आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जस्सा सिंह आहलुवालिया: मोगलांना शह देऊन लाल किल्ला जिंकणारा सरदार!


इतिहास साक्षीला आहे की दिल्लीच्या लाल किल्ला नेहमीच मुस्लिम राज्यकर्त्यांच्या ताब्यात राहिला आहे. परंतु सन १७८३ मध्ये जेव्हा पहिल्यांदाच शीख सैन्याने सम्राट शाह आलमला गुढघे टेकायला भाग पाडलं आणि लाल किल्ल्यावर केशरी निशान साहिब (ध्वज) फडकावला!

ही घटना अशी होती की, यापूर्वी दिल्लीत बऱ्याच शीख गुरुंना शहीद करण्यात आले होते, परंतु त्या ठिकाणी ना गुरुद्वारा बांधण्यात आला, ना शीखांना त्यांचा हक्क देण्यात आला.जस्सा सिंह आहलुवालिया

याच बरोबर , १७८३ ते ६७ वर्षांपूर्वी त्याच दिवाण-ए-आममध्ये बसून, शीखांचे शूर योद्धा बाबा बंदासिंग बहादूर यांना ७४० शीखांसह शहीद होण्याचा आदेश देण्यात आलेला. हे सगळ पाहून बाबा बघेलसिंग यांच्या नेतृत्वाखाली जत्थेदार जस्सा सिंह अहलुवालिया आणि जत्थेदार जस्सासिंह रामगढियांनी मोगलांवर जोरदार हल्ला केला.

new google

जत्थेदार जस्सा सिंह अहलुवालिया यांची फार महत्वाची भूमिका होती आणि त्यांचे शौर्य आणि पराक्रम लक्षात घेऊन त्यांना दिवाण-ए-आम मधील ‘सुलतान-उल-कौम’ ही पदवी देण्यात आली. अहलुवालिया यांना लाल किल्ल्यातील बादशाहच्या पदावर बसायला सांगितले गेले होते, परंतु शीख धर्मात बादशहाचा कोणताही सिद्धांत नसल्याचे सांगत त्यांनी नकार दिला.

यावर्षी त्यांची तिसरी जन्मशताब्दी पूर्ण झाल्यामुळे जस्सा सिंह अहलुवालिया यांच्या जीवनातील काही खास बाबी व घडामोडी पाहणे नाविन्यपूर्ण ठरते.

बालपणातच युद्ध कौशल्यात प्रवीण बनले!

जस्सासिंग अहलुवालिया यांचा जन्म ३ मे १७१८ ला लाहोरच्या आहलु गावात झाला. त्यांनी बालपणातच युद्धाची कला आत्मसात केली होती. त्यांची ही कला पाहून, १७४८ मध्ये नवाब कपूर सिंग यांनी जस्सासिंग अहलुवालियाला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

जस्सा सिंह आहलुवालिया

अशाप्रकारे, त्यांची राजकीय कारकीर्द नवाब कपूरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली आणि लवकरच त्यांची शीख नेत्यांमधील नामांकित नेत्यांमध्ये गणना केली जाऊ लागली. १७४८ मध्ये नवाब कपूर सिंग यांच्या सल्ल्यानुसार अस्तित्त्वात आलेले ६५ गट त्यांची पुन्हा एकदा ११ गटांमध्ये विभागणी करण्यात आली. आणि त्या समूहाला ‘दल खालसा’ असे नाव देण्यात आले.

जस्सासिंग अहलुवालिया यांना त्यांच्या अद्भुत क्षमतेमुळे शीखांचा सेनापती म्हणून नेमण्यात आले.

१७६१ मध्ये जस्सासिंह अहलुवालिया यांच्या प्रबळ नेतृत्वात, शीखांनी पानिपतच्या युद्धापासून परतत असलेल्या अहमद शाह अब्दालीवर हल्ला केला आणि २२०० हिंदू महिलांना त्याच्या तावडीतून मुक्त करून सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवले.

दिल्लीकडे मोर्चा वळवला.

आता त्यांचे लक्ष्य दिल्ली होते, यासाठी बाबा बघेलसिंग, जस्सासिंग अहलुवालिया आणि जस्सासिंग रामगढियांनी मिळून रणनीती आखली. हे तिघेही वेगवेगळ्या भागातील असले तरी जेव्हा या युद्धाची वेळ आली तेव्हा तिघेही एक झाले आणि त्यांची सेना देखील एक झाली.

