आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

मीर कमरुद्दीन: मोगलांविरुद्ध बंड करणारा पहिला निजाम!


निजामांनी हैदराबादमध्ये बरीच वर्षे राज्य केले आणि त्यांच्या कारकिर्दीत ते इतके लोकप्रिय झाले की हैदराबादला ‘निजामचे शहर’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

निजामच्या इतिहासाबद्दल बोलताना निजाम-उल-मुल्क आसफजाह हे हैदराबादचे पहिले निजाम बनले.

निजाम-उल-मुल्क असफजा प्रथमचे खरे नाव मीर कमरुद्दीन खान होते, त्यांनी मुघल बादशहाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाने हैदराबादला स्वतंत्र राजवट म्हणून घोषित केले आणि असफजाही राजघराण्याची स्थापना केली.

new google

अशा परिस्थितीत हैदराबादचा पहिला निजाम, तो मुघल बादशाहांच्या अधीन असलेल्या उच्च पदावर कसा राहिला आणि त्यानंतर मोगलांविरूद्ध कसे बंड केले, हे माहीत करून घेणे आपल्यासाठी नाविन्यपूर्ण असेल.

चला तर मग मीर कमरुद्दीन खान हे निजाम बनण्यापासूनच त्यांचा प्रवास जाणून घेऊया .

मीर कमरुद्दीन

मोगल सम्राट औरंगजेबाच्या जवळील व्यक्ती म्हणून राहिले!

वयाच्या सहाव्या वर्षातच मीर कमरुद्दीन वडिलांसोबत मोगल दरबारात गेलेले असताना, तेव्हा औरंगजेबाने त्याच्या वडिलांना सांगितले की, “तुमच्या मुलाच्या कपाळावर भाग्याचा तारा चमकताना दिसत आहे”

लहान वयातच त्याने वडिलांकडून युद्धाचे धोरण व सैनिकी प्रशिक्षण घेतले. आणि अगदी लहान वयातच त्याने आपल्या वडिलांसोबत सुपा आणि रायगड किल्ल्यांवर आपला विजय मिळविला. अशा प्रकारे तो औरंगजेबाला प्रिय झाला.

त्यांची विजयी मोहीम येथेच थांबली नाही, परंतु वयाच्या १६ व्या वर्षी त्यांनी अदोनीच्या किल्ला जिंकून यश संपादन केले. यामुळे सम्राट औरंगजेब खूश झाला आणि त्याने त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आणि नंतर त्यांना ‘चिन किलीच खान’ ही पदवी बहाल केली.

यानंतर, मुघल बादशहाने त्यांना प्रथम विजापूर, नंतर माळवा आणि नंतर दक्खनची सत्ता दिली.

मोगलांविरूद्ध बंडखोरी

औरंगजेबच्या कारकिर्दीत सम्राट मुघल राजवटीशी एकनिष्ठ राहिला, अवध आणि दख्खनच्या सुभेदारची पदे भूषविली. परंतु, १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यूनंतर मोगल राजवट कमकुवत झाली. यातच औरंगजेबाचा उत्तराधिकारी सम्राट फर्रुखसियार यांच्या कारकिर्दीतही ते आपली जबाबदारी पार पाडत राहिले.

त्याच वेळी, सम्राट फर्रुखसियारने त्याला ‘निजाम-उल-मुल्क’ ही पदवी दिली, परंतु काही
दिवसांनी सय्यद बांधवांनी मिळून फर्रुखसियार यांची हत्या केली.

अशातच निजाम-उल-मुल्क यांनी या सय्यद बंधूंच्या कारस्थानावर सूड उगवण्याची योजना आखली.

या योजनेनुसार निजाम-उल-मुल्क सुलतानाच्या मृत्यूचा सूड घेण्यात यशस्वी झाला आणि त्यांच्या निष्ठेचा पुरावा आपोआपच सर्वांना मिळाला. सुलतान फर्रुखसियार यांच्या मृत्यूनंतर मोहम्मद शहा यांनी मुघल सुलतानाच्या कारकीर्दीचा ताबा घेतला. या दरम्यान ते राजवटीचे दिवाण राहिले.

तथापि, त्यांच्या कारकिर्दीत, मोगल राजवटीत दुर्लक्षाचा आणि शासनरहित कारभार सुरू झाला होता आणि त्यांची शासन व्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. त्याला सुधारण्यासाठी निझामाने बरेच प्रयत्न केले, परंतु नेहमीच त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेले.

अशा परिस्थितीत निजाम-उल-मुल्क यांनी मोगल राजवटीला विरोध करण्यास सुरवात केली.त्यासाठी त्याने दक्खनमधील आपले वर्चस्व मजबूत केले. यानंतर, निजामने १७२२ मध्ये मुघल राजवटी विरुद्ध बंड केले, आणि आपल्या स्वतंत्र राज्य स्थापनेची घोषणा केली तसेच राजवटीच्या सर्व पदांचा राजीनामा देखील दिला.

मराठ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध वाढवले.

