आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

BHUJ- THE PRIDE OF INDIA: 300महिलांनासोबत घेऊन पाकिस्तानी वायुदलाला उत्तर देणाऱ्या कमांडरची यशोगाथा!


अजय देवगन, संजय दत्त, शरद केळकर, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही यांचा आगामी चित्रपट ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.अभिषेक दुधय्या दिग्दर्शित सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट म्हणजे पुन्हा एकदा तानाजीला जिवंत केल्यासारखा वाटतो. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाची कहाणी या चित्रपटात दाखविली जाईल.फरक फ़क्त इतकाच ही यावेळी युद्ध आकाशातून लढले जाइल.

Bhuj The pride of India Release Date, भुज द प्राइड ऑफ इंडिया रिलीज Bhuj The Pride Of India, Bhuj The Pride of India Release Date, Bhuj The Pride of India Star Cast,

भुज ही कथा आहे एका कट्टर शिपायाची त्याहीपेक्षा मोठी म्हणजे आपल्या देशावर अपार प्रेम करणार्या सच्च्या देशभक्ताची! १९७१ च्या ज्या युद्धात भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करत पाकिस्तानला शरण येण्यास भाग पाडल होत त्याच युद्धाची ही कथा आहे. ताजमहल प्यार की निशानी है,तो हिन्दुस्थान तेरे बाप की कहानी है हा डायलॉग ऐकला की तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच वर्षा नंतर देशभक्तिवर आधारित एक दमदार एक्शनपट आला आहे.

new google

मराठा सिर्फ दो ही चीज़े जानता है – मरना या मारना हा अजय देवगनचा धासु डायलॉग तानाजी ची आठवण करून दिल्याशिवाय राहत नाही. या मूवी मधे अजय देवगन ने एका एयरफोर्स ऑफिसरची भुमिका केली आहे आणि संजय दत्त ,शरद केळकर यांनीही आपल्या दमदार अभिनयांनी तितकीच चांगली साथ दिली आहे. मेरे मरने का मातम मत करना क्योंकि मैंने खुद ये शहादत चुनी है ! मै जीता हूँ मरने के लिए…मेरा नाम है सिपाही | ट्रेलर मधील अजय देवगनचा हा शेवटचा डायलॉग डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आणतो.

लॉकडाउनमधे सर्वानीच ओटीटी प्लेटफॉर्म वर चित्रपट आणि वेबसिरिज बघत एन्जॉय केलं; पण आज खरच मनापासून वाटतय की हा चित्रपट चित्रपट गृहातच रिलीज व्हायला हवा होता.ट्रेलरच्या सुरुवातीला एका कबुतरासोबत संजय दत्त जरी शांत दिसत असले तरी चित्रपटातील त्यांची भुमिका काही शांततेची नाहीय. ट्रेलर ची आवडती बाजू म्हणजे कुठल्याही एकाच अभिनेत्यावर फोकस होइल असा ट्रेलर मुलिच वाटत नाही तर सर्वच अभिनेते समाधानकारण भाव खाऊन जातात.

सुरुवातीला पाकिस्तानच्या बॉक्सरला जोराचा पंच मारताना दिसणारे शरद केळकर यांची इंडियन आर्मीच्या जवानाची भुमिका कमालीचा भाव खाऊन जाते. सोनाक्षीची एक्टिंग वगळता भुज मधील तिच्या वाट्याला आलेला रोल मात्र दमदार आहे. नेहमीच एक से बढ़कर एक गाण्यावर थिरकताना दिसणार्या नोरा फतेहिच्या तोंडून इतके भारी डायलॉग ऐकायला मिळने म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

याखुदा तेरी अदालत में मेरी एक जमानत रखना में रहू या ना राहू हिन्दुस्थान को सलामत रखना…या
नोराच्या डायलॉगवरुन चित्रपटातील देश्भाक्तिचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here