आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

अमेरिकेचा हा गुन्हेगार लाकडी बंदूक दाखवून जेलमधून पळून गेला होता…!


ही गोष्ट आहे ४ मार्च १९३४ च्या सुमाराची, संपूर्ण अमेरिकेत गोंधळ माजलेला. पोलिस कर्मचाऱ्यांवर लाज येईल अशी गोष्ट घडलेली. एफबीआयचा मोस्ट वॉन्टेड क्रिमिनल जॉन डिलिंजर चक्क लाकडी बंदुकीचा वापर करून लेक काउंटी कारागृहातून निसटलेला!

पोलिसांच्या या चुकीमुळे सामान्य लोक त्यांच्यावर हसत होते. दुसरीकडे, प्रशासन तुरूंगातील अधिकाऱ्यांचे ऐकण्यात व्यस्त होते. प्रत्येकाला आश्चर्य वाटत होते की कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या तुरूंगातून इतक्या सहजतेने कोणी कस सुटू शकेल?

परंतु ज्या लोकांना जॉन माहित होता अशा लोकांना या बातमीने मुळीच आश्चर्य वाटले नाही. जॉन या आधी सुद्धा तुरूंगातून पळून गेला होता. डिलिंजर हा एक कसलेला गुन्हेगार होता. त्याच्या मरणानंतरही लोकांना त्याच्या कारणाम्यांच्या किस्से अजूनही आठवतात.

new google

गुन्हेगार

त्याने तुरूंगातच स्वतःची टोळी सुरू केली!

डिलिंजरने अगदी लहान वयातच गुन्हे करण्यास सुरवात केली. प्रथमच जेव्हा त्याला दोषी ठरविण्यात आले तेव्हा किराणा दुकान लुटल्याबद्दलचा आरोप त्यावर होता. अस म्हंटल जातं की त्यावेळी तो फक्त २० वर्षांचा होता. वयाच्या २० व्या वर्षी डिलिंजरला १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, त्याला साडेआठ वर्षांनंतरच पॅरोल मिळाला. त्यानंतर तो कधीच त्या तुरूंगात परतला नाही.

डिलिंजर सुरुवातीपासूनच हुशार आणि गुन्हेगारी स्वरूपाचा व्यक्ती होता. तुरुंगात घालवलेल्या वेळेमुळे तो अधिकच वाईट बनला होता. मोठ्या गुन्हेगारांशी ओळख होऊन तो त्यांचा मित्र झाला होता. तुरूंगात स्वतः मध्ये सुधारणा करण्याऐवजी त्याने तुरूंगात स्वत: ची टोळी स्थापन केली होती … टोळी बनल्यानंतर त्याने स्वत:ला संपूर्ण गुन्हेगारीच्या जगाशी जोडले.

आता त्याने बँक लुटण्याची योजना आखली होती. २२ मे १९३३ रोजी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर तीन महिन्यांत जॉनने ३ बँक लुटल्या. असे म्हटले जाते की त्या वेळच्या हिशोबा नुसार जॉनने सुमारे ,४०,००० डॉलर लुटले होते. त्यावेळी ही रक्कम खूप जास्त होती. यानंतर जॉनच्या टोळीचे नाव संपूर्ण अमेरिकेत प्रसिद्ध झाले.

पोलिस आणि गुन्हेगारी जगातील प्रत्येकाला जॉनच्या नावाची ओळख पटली. बँकेच्या दरोड्यांनंतर डिलिंजर आणि पोलिसांचा खेळ सुरू झाला,पण हा खेळ फार काळ टिकू शकला नाही आणि 25 सप्टेंबर १९३३ रोजी पोलिसांनी त्याच्या साथीदारांसह डिलिंजरला पकडले.

जेल तोडून तिथून पळून गेला जॉन …

जॉन आणि त्याच्या साथीदारांना तीन बँक लुटल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी पकडले आणि ओहियो तुरूंगात ठेवले. त्याच्या अटकेच्या काही दिवसानंतर, डिलिंजरच्या जुन्या तुरूंगातील पोलिस ओहियो कारागृहात दाखल झाले.

तुरूंगात दाखल झाल्यानंतर ते जेलरशी बोलायला लागले आणि सांगितले की तो आधीच्या तुरूंगातून आला आहे आणि तेथे जॉनने त्याची शिक्षा अद्याप पूर्ण केलेली नाही. म्हणून, ती शिक्षा पूर्ण करण्यासाठी, त्याला मागील कारागृहात परत जावे लागेल. जेलरला हे प्रकरण थोडे संशयास्पद वाटले. म्हणून त्याने पोलिस मुख्यालयात फोन करण्याचा प्रयत्न करतात त्या पोलिसांनी आपली शस्त्रे बाहेर काढली आणि जेलरवर हल्ला केला!