राजवटी विरूद्ध बंड केल्यावर, मोगल बादशहाने दक्खनच्या सुभेदार मुबारिझ खानला निजामाशी लढण्यासाठी पाठवले. १७२४ च्या या शुकरखेडा युद्धामध्ये निजामने मराठ्यांच्या मदतीने मुबारिझ खानला पराभूत केले. अशा परिस्थितीत निजामाने आपले सैन्य गोळा केले आणि मुबारिझ खानशी युद्ध करण्यासाठी शुकरखेडाच्या मैदानावर पाठवले, पण त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही.

असे म्हणतात की हे युद्ध निजामाने मुबारिज खानाशी मोठ्या शौर्याने व धूर्ततेने केले. आणि शेवटी त्याचा शिरच्छेद करून त्याचे शीर मोगल राजवटीला पाठवले. तेव्हा कुठे दिल्ली राजवटीला त्याच्या शक्तीचा अंदाजा आला.!

परंतु तरीही, त्याने दिल्ली राजवटीशी संबंध तोडले नाहीत आणि वेळोवेळी मोगल राजवटीचे समर्थन करत राहिले. या युद्धानंतरच मुघल बादशहा मोहम्मद शहा यांनी निजामाला ‘असफजा’ ही पदवी दिली आणि त्यांना बऱ्याच भेटवस्तू देऊन सन्मानित ही केले. यानंतर त्यांनी हैदराबादच्या असफजाही घराण्याचा पहिला निजाम म्हणून कार्यभार हाती घेतला.

निजाम-उल-मुल्कने सगळ्यात आधी औरंगाबाद ही राजधानी बदलुन हैदराबाद ही केली आणि दक्खन प्रांतातील सर्व सुभ्यांवर आपले अधिकार गाजण्यास सुरवात केली.

मराठ्यांविरुद्ध दगाफटका आणि….

आपले सामर्थ्य वाढवल्यानंतर त्याने मराठ्यांच्या विरोधात बंड केले आणि १७२८मध्ये त्यांच्या विरुद्ध कारवाया करण्यास सुरवात केली. असे म्हणतात की, त्यावेळी पेशवे बाजीराव पहिला हे दक्खनमध्ये होते, म्हणून या संधीचा फायदा घेत
निजामाने पुण्यावर हल्ला केला. बाजीरावांना जेव्हा हे कळले तेव्हा ते पुण्यात परतले. त्याच वेळी निजाम आपल्या विशाल सैन्यासह बाजीरावांची वाट पाहत होता.

बाजीराव कुशल आणि धूर्त प्रशासक होते. त्यांनी निजामाच्या मोठ्या सैन्याशी लढाई न करता वेगळा डाव रचला…आणि खानदेश व बुरहानपूरसारख्या त्याच्या अधीनअसलेल्या भागात लूटमार करण्यास सुरुवात केली ज्यामुळे निजामाच्या सैन्यात आणि मोगल राजवटीमध्ये मोठा हाहाकार माजला..

मीर कमरुद्दीन

पेशव्यांच्या या हालचालीने निजामाने आपले अर्धे सैन्य लुटलेल्या भागांकडे पाठवले. आणि स्वत: अर्ध्या सैन्यासह बाजीरावांशी लढा देण्यासाठी पालखेडच्या मैदानाकडे रवाना झाले. सैन्य दोन भागात विभागल्यामुळे निजामाचे सैन्यशक्ती दुबळी झाली. आता बाजीरावाने निजामाच्या सैन्याला चारही बाजूंनी घेराव घातला आणि शेवटी आपल्या कार्यक्षम नेतृत्वाने निजामाला गुडघे टेकण्यास भाग पाडले.

अशा परिस्थितीत निजामाला तह करण्या शिवाय पर्याय उरला नाही!

नादिर शहाकडून झाला कडवा पराभव

१७३८ मध्ये नादिर शहाने अफगाणिस्तान आणि पंजाबमार्गे दिल्लीकडे जाण्यास सुरवात केली. मग मोगल सम्राट मोहम्मद शहा यांनी निजामाची मदत मागितली . अशा परिस्थितीत निजामाने फारसी सैन्याला थांबविण्यासाठी आपले सैन्य पाठविले. परंतु, नादिरशहाच्या कार्यक्षम सैन्यासमोर मोगल व निजाम यांच्या एकत्रित सैन्याला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.

असे म्हटले जाते की १७४२ मध्ये जेव्हा इंग्रजांनी निजाम-उल-मुल्कला मद्रासच्या मोगल उत्तराधिकारी राज्याचे नेतृत्व करण्याचा प्रस्ताव दिला तेव्हा त्यांनी त्याच्या अधीन राहून राज्य करण्यास स्पष्ट नकार दिला. १७४८ मध्ये निजाम-उल-मुल्क असफजाह यांनी बुरहानपूर राज्यामध्ये अखेरचा श्वास घेतला, तर अशाप्रकारे हैदराबादच्या पहिल्या निजाम, मीर कमरुद्दीन खान उर्फ निजाम-उल-मुल्क असफजहा प्रथम यांच्या संबंधित काही काळा आड गेलेल्या गोष्टी आपण येथे पहिल्या.

तुम्हाला देखील हैदराबादच्या या निजामाबद्दल इतरही काही गोष्टी माहित असल्यास खाली कमेंट बॉक्समध्ये आमच्यासोबत नक्की शेअर करा.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here