आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

यतींद्र नाथ मुखर्जी: तो क्रांतिकारी ज्यांनी 1915मध्येच भारत स्वतंत्र केला असता..


स्वातंत्र्य….स्वातंत्र्य म्हणजे स्वाधीनता …स्वतंत्रता …. त्यातल्या त्यात आपल्या भारत मातेविषयी किंवा भारतमातेच्या स्वातंत्र्य लढ्याविषयी नुसते बोलायचे जरी झाले तरी ऊर अभिमानाने भरून येतो. कारण भारताच्या ज्या स्वातंत्र्याचा आपण अभिमानाने गौरव करतो ते स्वातंत्र्य अनेक क्रांतिकारकांच्या बलिदानानंतर आपल्याला मिळाल आहे. त्यामुले त्या स्वातंत्र्याचा गर्व वाटणे खुपच साहजिक आहे. या स्वातंत्र्याची किंमत आम्ही हुतात्म्यांचे रक्त आणि आपल्या देशवासीयांच्या बलिदाना च्या स्वरूपात मोजली आहे.

आज त्याच क्रांतिकारकांपैकी आम्ही तुमच्यासमोर अशा एका महान क्रांतिकारकाची वीर गाथा घेऊन आलो आहोत ज्यांच्यावर स्वातंत्र्याचा इतिहास लिहिण्याच्या वेळी एकप्रकारे अन्याय झाला आणि त्याचे बलिदान इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेले नाही.

आज़ादी के महान सिपाही - Swapnil Sansar

new google

होय! जर या क्रांतिकारकाची योजना यशस्वी ठरली असती तर १९१५ मध्येच आपल्याला स्वातंत्र्य मिळाले असते. थोडीफार कल्पना असेल तर तुमच्या लक्षात आलेच असेल की आम्ही महान क्रांतिकारक यतींद्र नाथ मुखर्जी यांच्या विषयी बोलत आहोत.  ज्यांना ‘बाघा जतिन’ म्हणून देखील ओळखले जाते.

हा क्रांतिकारक त्या काळचा खरया अर्थाने नायक होता . कारण  जेव्हा लोक इंग्रजांच्या भीतीपोटी घरात दडून राहायचे त्याच काळात यतीन्द्र नाथ इंग्रज जिथे दिसेल तिथे त्याला फटकून काढायचे. असे म्हणतात की एकदा त्यांनी एकटयानेच आठ ब्रिटिशांना मारहाण केली होती.

यतींद्र नाथ मुखर्जी सुरुवातीपासूनच क्रांतिकारक स्वभावाचे होते, त्यांचे बळकट शरीर त्यांना अधिकच सामर्थ्यवान बनवत होते. कॉलेजात असताना यतीन्द्र नाथ स्वामी विवेकानंदांच्या संपर्कात आले. स्वामीजींनी त्यांना कुस्तीच्या युक्त्या शिकण्यासाठी अंबू गुहाच्या स्वदेशी व्यायामशाळेत पाठविले. देशाचे  स्वतःचे राष्ट्रीय सैन्य असावे ही पहिली कल्पनाही बाघा जतिन यांची म्हणजेच यतीन्द्र नाथ यांची होती.

आता यतींद्र नाथांचे नाव ‘बाघा जतिन’ का पडले असे तुम्हाला वाटले असेलच तर त्यामागे एक असा किस्सा आहे की, एकदा गावात बिबट्याने दहशत निर्माण केली, त्यानंतर यतींद्र नाथ मुखर्जींनी आपले शौर्य दाखवत त्याचा वध केला, आणि तेव्हापासूनच लोक त्याना बाघा जतिन म्हणून संबोधू लागले. सन १९०० मध्ये, क्रांतिकारकांची सर्वात मोठी संस्था म्हणजेच अनुशिलन समिती स्थापन झाली, या स्थापनेत यतींद्र नाथ मुखर्जी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

