आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

भारतीयांची जीव की प्राण असलेल्या पद्मिनी कारची कधी लोकांमध्ये अफलातून क्रेझ होती…!


 

एखाद्या व्यक्तीला आजच्या घडीला ही कार माहित नसणं म्हणजे नवलचं म्हणावं लागेल. कारण या गाडीने कितीतरी दशके लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. तुम्ही म्हणालं एखाद्या गाडीने विषेश असं काय केलं की ती आज इतकी लोकप्रिय आहे. आणि विशेष म्हणजे, तिच्यावर आपण इथे आज चर्चादेखील करणार आहोत. मुद्दा अगदी मस्त आणि काहीसा जुन्या आठवणी किंवा ताज्याही आठवणींना थोडीशी कुठेतरी रमणान झालो अशी झालर देणारा आहे.

फिएट पद्मिनी कार असं या गाडीच खास नाव आहे. या गाडीचा वापर सर्वाधिक आपण सर्वांनी एकाच ठिकाणी पाहिलेला आढळून येतो ते ठिकाण म्हणजे मुंबई. आजच्या टॅक्सी गाड्यांच्या तुलनेत काही दशकांपासून चालत आलेली एक ठराविक वैशिष्ट्याची फिएट ही गाडी मुंबईच्या रस्त्यांवर कितीदातरी धावली असेल.

new google

पद्मिनी कार

1970 ते 80 च्या दशकात साधारण ही गाडी म्हणजे अक्षरशः ह्रदयाची धडकन ठरली होती. या गाडीची खासीयत सांगायची झालीच तर जवळ जवळ 1964 सालात ही गाडी भारतीय बाजारात विक्रीला उपलब्ध झाली. त्या काळात आपला भारत देश हा ऑटोमोबाईल या भागात नव्याने भरारी घेऊ लागला होता.

हिंदुस्तान मोटर्स यांची पहिली अँबेसिडर तर तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे. त्यानंतर विशेष म्हणजे भारतातली दुसरी मोठी कंपनी प्रीमियर ऑटो लीमीटेड यांनी आणलेली फिएट पद्मिनी. खास म्हणजे दोन्ही गाड्या विदेशी गाड्यांच्या कॉपीज होत्या. आणि दोन्ही गाड्यांनी खरतरं हळूहळू लोकांच्या मनात आपलं वर्चस्व स्थापन केलं.

पद्मिनीच्या बाबतीत सांगायचं  म्हटलं तर अगदी रेसिंग ट्रॅकवर प्रचंड वेगात धावू शकेल अशी त्या कारची किमया होती. त्या दशकात एखाद्या नव्या दमाच्या गाडीनं थेट रेसिंग ट्रॅकवर धावणं म्हणजे अवघड बाब होती. परंतु या गाडीने मात्र ही बाब शक्य करून दाखवली. चेन्नई आणि कोलकाता येथील दोन रेसिंग ट्रॅक त्या काळात प्रसिद्ध होते आणि दोन्ही ट्रॅकच्या भागात रेसिंग चँलेंज घेत फिएट पद्मिनीने थेट हेरोल्ड, डॉल्फीन यांसारख्या गाड्यांना त्या काळात भक्कम टक्कर दिली.

पद्मिनी कार

या प्रकारामुळेच पद्मिनी आपल्या मजबुतपणाच आणि टिकाऊपणाच वर्चस्व प्रस्थापित करू शकली होती. खासकरून ज्यांना या गाडीच्या शैलीचा अंदाजा आहे त्यांना आजही या गाडीने सैर करायला प्रचंड आवडतं. फिएट गाडीच्या आत आरामदायी सुविधा असल्यानेदेखील या गाडीची लोकांमधे वाहवाही होती. कार्बोरेटर, 4 सिलेंडर असलेलं पेट्रोल इंजिन, 40 बीएचपी हॉर्स पॉवरचं ब्रेक. परंतु त्यावेळी गतीच्या बाबतीत थोडीशी गाडी मागे होती.

हेही वाचा: एके काळी कामगारांकडून वापरल्या जाणाऱ्या जीन्सचा इतिहास, पेहरावात असा झाला समावेश!

गाडीचा सर्वाधिक वेग हा 125 किमी प्रति तास असा होता. डॅशबोर्डची मेटल शीट आणि बसण्याची आरामदायी सुविधा गाडीला वेळाच लहेजा देऊन जायची. खरतरं या गाडीला त्या काळात नेतेमंडळी, कलाकार यांनीही प्रचंड प्रमाणात पसंत केल्याच पहायला मिळालं आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु भारताचे पंतप्रधान झालेल्या लाल बहादुर शास्त्रींनी खास लोन काढून ही गाडी खरेदी केली होती. आणि त्यांची ही पहिलीच गाडी होती.

लाल बहादुर शास्त्रींचा लवकरच मृत्यु झाला त्यामुळे उरलेली व्याजाची रक्कम ही त्यांच्या पत्नीने पुढे चुकती केली. आजही त्यांनी खरेदी केलेली फिएट पद्मिनी ही लाल बहादुर शास्त्री संग्रहालय दिल्ली येथे ठेवलेली पहायला मिळते. अभिनेत्यांमधे चक्क रजनीकांत, धर्मेंद्र, मामुट्टी आणि आमिर खान यांनीही खरेदी केली. आजदेखील मुंबईच्या काही रस्त्यांवर ही गाडी पहायला मिळते आहे. 1997 सालाच्या नंतर जरी या गाडीचं उत्पादन बंद झालेलं असलं तरी देखील या गाडीचे चाहते आणि तिचे शौककर्ते आजपर्यंत कमी झालेले नाहीयेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here