आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

महमूद बेगडा: एका दिवसात ३५ किलो आहार खायचा हा सम्राट..!


 

या बादशहाची जेव्हा गोष्ट येते, तेव्हा त्याच्या समोर चांगले चांगले खाणारे ही कमीच वाटतात. एखादी व्यक्ती खाण्यासाठी कमावते, परंतु जेव्हा कोणी ही बाब अतिशय गंभीरपणे घेत असेल तरच तेव्हा निश्चितच त्याच्यासाठी पदार्थांची क्रेझ वाढलेली असते.

जर वास्तविक शब्दांत कोणी शब्दशः खादाड म्हणून प्रसिद्ध असेल तर ते बादशाह महमूद बेगडा हे होते. ते गुजरातचे सहावे सुलतान होते. हा पराक्रमी योद्धा आपल्या खादाडपणामुळे त्यांच्या शौर्यापेक्षा ही अधिक प्रसिद्ध होता.
वयाच्या ५३ व्या वर्षापर्यंत सम्राट महमूद बेगडा यांनी राज्य केले.महमूद बेगडा

new google

(ई. १४५९-१५११), जे त्या काळी प्रदीर्घ शासन कर्त्यांपैकी एक होते. सुलतान महमूद बेगडा यांचे शरीर धष्टपुष्ट होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत आकर्षक होते, त्यांची दाढी कंबरेपर्यंत पोहोचली होती. त्याच्या मिश्याही खूप लांब होत्या, ज्याला ते डोक्याच्या मागे बांधत असत. या धष्टपुष्ट शरीराला भरपूर खाण्याची आवश्यकता सततच भासायची. त्याच्या अन्नाशी संबंधित अनेक कथा प्रसिद्ध आहेत, असे म्हणतात की ते भरपूर जास्त प्रमाणात अन्न खायचे.

चला तर मग या लेखातून त्यांच्या या मनोरंजक कथांविषयी जाणून घेऊया.

युरोपियन इतिहासकार बारबोसा आणि वर्थेमा यांच्या म्हणण्यानुसार, एकदा सुलतानला विष देण्याचा प्रयत्न झाला होता, तेव्हापासून सुलतान रोज कमी प्रमाणात विष देण्यात येऊ लागले, जेणेकरुन त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीला विषबाधाचे सवय होईल.

असे म्हणतात की त्यांच्या वापरल्या गेलेल्या कपड्यांना कोणीही स्पर्श करत नसे, कारण विषारी असल्यामुळे ते कपडे जाळून टाकण्यात यायचे. असे म्हटले जाते की ते न्याहारीसाठी एक वाटी मध, एक वाटी लोणी आणि शंभर ते दीडशे केळी खात असत.

(हेही वाचा:’सारे जहां से अच्छा’ लिहिणारा हा देशभक्त नंतर मात्र अचानक बदलला होता.!)

अबब..दररोज ३५ ते ३७ किलो अन्न!

पर्शियन आणि युरोपियन इतिहासकारांच अस म्हणणं होत की सुलतान महमूद बेगडा सर्वांपेक्षा जास्त आहार घेत असत. या इतिहासकारांनी त्यांच्या कथांमध्ये सुल्तान महमूद बेगडा यांचा उल्लेख केला आहे की बादशहा दररोज जवळजवळ एक गुजराती टीला, म्हणजेच सुमारे ३५ ते ३७ किलो अन्न खात असे.!

जेवणानंतरचे गोड मिष्टान्न.

जर आपण त्यांच्या अन्नाचे प्रमाण ऐकून आश्चर्यचकित झाले असाल तर एकदा त्यांच्या जेवणानंतर मिष्टान्न म्हणून खायच्या पदार्थांचे काय स्वरूप असेल हे जाणून घ्यायची नक्कीच उत्सुकता वाटेल.खाल्ल्यानंतर तुम्हाला एक-दोन वाटी गोड पदार्थ खायला आवडत असतील तर हे जाणून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल..

सुलतानसुद्धा या प्रकरणात आघाडीवर आहेत, कारण ते डेसर्ट मध्ये ४ ते ६ किलो गोड भात खायचे.!

महमूद बेगडा

एवढे अन्न खाल्ल्यानंतर सहसा कोणालाही पुन्हा भूक लागणार नाही, परंतु जर ती व्यक्ती सुलतान महमूद बेगडा असेल तर नक्कीच असे होऊ शकते. रात्री अचानक भूक लागल्याने सुल्तान अस्वस्थ होऊ नये, म्हणूनच त्यांच्या दोन्ही उशांजवळ मांस असलेल्या समोशांचे तबक भरून ठेवले जाई.जेणेकरून सुलतान रात्रीची भूक शमवू शकेल.

अशा अनेक कथा सम्राट महमूद बेगडा यांच्याबद्दल लिहिल्या गेलेल्या आहेत, जिथे त्यांच्या खाण्याविषयी तसेच जेवणात
विषाच्या सहभागाची बाबही प्रमुखपणे दर्शविली गेली आहे.

इतिहासकारांनी या जेवणासाठी शौकीन असलेल्या सुल्तानाला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली.

आशा आहे की इतिहासाच्या पानांवरुन बाहेर आलेल्या या सम्राट महमूद बेगडा यांच्या जेवणाच्या वेगळ्या शैलीचा अंदाज वाचायला तुम्हाला नक्कीच आवडला असेल!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here