ते कोणीच पोलिस नव्हते. ते जॉनचे मित्र होते, जे त्याला वाचवण्यासाठी बनावट पोलिस बनून आले होते. यानंतर त्यांनी जॉनला शोधलं आणि आपल्याबरोबर घेऊन जाऊ लागले. दरम्यान, खरे पोलिस आणि जॉनच्या साथीदारांमध्ये हाणामारी झाली. त्या धामधुमीत जॉनच्या हातून एका पोलिसाचा मृत्यूही झाला.

बाहेर आल्यावर पुन्हा त्याने बँक लुटण्यास सुरुवात केली अशीच इंडियाना येथील बँक लुटल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण अमेरिकेत जॉनचा शोध सुरू केला. म्हणून तो बराच काळ कोणत्याही एका ठिकाणी थांबत नव्हता. त्याचे नाव पोलिसांच्या यादीमध्ये खूप वर आले होते. फ्लोरिडा नंतर तो टेक्सासला गेला. तेथून पुन्हा एरिझोनाला तो आला पण एरिझोनाच्या स्थानिक पोलिसांनी त्याला पकडले. डिलिंजर पुन्हा एकदा कारागृहात गेला.

लाकडाची बंदूक दाखवून झाला फरार!

जॉनला पोलिसांनी इंडियाना येथे पाठवले, तेथे त्याला क्राउन पॉईंट तुरूंगात ठेवण्यात आले. हे तेच जेल होते ज्यातून जॉन डिलिंजरने त्याचे नाव इतिहासात नोंदवले. इथेच त्याने जे पराक्रम केले ज्यामुळे त्याचे नाव संपूर्ण अमेरिकेत पसरले.

या कारागृहात आल्यानंतर काही दिवसातच तो विचार करत होता की या कारागृहातून आपण कसे बाहेर पडू शकू?. म्हणूनच त्याने एका लाकडाच्या तुकड्याला दाढी करायच्या ब्लेडने कोरायला सुरुवात केली. आणि कोरत कोरात त्याला बंदुकीचे स्वरूप दिले.

जेव्हा ते लाकडी बंदुकीच्या आकारात आले तेव्हा त्याने त्याला शू पॉलिशिंग करून काळे केले. सर्व तयारीनंतर तो त्याच्या खोलीत बसला. जेल कर्मचारी रोज त्याच्या खोलीत तपासणीसाठी येत असत.

गुन्हेगार

त्यादिवशी कर्मचारीही आले आणि जॉनने शिताफीने पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यावर बनावट पिस्तूल ठेवला. त्या पोलिसाच्या मदतीने तो जेलरच्या खोलीत गेला. तेथून पुन्हा त्याने २ मशीनगन चोरुन जेलरच्याच गाडीतून जेल मधून पळ काढला.

जॉनच्या या कारनाम्यामुळेच तो अमेरिकन पोलिसांसाठी सर्वात वॉन्टेड गुन्हेगार बनला. असे म्हटले जाते की जॉन एक प्रकारे सामान्य लोकांमध्ये प्रसिद्ध झाला होता. कोणत्याही सेलिब्रिटीप्रमाणे लोक आता त्याच्या बातम्या वाचू लागलेले. त्यामुळे जॉन एक स्टार बनला होता असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.

जॉन डिलिंजरचा अंत तसाच झाला जसा एका कुख्यात गुन्हेगाराचा होतो. असे गुन्हेगार एकतर तुरुंगात जातात किंवा पोलिसांच्या गोळ्यांचे बळी ठरतात.

सर्वसाधारण जनमानसात प्रसिद्ध झाल्याने गुन्हेगारी क्षेत्र त्याला आणि त्याच्या साथीदारांसाठी धोकादायक बनलेले, पोलिसांनी कसून त्याचा शोध सुरू केलेला अशातच तो एका चित्रपटगृहा बाहेर असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांच्या गोळीने त्याचा मृत्यू झाला!

त्याच्या मृत्यूनंतर ही डिलिंजरची लोकप्रियता आणखीनच वाढली. कारण हॉलीवूडमध्ये त्यावर ‘पब्लिक एनेमीज’ नावाचा चित्रपट बनला होता. या चित्रपटा नंतर लोकांना जॉन किती खतरनाक गुन्हेगार होता याबद्दल माहिती मिळाली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here