आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

दक्षिण कोरियाई म्युझिकला चांगले दिवस आणणारा ‘बीटीएस’ हा ७ पोरांचा ग्रुप सध्या जगभरात गाजतोय..!


जगभरात अनेक गायक गायिका आहेत ज्यांनी तरुणाईला अक्षरशा आपल्या गायनाने वेड लावले आहे. यात प्रामुख्याने
आपण जस्टिन बिबर च नाव ऐकला असेल, अंजेलिना जोली ऐकला असेल. पण आज 7 कोरियन मुलांच्या एक बैंडने
जस्टिन बिबरला देखील लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे असे म्हणायला हरकत नाही.

जर तुम्हाला BTS बैंड ग्रुप बद्दल अजुन माहितच नसेल तर बॉस तुम्ही नेमका काय करताय? तर आजची ख़ास माहिती त्यांच्यासाठी ज्यांना बीटीएस बैंड विषयी काहीच माहित नाहिये आणि त्यांच्या साठी देखील आहे जे बीटीएस चे दीवाने आहेत.

आता सुरुवात करुया की हा बीटीएस बैंड म्हणजे नेमकं काय? किंवा या बीटीएस चा अर्थ काय आहे? तर मित्रांनो,
बीटीएस म्हणजे बँगटन सेयोदेन. याचा कोरियाई अर्थ म्हणजे पडल्यानंतर पुन्हा उठून उड़ने. दक्षिण कोरियाई म्युझिकला चांगले दिवस आणणारा हा 7 कोरियन पोरांचा ग्रुप म्हणजेच बीटीएस.

new google

खुप कमी वेळात या 7 पोरांनी जगभरात प्रसिद्धि मिळवली आहे. टाइम्स मॅगझिनने 25 सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीमध्ये या बँडचे नाव दिले आहे. हे बँड इतके हिट आहेत की ज्याला दक्षिण कोरियन भाषा माहितसुद्धा नाही असे लोकदेखील आग्रहाने या बॅण्डची गाणी ऐकतात.

या बॅन्डने अलीकडे गायलेल्या डायनामाइट एन्ड बटर तसेच परमिशन टू डांस या गाण्यानी बर्‍याच विक्रमांची नोंद केली आहे. बीटीएस बॅन्डचे चाहते स्वत: ला बीटीएस आर्मी असं म्हणतात. २०१०-११ च्या काळात उदयाला आलेल्या या बैंड
मध्ये 20 ते 24 वर्षांची 7 तरुण पोरं आहेत.

तसं बघितल तर बिग हिट ऑडिशनने हा बॅन्ड शोधला होता जो २०१३ मधे पूर्ण झाला. सुरुवातीच्या काळात 2 kool,4 school आणि नो मोअर ड्रीम ही त्यांची विशेष गाजलेली गाणी आहेत. बीटीएस या दक्षिण कोरियन बँडने अनेक संगीत पुरस्कारही जिंकले आहेत

ते सामाजिक गोष्टींवर देखील आपली मतं व्यक्त करतात तसेच गरजू लोकांना मदत देखील करतात. या तरुण पोरांच कौतुक यासाठी करावं वाटत कारण ही पोरं विशेष आत्महत्या,महिला सशक्तिकरण, आत्मनिर्भरता, मानसिक आरोग्य, ड्रग्स आणि समाजातील अनेक नवनवीन विषयांवर गाणी बनवून ती सादर करतात.

ज्यामुळे समाजात एक प्रकारचा चांगला संदेश देखील पोचवला जातो. या बीटीएस बैंडची चाहते मंडली स्वतःला बीटीएस आर्मीचा एक भाग समजतात. संगीत जगतात स्वतःचा एवढा दबदबा निर्माण करणार्या या बीटीएस बँडमधील 7 पोरांविषयी जानुन घेउया ज्यांनी जगाला वेड लावलं आहे. तरुणांमधे प्रचंड प्रमाणात क्रेझ असलेला हा बैंड जगभरात कॉन्सर्ट करत
फिरताना दिसतो. मग बघुया आजच्या भागात की कोण कोण आहेत या बैंड चे सदस्य .

