल्या संघाचा जीव वाचवला नाही, तर त्याने स्नाइपरच्या जगातही इतिहास रचला.

आजपर्यंत इतक्या कमी वेळात कोणत्याही स्नाइपरने इतके हेडशॉट घेतले नव्हते. हा पराक्रम केवळ चार्ल्सनच शक्य करुन दाखवला.

एकून 103 शत्रुंची हत्या 

सुमारे एक वर्षानंतर, चार्ल्स यांना अमेरिकन सैन्याने घरी परत येण्याचे आदेश दिले. चार्ल्स तिथेच राहू नये आणि स्वत: ला पूर्णपणे हिंसाचाराच्या ठिकाणी समर्पित करू देऊ नए म्हणून सैन्याने चार्ल्सला परत अमेरिकेत पाठविण्याची व्यवस्था केली. चार्ल्स तेथे जवळपास एक वर्ष होता. या एका वर्षात त्याने 103 हून अधिक शत्रूंना ठार मारले. अमेरिकेत परत जाईपर्यंत 30 सेकंदात त्यांची 16 हेडशॉट्सची चर्चा सर्वत्र पसरली होती. सर्वत्र चार्ल्सची चर्चा होती. परत आल्यानंतरही चार्ल्स सैन्यातून मागे हटला नाही. त्यांने सेवानिवृत्ती घेतली नाही आणि अमेरिकन सैन्यात शूटिंग शिकवायला सुरुवात केली.
आजही सर्व स्नाइपर्सना चार्ल्सच्या साहसांची कहाणी सांगितली जाते.


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा.. अधर्माची साथ दिल्यामुळे या योद्ध्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले होते

व्हिडीओ प्लेलीस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here