आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

एके काळी कामगारांकडून वापरल्या जाणाऱ्या जीन्सचा इतिहास, पेहरावात असा झाला समावेश!


तुम्हाला सहसा माहितच आहे की, दिवसेंदिवस माणसांच्या राहणीमानात बराचसा बदल होत राहिला आहे. आणि याच राहणीमानाचा मुख्य बिंदू असलेली गोष्ट म्हणजे पेहराव. आपण अंगावर जे काही परिधान करतो ते सगळचं या पेहरावात येतं. आणि अशा या पेहरावात समावेश असलेली एक गोष्ट म्हणजे जिन्स पँट्स.

जिन्सच्या वेगवेगळ्या पद्धती आज बाजारात उपलब्ध असलेल्या पहायला मिळतात. आणि जिन्सच्या महत्वाच्या कौशल्यापैकी एक म्हणायचं झालं तर जिन्स या प्रत्येक प्रकारच्या कपड्यांवर चांगल्याच दिसतात, टी- शर्ट, कुर्ता कधी इतर काही असो पण तेदेखील छानच वाटतं. आणि अशाच काही खास कारणांमुळे जिन्सला सगळीकडे अधिक प्राधान्य दिलं जातं. आणि त्यामुळे जिन्स जगभरात भरपूर पसरलेली गोष्ट आहे.October | 2011 | sterlingcooperexec

जिन्सच्या पद्धतीत तुम्ही डेनिम हे नाव ऐकलं असेलचं. खरतरं जिन्सच्या प्रकारात डेनिम हा प्रकार येण्यापाठी एक खास असा इतिहास आहे. डेनिम नावाचा मुळ शब्द “सेर्गे डी नेम्स” यातून उदयास आला. अर्थात जे की चक्क एका फॅब्रिकचे नाव आहे. आणि या फॅब्रिकची उत्पत्ती फ्रान्स येथील नेम्स येथे झाली.

new google

अंदाजे 18 व्या शतकात इटलीच्या जेनोआमध्ये तयार केलेल्या सर्ज प्रमाणे नेम्सच्या कामगारांनी फॅब्रिक हेच बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु ते सर्ज प्रकारातील बनल्या न गेल्याने एका नव्याच प्रकारच्या फॅब्रीकचा उदय झाला. आणि या नव्या किस्याचे नाव सर्ज डी नेम्स ठेवल्या गेले होते. आणि नंतर नाव छोट आणि सोप्प करण्यासाठी डेनिम या नावाचा वापर केला.

आता मुळात मुद्दा म्हणजे या जीन्सबद्दल आपण थोडसं बोलूया. तर अशा प्रकारच्या पॅन्ट्स या ‘डेनिम’ किंवा ‘डुंगारी’ फॅब्रिक पद्धतीच्या बनवलेल्या आहेत. जगातील सर्वात प्रसिद्ध फॅब्रिकचा शोध वर्ष 1873 मध्ये लागला.

जेकब डेव्हिस आणि लिवाय स्ट्रॉस हे दोघे त्याचे संशोधक ठरले होते. त्यावेळी त्या जिन्स इतर कामांसाठी किंवा विशेष वर्गासाठी निर्माण केल्या गेल्या असल्या तरीही आज सहजपणे प्रत्येकाच्या आयुष्यातला घटक झालेल्या पहायला मिळतात.

1851 सालात लिवाय जर्मनीवरून जेव्हा न्यू यॉर्क मधे आला तेव्हा पश्चिमी देशांमधे गोल्ड मायनिंग अर्थात सोन्याच्या खाणींमधील काम प्रचंड प्रमाणात चालत असायचं. जेव्हा लिवायला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने आपल्या कपड्यांना अर्थात डेनिम जिन्सना सॅन फ्रॅन्सिस्कोत विकायचं ठरवलं आणि इथूनच खऱ्या अर्थानं जिन्सची शुरूवात झाली असं म्हणता येऊ शकेल.

वर आपण लेखात उल्लेख केलेलं नाव म्हणजेचं जेकब डेव्हिस तर हा एक टेलरिंग करणारा माणूस होता. लिवाय आपलं डेनिम फॅब्रिक इथे विकू लागला असतानाच नेमका डेनिमच्या फॅब्रिकचा वापर करून जाड कपडे बनविण्याचा विचार जेकबच्या मनात आला. कारण त्याआधी एकदोन वेळा गिऱ्हाईकांनी त्याच्याकडून बऱ्याच जाड कपड्यांनी शिलाई करून घेतली होती. आणि त्यातही महत्वाचं म्हणजे जेकबने या पॅन्टला बनविल्यानंतर त्यात तांब्याच्या धातूचा खिळा म्हणून वापर करायचा ठरवला. जो की पॅन्टला बटन म्हणून वापरला जाऊ शकतो आणि त्याचा आविष्कार लोकांना प्रचंड आवडला.

जेकबच्या मनात विचार आला की यावर आपला हक्क बजावला पाहिजे. आणि मग पेटंट घेण्यासाठी जाताना तो लिवायला सोबत घेऊन गेला. आणि आज दोघांच्या नावे हा आविष्कार कोरला गेलेला आहे. खरतरं याची युक्ती येण्यापाठीमागचं कारण म्हणजे सोन्याच्या खाणीत काम करणारे कामगार लोकांना जाड कपड्यांची गरज भासू लागली. आणि याच गरजेने नव्या शोधाला जन्म दिला

. त्यानंतर बाजारात खासकरून चर्चा रंगली ती निळ्या रंगाच्या डेनिमची.

जीन्स

खरतरं याची क्रेज आजही पहायला मिळतेच, पण त्या काळात नव्याने तयार झालेल्या गोष्टीला चटकन कुणीतरी आपलसं करून घेणं म्हणजे फारच अप्रुप गोष्ट होती. निळ्या आणि पांढऱ्या रंगाला एकत्र करून जे मिक्स कॉम्बिनेशन बनवल्या गेलं ते अप्रतिम गाजलं. या पॅन्टला हळूहळू पोलो खेळाडू वापरू लागले. कामगार नंतर खेळाडू आणि त्यानंतर आजचा प्रत्येक सामान्य माणूस हा प्रवास अद्भुतनिय आहे.

सध्याच्या घडीला सर्वाधिक चांगल्या जिन्स या जपान या देशात बनवल्या जातात ही बाब विशेष उल्लेखनीय आहे. निळ्या डेनिमचा वापर प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्यानेही त्या काळात केला होता. आणि त्याच्या वापरानंतर मात्र सर्वसामान्यांना या जिन्सचा जणू लळाच लागला. यानंतर खास गोष्ट म्हटली तर 1950 च्या दशकात बेल बॉटम आणि स्किनी जिन्स यांचीदेखील क्रेज प्रचंड प्रमाणात राहिल्याची पहायला मिळाली होती.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here