1- आरएम (रॅपमॉन्स्टर), किम नाम जून टीम लीडर

1. किम नामजुन (RM रैप मास्टर) –

किम नामजुन हा बीटीएसचा पहिला सदस्य आणि रैपर असून १२ सप्टेम्बर १९९४ ला त्याचा जन्म झाला ज्याला RM म्हणजे रैप मास्टर म्हणून ओळखले जाते. दक्षिण कोरियन रॅपर, गीतकार, गायक आणि रेकोर्ड निर्माता आहे. तो बिग हिट एन्टरटेन्मेंट अंतर्गत दक्षिण कोरियन पॉप बँड बीटीएस चा लीड रैपर आणि नेता आहे. 2015 मध्ये, त्याने त्याचा पहिला एकल मिक्स्टेप, आरएम रिलीज केला होता.

2- जँगकूक (जियोन जँगकूक): जेव्हा जंगकूकने बीटीएसमध्ये पदार्पण केले तेव्हा तो फ़क्त 15 वर्षांचा होता. जन्ग्कूक बुसान सुपरस्टार ऑडिशन्समध्ये गेला परंतु तेथे त्याची निवड झाली नाही. 7 एजन्सींज त्याला स्काउट करण्यास
सांगितले. त्या एजन्सीपैकी जँगकूकने बीटीएस निवडले कारण त्याला आरएमची रेपिंग ख़ास आवडली. विशेष म्हणजे हाच जँगकूक आज मुलींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.

बीटीएस

3- व्ही (किआयएम टाय ह्युंग) : व्ही हा एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. संगीतकार होण्याचे त्याचं लहानपनापासूनचं स्वप्न होते. तो बिग हिट एन्टरटेन्मेंटला ऑडिशन देण्यासाठी मित्रासोबत गेला होता. पण तिथे व्ही.ला बघून बीटीएसच्या एका सदस्याने त्याला ऑडिशन देण्यास सांगितले, म्हणून त्याने आपल्या वडिलांना विचारले आणि तिथे
ऑडिशन दिली आणि त्याची निवड झाली. तो बँडसाठी सब व्होकल्स गातो तसेच व्ही ला आर्ट आणि फोटोग्राफी आवडते आणि तो अभिनेता म्हणूनही काम करतो.

4-सुगा (मिन युन गि) : सुगाने हायस्कूलमधून रॅपिंग करायला सुरूवात केली आणि स्वतःचे नाव ग्लोस असे ठेवले. सुगा रैपर आणि निर्माता म्हणून देखील ओळखला जातो. बिग हिट एन्टरटेन्मेंट मध्ये त्याने रैपिंग कांटेस्ट त्याने ‘हिट इट’ मध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा तो जिंकु शकला नाही पण त्याने द्वितीय क्रमांक मिळवला. यानंतर बिग हिटने प्रशिक्षणार्थी निर्माता म्हणून सुगाला साइन केले. २०१० मध्ये तो या बॅन्डमध्ये सामील झाला.

5-जिन (किम सीओक जिन): किम सीओक जिन ज्याचे स्टेजनाव जिन असून हा दक्षिण कोरियातील प्रसिद्ध गायक, गीतकार असून २०१३ पासून तो बीटीएस चा सदस्य आहे. किमने बीटीएस सोबत तीन सोलो ट्रॅक सहलिखित करून रीलिज
केले आहेत. 2019 मध्ये, जिनने त्याचे पहिले स्वतंत्र गाणे,’टुनाइट’ डिजिटल ट्रॅक प्रदर्शित केले होते.

6-जिमीन (पार्क जी मिन): बीटीएस ग्रुपमधील सर्वात शेवटी बैंड जॉइन केलेला पोरगा म्हणजे पार्क जिमिन ज्याला आज सर्व जिमिन नावाने ओळखतात. जिमिन एक आर्ट स्टुडंट असून डांसर देखील आहे. त्याने बीटीएस ऑडिशन दिली
आणि 2013 मध्ये बीटीएसमध्ये रुजू झाला. ग्रुपमधील सर्वात जास्त केयरिंग व्यक्ति म्हणजे जिमिन पार्क आहे.

7- जे होप (जंग हो सीओक): जे होप बीटीएसमध्ये जाण्यापूर्वी एक डान्सर आणि ग्वांगजू डान्स क्रू न्यूरोनचे सदस्य होता. जेवायपी मध्ये ऑडिशन दिल्यानंतर काही फेरयानंतर त्याला काढून टाकण्यात आले आणि मग जे होपचा दमदार
बीटीएस प्रवास सुरु झाला. बीटीएस मध्ये होप एक उत्तम रैपर आणि खुप चांगला डांसर आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here