बाबा बघेलसिंग, जस्सासिंग अहलुवालिया आणि जस्सासिंग रामगडिया हे शत्रूंचा मागूनच पराभव करत येत असल्याने त्यांचे सैन्य पार यमुनापर्यंत पसरलेले. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत अहमद शाह अब्दालीचा पराभव झाल्यानंतर मराठ्यांची सत्ता बरीच कमी झाली होती आणि ब्रिटीश तेव्हा दिल्लीत आपले स्थान निर्माण करण्यात व्यस्त झालेले.

अशा परिस्थितीचा फायदा घेत शीख सैन्याने वारंवार यमुना नदी ओलांडत, दिल्ली व त्याच्या आसपासच्या भागात आक्रमण केले.

मोगल बादशाह शाह आलमची अस्वस्थता.

दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या ‘दिल्ली फतेह दिवास’ या पुस्तकानुसार, दिल्लीचा लाल किल्ला ताब्यात घेण्यापूर्वी बाबा बघेलसिंग आणि जस्सासिंग अहलुवालिया यांनी गंगा-यमुना दरम्यानच्या अलीगड, टुंडला, हाथरस, खुर्जा आणि
शेखुबाद अशा अनेक स्थळांवर हल्ला केला आणि त्यांच्याकडून कर वसूल केले आणि तेथील नवाबांची संपत्ती देखील ताब्यात घेतली.

शिखांच्या या सततच्या आक्रमणाने मुगल सम्राट शाह आलम त्रस्त झाला होता , म्हणूनच त्याने आपल्या वजीरांना वाटाघाटी करण्यासाठी पाठवले. परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

यामुळेच त्या जागेला नाव मिळाले ‘तिस हजारी’

जस्सा सिंह आहलुवालिया

८ एप्रिल १७८३ रोजी, बाबा बघेलसिंग, जस्सासिंग अहलुवालिया आणि जस्सासिंग रामगढिया यांच्या नेतृत्वात ४० हजार सैनिक बुराडी घाट पार करून दिल्लीत दाखल झाले. अहलुवालिया यांच्या सूचनेनुसार त्यांचे सैन्य तीन भागात विभागले गेले. मजनूच्या टेकडीवर ५ हजार सैनिक तैनात करण्यात आले, तर अजमेरी गेटवर हजार सैनिकांची आणखी एक तुकडी तैनात करण्यात आली आणि उर्वरित ३० हजार सैन्य ज्यामध्ये बहुतांश घोडदळ होते, भाजी मंडई आणि कश्मिरी गेटच्या दरम्यान असलेल्या जागेवर तैनात करण्यात आले.

ज्याला आता तीस हजारी म्हणून ओळखले जाते.

लाल किल्ल्यावर हल्ला करणाऱ्या तीस हजार शीख सैनिकांमुळे त्यास हे नाव देण्यात आले होते, जे तळपत्या तलवारी घेऊन मोगलांना ठार मारण्यासाठी तिकडे तैनात करण्यात आलेले. ही सेना मलकागंज, मुगलपुरा आणि भाजी मंडई मध्ये पसरली.

… आणि जिंकला लाल किल्ला!!

शीख सैन्य दिल्लीत असल्याची बातमी समजताच सम्राट शाह आलम घाबरला आणि मिर्झा शिकोच्या नेतृत्वात महताबपूर किल्ल्यावर शीख सैन्याला त्यांनी रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. परंतु तेथे तो पराभूत झाला आणि तेथून पळून येऊन त्याने लाल किल्ल्याचा लपण्यासाठी आश्रय घेतला.

९ मार्च रोजी फजल अली खा यांनी देखील शीखांना रोखण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

यानंतर शीख सेना ‘वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरूजी की फतेह’ अशी घोषणा देत लाल किल्ल्याच्या दिशेने वळली तर पुढे दुसरीकडे अजमेरी गेटवर असणाऱ्या शीख सैन्याने शहरावर हल्ला केला. ११ मार्च रोजी शीख सैन्याने लाहोरी गेट व मीना बाजार ओलांडले आणि लाल किल्ल्याच्या दिवाण-ए-आम येथे पोहोचुन तो ताब्यात घेतला.

दिमाखात फडकवला ‘केशरी निशान साहिब’

दिवाण-ए-आम ताब्यात घेतल्यानंतर शीख सैन्याने लाल किल्ल्याच्या मुख्य गेटवर खालसा पंथाचे केशरी निशान साहिब हा (ध्वज) फडकविला.

ही घटना इतिहासात प्रथमच घडली जेव्हा शीख सैन्याने पहिल्यांदा लाल किल्ला ताब्यात घेतला.!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here