एक अशी रायफल ज्यासमोर एके 47 पण आहे कमजोर, पहा एम – 4 कार्बाईनची खासियत!


 

सैन्य असो अथवा पोलीस यंत्रणेसारखं संरक्षण दल असो त्या यंत्रणांची ताकद ही बऱ्याचदा आजच्या 21 व्या शतकात शस्त्र कितपत प्रमाणात प्रभावी आहे यावर सारकाही अवलंबून राहिलेलं पहायला मिळतं. आज नाही म्हटलं तरी प्रत्येक देश हा आपल्या आपल्या सैन्याच मनोबल वाढवून आपल्या सैन्याला उपयुक्त असे विविध योग्य प्रकारची शस्त्रे देण्यात जुटलेला पहायला मिळतो. तुम्हाला सहसा रायफलबद्दल बऱ्यापैकी माहिती असेलच.

नाही म्हणलं तरी आपण कधीतरी एखाद दुसऱ्या सिनेमांमधूनतरी त्यांना पाहिलेलं आहे. आणि त्या पाहूनच आपल्याला सहसा त्यांच्या वापराबद्दल किंवा उपयोगाबद्दल एक उत्सुकता मनात निर्माण होते. तर अशीच एक रायफल आहे जी सहजपणे एके-47 सारख्या रायफलला मागे टाकत चांगल्या प्रभावीपणे कार्यक्षम असलेली पहायला मिळते आणि त्या रायफलच नावं म्हणजे, एम-4 कार्बाईन हे आहे.रायफल

चला तर मग आपण जरा त्या रायफलच्या काही खास गोष्टींबद्दल आता जाणून घेऊयात. जुन्या घडीची सर्वाधिक अपग्रेड असलेली एम-16 ची नवी अप्रगेड झालेली रायफल म्हणजे एम-4 कार्बाईन. तुम्हाला माहीत असेल की, एम-16 या रायफलची दहशत खासकरून अमेरिकी सैनिकांनी बसवली. अमेरिकेच्या सैन्यदलात या रायफलचं वर्चस्व बराच काळ राहिलं. व्हिएतनाम सारख्या प्रकारणातदेखील अमेरिकेने याच एम-16 चा वापर केला होता.

हेही वाचा: एके काळी कामगारांकडून वापरल्या जाणाऱ्या जीन्सचा इतिहास, पेहरावात असा झाला समावेश!

new google

तर याच एम-16 वरून अपग्रेड केलेल्या एम-4 मधे आणि जुन्या वर्जनमधे जवळपास 80% साम्यता पहायला मिळते, परंतु 20% टक्केच्या बदलामधे खुप काही गोष्टी जुडल्या गेलेल्या पहायला मिळतात. एम-4 चा आकार आता लहान आणि वापरायला अगदी सहज होईल असा करण्यात आला आहे. अमेरिकेची सेना या रायफलच्या ट्रायलमधेच या नव्या एम-4 वर प्रचंड खुश असल्याची पहायला मिळतं होती.

एम-4 कार्बाईनची खासियत म्हटलं तर सर्वप्रथम या रायफलचा लहान आकार आणि सोबतच या रायफलपासून इतरही हत्यार जाग्यावर तयार करता येतात. आणि ही अशी जबरदस्त खुबी अजुनतरी फार कोणत्या इतर हत्यारांमधे समाविष्ट असलेली पहायला मिळतं नाही. कोणत्याही प्रकारच्या लढाईत या रायफलचा वापर सहजरित्या शक्य आहे. वजनाने हलकी आणि अगदी साध्या पद्धतीने वाहतूक करता येऊ शकेल अशी ही रायफल आहे.

या रायफलची खासियच जी इतर हत्यारांमधे बदलू शकते तिला कस्टमायझेशन असं म्हटलं जातं. या रायफलला नाईट व्हिजन अर्थात अगदी रात्रीतही स्पष्टपणे निशाना साधता येईल अशी खुबी आहे. शिवाय निशाना साधण्याची लकबजी प्रचंड जबरदस्त आहे. थोड्याशा बदलांनी या रायफलने चक्क ग्रेनेडदेखील लॉंच केल्या जाऊ शकतं. या रायफलला शॉटगनमधे बदलल्या जाऊ शकतं. याव्यतिरिक्तही या रायफलच्या अशात फिचर्सच्या इतर सुविधा आहेत.

रायफल

एम-4 ही रायफल चक्क एके-47 या रायफललादेखील टक्कर देते. एम-4 ही रायफल जवळपास 600 मीटरपर्यंत लक्षभेद करू शकते. आणि एकाच वेळी 950 गोळ्या लगातार झाडण्याची क्षमता या रायफलमधे आहे. जेव्हा सर्वात आधी एके – 47 हिची निर्मिती झाली होती तेव्हापासून आजतागायतही तिचा डंका कायम राहिलेला पहायला मिळाला आहे. एके-47 ची सर्वाधिक खास बाब म्हणजे ती चालवायला अगदी सहज सोप्पी रायफल आहे आणि लक्षभेद करताना तितकिच घातकही आहे.

या दोन्ही खुबींना आता एम-4 ने टक्कर दिल्याची पहायला मिळते आहे. खरतरं आतंकवादी फार न विचार करता एके- 47 जितक्या सहजतेने चालवू शकतात तितक्या बेफिक्रीने कोणत्याही कमांडोला अथवा सैनिकाला गोळ्या झाडण्याचं स्वातंत्र्य नसतं, त्यामुळे वेळ पाहून विचार करत तो निर्णय घेऊन एम-4 चा योग्य पद्धतीने वापर करू शकतो. एम-4 च्या गोळ्यांची साईझ ही फार कमी असल्याने आपण शत्रूला जिवंत पकडून त्याचे पुढील मनसुबे जाणून घेऊ शकतो.

एम-4 थेट एका गोळीत लगेच जीव घेते असं नाही. परंतु काही विशिष्ट कारणांमुळे आज एम-4 ची जगभरात तारीफ होताना पहायला मिळत आहे. सैनिकांचा तर याकडे पाहण्याचा दृष्टीकोन आणि पैलू फारच सकारात्मक झालेला आहे.

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here