आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

पहिल्या युद्धात सैन्यासारखे जबरदस्त असायचे हे प्राणी, इतक्या प्रचंड प्रमाणात होती लढावू वृत्ती!


खरतरं सुरूवातीच्या काळात विज्ञान अगदीच फारसं प्रगल्भ झालं होतं अशातला भाग नव्हता. आणि त्यामुळेच अनेक गोष्टी त्या ठराविक जुन्या काही काळापूर्वी काही ना काही युक्त्या अथवा इतर संसाधनांवर अवलंबून असलेल्या मार्गांनी मिळवाव्या लागायच्या. १९ व्या किंवा २० व्या शतकात जे जे काही अशक्य किंवा फारच कठीणाईच काम असायचं ते आता आजच्या घडीला सहज आणि शक्य झालेलं पहायला मिळतं. मुळात त्या काळात सर्वाधिक अडचण म्हटलं तर ती युद्धाच्या तयारीची असायची. त्याकरता अक्षरश: जणू कसरत चालायची.

प्राणी

आजच्या घडीला अनेक देशांकडून हवेत, पाण्यातून, जमिनीवरून सहजरित्या हल्ले वगैरे घडवून आणले जाऊ शकतात. पण त्या काळात एकच मार्ग लढाईचा असायचा आणि तो म्हणजे जमिनीवरून. त्या काळात क्वचित नावाला काही लढाया या पाण्याच्या आत झाल्या, ज्यात नुकसान अधिक होतं. परंतु पहिलं युद्ध ज्यावेळी घडलं त्यावेळी ते संपूर्ण जमिनीवर घडल्या गेलं. आणि पहिल्या महायुद्धात अनेक गोष्टी गमावल्या गेल्या.

new google

त्या काळात सैनिकांना हत्यारं, दारूगोळे, इतर वाहणं या सर्व लश्करी मदतीच्या गोष्टी स्वत:च सोबत वावराव्या लागायच्या. आणि अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एका प्राण्याची अफाट मदत ही सैन्याला झाली. सैन्य आजही त्या प्राण्याच्या गोष्टीचं कौतुक करत आजही त्याला उपयुक्तचं मानतात. तर तुम्हाला जाणून थोडसं हैराण वाटेल की, हा प्राणी म्हणजे “घोडा” आहे. घोड्यासारख्या चपळाख प्राण्याचा इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज व इतर काही योग्य राजांनी असा काही भारदस्त वापर केल्याचा पहायला मिळतो. घोड्याबाबत त्याच्या काही खास ठराविक गोष्टी आहेत. ज्यामुळे तो सैन्याच्या मदतीसाठी वापरण्यात येऊ लागला.

पहिल्या महायुद्धात जेव्हा केव्हा सैन्याला एखाद्या महत्त्वाच्या क्षणी कोणत्या गोष्टींची मदत पडली तेव्हा तेव्हा घोड्याची मदत घेण्यात आली होती. खरतरं हे शक्य झालं कारण घोड्यांना ट्रेनिंग दिल्या जायची, ज्यामुळे घोड्यांचे जे जे काम आहे ते ते त्यांच्याकडून अचूकपणे काढून घेतल्या गेले. अनेक देशांनी आपल्या सैनिकांना कधी कुठे काही अडचण लागल्यास काय करायचं हा प्राथमिक स्वरूपाचा विचार डोळ्यासमोर ठेवून घोड्यांची खरेदी करणं सुरू केलं. या दरम्यान घोड्यांचे भाव जागतिक पातळीवर आपोआपच वाढले होते कारण त्यांची मागणीही तितकीचं अवाढव्य प्रमाणात वाढली होती.

तुम्हाला आजवर माहित नसलेली एक जबरदस्त धमाकेदार गोष्ट म्हणजे, ऑस्ट्रेलियासारख्या देशाला तब्बल १,३६००० घोड्यांनी मदत केली होती. मुळात अगदी प्रचंड हट्टेकट्टे असलेल्या घोड्यांची ही खरेदी न्यू साउथ वेल्स येथून करण्यात आली होती. आणि याच पहिल्या महायुद्धात अक्षरश: ब्रिटीश सेनेन ५ लाख घोडे उभा केले होते. सैन्याला मदत करत असताना जवळपास सैन्याची रसद, सैन्याचे एकूण एक हत्यारं, एखादा संदेश घेऊन जाणं, दवाखान्यात घेऊन जाणं, या सर्व प्रकारची कामे घोड्यांनी आजवर केलीच आहेत.