त्यादरम्यान, त्यांनी बर्‍याच ठिकाणी भेटी दिल्या, अनेक ठिकाणाचे दौरे केले. आता इंग्रजांना मारहाण करण्याची त्यांच्या बद्दलची चर्चाही सामान्य झाली, कारण  प्रत्येक दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी ते काही इंग्रज किंवा इतरांना मारहाण करीत असत. जतीन यांना एकदा विचारले गेले की तुम्ही एकत्र किती लोकांना मारहाण करू शकता, तेव्हा ते म्हणाले, ‘जर तुम्ही प्रामाणिक असाल तर एकसुद्धा नाही आणि अप्रामानिकांची गणना देखील नाही. ‘ म्हणजे यतीन्द्र नाथाना खोटयाची किती चिड होती हे यावरून दिसून येते.

यतींद्र नाथ मुखर्जी

बाघा जतिन यांनी बर्‍याच नावांनी वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या, ते अनेक प्रकारची सामाजिक कामेही करीत होते. याचवेळी ते अनेक क्रांतिकारक कार्यातही सहभागी होत होते. दरम्यान,  १९१५ मध्ये जर्मनीचा राजा भारत दौर्‍यावर होता. लोकांपासून व ब्रिटिशांपासून लपून यतींद्र नाथ मुखर्जी यांनी जर्मनीच्या राजाशी भेट घेतली. त्यांना भारताच्या स्वातंत्र्यासाठी शस्त्रे देण्याविषयी विनंती केली आणि जर्मनीकडून शस्त्रे घेऊन ब्रिटीशांच्या विरोधात त्यांचा वापर करून भारत स्वतंत्र करण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. पण डिटेक्टीव्ह इमॅन्युएल व्हिक्टर वोस्का यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी ही बातमी अमेरिकेला दिली, आणि नंतर अमेरिकेने ही गोष्ट ब्रिटीश सरकारला सांगितली. ज्यामुळे शस्त्रे आणता येऊ नयेत म्हणून ओरिसाचा संपूर्ण समुद्रकिनारा सील करण्यात आला.

याच दरम्यान  ब्रिटिशांनी यतींद्र नाथ मुखर्जीचा शोध सुरू केला. आणि 9 सप्टेंबर 1915 रोजी जेव्हा एका अधिकारयाने त्यांना गावकरयांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानी त्या अधिकारयाला ठार मारले. पण त्यानंतर ही बातमी समजल्यानंतर अधिक इंग्रज अधिकारी आले आणि दोन्ही बाजूंनी यतीन्द्र नाथ यांच्यावर गोळीबार करण्यात आला. बाघाचा साथीदार चित्तप्रिया हा हुतात्मा झाला, यतीन्द्र नाथानी बर्‍याच काळ इंग्रजांच्या गोळ्यांचा सामना केला, पण शेवटी त्यांच्यावर सगळ्या बाजूनी गोलीबार करुण त्यांना थर करण्यात इंग्रजांना यश आले आणि एक महान क्रांतिकारक शहीद झाला.

यतींद्र  नाथांचे मातृभूमिसाठीचे बलिदान इतर क्रांतिकारकांप्रमाणेच महान आहे. पण यतींद्र नाथ मुखर्जी यांच्या हुतात्म्याला इतिहासामध्ये जे स्थान मिळायला हवे होते ज्यावर त्यांचा हक्क होता ते स्थान त्यांना आजतागायत मिळालेले नाही. आजही लोकांना त्यांच्याबद्दल फारच कमी माहिती आहे. आज आपण या महान क्रांतिकारकांना विसरत चाललो आहोत असा म्हणन्यापेक्षा आपल्याला जमेल त्या मार्गाने या क्रांतिकारकांचे स्मरण आपण करायलाच हवे. कारण आज ज्या स्वातंत्र्याची गोड फळ आपण चाखत आहोत ते स्वातंत्र्य आपल्याला या महान क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे प्राप्त झालेले आहे हे पुढच्या पिढीने विसरता कामा नये!


===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

मीर कमरुद्दीन: मोगलांविरुद्ध बंड करणारा पहिला निजाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here