खऱ्या अर्थाने या घोड्यांचा सैन्यात प्रवेश हा ट्रेनिंग देऊन करत असल्याने, घोड्यांमधे ऐनवेळी काय आणि कशा पद्धतीने गोष्टी करायच्या? हे लक्षात येत असायचं. मुळात पहिल्या महायुद्धात घोडा हा कितीतरी प्रमाणात प्रचंड वेगवेगळ्या प्रकारे वापरण्यात आला. आजही अनेकजण त्याला आपलं विजयाचं किंवा संकटावर मात करण्याच प्रतिक मानतो.

घोड्यांच्या प्रमाणे चक्क कुत्र्यांचादेखील वापर पहिल्या महायुद्धात केला गेला, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. कुत्रांच्या पाठीवर औषधांच्या बॅगा आणि इतर सामुग्री अडकवून ती जखमी सैनिकांच्या मदतीला रणांगणात पाठवल्या जायची. आणि खास महत्व म्हणजे एखादा कुत्रा जखमी सैनिक ठीक होई अथवा मरेपर्यंत सोबत राहत असतं. कुत्रांच्या वास घेण्याच्या प्रवृत्तीचा वापर विषारी गॅसचा अंदाज येण्याआधी सैनिकांचा भुंकण्यातून सतर्कतेचा इशारा देत असतं.

प्राणी

कुत्रांच्या सेंट्री आणि डॉबरमॅन या प्रजाती खासकरून संरक्षक सैनिकांसोबत दिल्या जायच्या. यानंतर खासकरुन उपयोग करण्यात आलेला पक्षी म्हणजे कबूतर. कबूतर एकप्रकारे संदेश पोहचवण्यात माहिर असतात हे तुम्हालाही चांगलच ठाऊक आहे. पहिल्या महायुद्धात तब्बल १ लाखांपेक्षा अधिक कबूतरांचा वापर करण्यात आला होता. आणि या सगळ्यांचा वापर हा माहितीची देवाणघेवाण किंवा एखादा खास संदेश देण्याकरता करण्यात आला होता.

कबुतरांना यासाठी विशेष शिक्षणदेखील दिल्या जात होतं. नाही म्हटलं तरी ९५% कबूतर जवळपास आपला योग्य संदेश योग्या ठिकाणीच द्यायचे. त्यावेळी ड्रोनसारखी यंत्रणा नव्हतीच म्हणून कबूतराच्या गळ्यात कॅमेरा बांधून ठराविक ठिकाणचा फोटो काढून घेऊन तो शत्रुच्या विरोधात वापरला जायचा. यानंतर ज्या प्राण्याने सर्वाधिक मदत केली तो म्हणजे, उंदीर. अर्थात हे ऐकायला जरी विचित्र वाटलं तरी खरं आहे. सैनिकांचा ठाव जमिनीतून एखादी सुरंग बनवून त्यातून माहिती मिळवणं हे या उंदरांकडून करवून घेतलं जात होतं. यात विशेषकरून पांढऱ्या रंगांच्या उंदरांनी खास मदत पोहोचवली.

उंदर विषारी गॅसपासून सहज आपला बचाव करू शकत होते. उंदरांच्या हालचालीतील धकधक करणारी गोष्ट चिंता वाढवणारी आणि धोक्याचा इशारा समजल्या जायची. उंदरांना शत्रुच्या पक्षातला अन्नसाठा नष्ट करायलाही वापरल्या जायचं. यानंतर सर्वाधिक वाहतूकीची यंत्रणा म्हणजे ऊंट हा प्राणी. दुरपर्यंत जिथे पाणी मिळू शकणार नव्हतं तिथे ऊंट प्रभावी ठरू लागला होता, अर्थात वाळवंटाच्या भागात ऊंटाची महत्वाची भुमिका राहिली. पाणी, कधी शत्रुच्या हालचालींवर लक्ष ठेवणं या गोष्टींकरता ऊंटाचा वापर झाला. शिवाय वाळवंटात ऊंटापेक्षा प्रभावी कोणीच ठरू शकलं नसतं. तर मुळात खास अशा विविध प्रकारच्या प्राण्यांचा पहिल्या महायुद्धात जबरदस्त पद्धतीने वापर केला गेला होता.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here