जादूई फिरकी गोलंदाजीने दिग्गज फलंदाजांना नाचवणाऱ्या अमित मिश्राची कारकीर्द म्हणावी तशी फुललीच नाही..!


भारतीय संघात स्थान मिळवणं हे कोणत्याही खेळाडूला सोपी नाहीये. अथक परिश्रम आणि मोठ्या सहनशीलतेनंतरच देशाकडून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळतेय. पण असे काही खेळाडू आहेत ज्यांना परिश्रम करुनही त्यांना यश मिळू शकलं नाहीत ज्याचे ते पूर्ण हक्कदार होते.

आम्ही बोलतोय भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राबद्दल. तोच अमित मिश्रा ज्याची कहाणी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या राजेंद्र गोयल सारखीच दिसतेय. तोच अमित मिश्रा ज्यानं आयपीएल आणि स्थानिक क्रिकेटमध्यं आपल्या जादूई फिरकी गोलंदाजीच्या जोरावर भल्या-भल्या फलंदाजांना नाचवलं. गोलंदाजीत दमदार कामगिरी करूनही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो जास्त सामने का खेळू शकले नाही? त्याच्या कारकीर्दीत कोणत्या गोष्टींचा अडथळा आला? ज्यामुळं त्याची कारकीर्द फुललेली नाही, याचाच आढावा आजच्या या लेखात आपण घेणार आहोत.

24 नोव्हेंबर 1982 साली हरियाणाच्या फरिदाबाद येथील सधन कुटुंबात मिश्राचा जन्म झाला. त्याचे वडील रेल्वे खात्यात तर आई गृहिणी. आईवडिलांनी लहानपणीच त्याला क्रिकेटसाठी प्रोत्साहन दिलं. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत लेगस्पिनर म्हणून ओळख निर्माण करणार्या मिश्रानं आपल्या कारकिर्दीची सुरुवात एक फलंदाज म्हणून केली होती.

17 वर्षांखालील क्रिकेटमध्ये त्यानं आपल्या बॅटनं धावांचा पाऊस पडला, पण त्याचे प्रशिक्षक संजय भारद्वाज यांनी त्याच्यातील लेगस्पिनरचं कौशल्य ओळखून त्याला फिरकी गोलंदाज होण्याचा सल्ला दिला. वेळेनुसार मिश्रानेदेखील आपल्यामध्ये बदल करत एक गोलंदाज बनला.

अखेर 2000 साली त्याला हरियाणाच्या रणजी संघाकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये धमाकेदार धमाकेदार कामगिरी केल्यानंतर अखेर त्याला भारतीय संघात एण्ट्री मिळाली. 2003 साली भारत बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या त्रिकोणी मालिकेत निवड समितीनं त्याला संधी दिली.

या त्रिकोणी मालिकेत ढाका येथे झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात त्यानं पदार्पण केलं. पण पुढचा सामना खेळण्यासाठी त्याला खूप वाट पाहावी लागली. 2008 साली त्याच्यासाठी कसोटी संघाची दारं खुली झाली. 2008 साली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत अनफिट अनिल कुंबळेच्या जागी त्याची निवड झाली. मोहाली येथे झालेल्या पदार्पणाच्या पहिल्याच कसोटी सामन्यात 7 बळी घेऊन आपल्यातलं कौशल्य सिद्ध केलं.

चांगली कामगिरी करूनही त्याला दुसर्या कसोटी सामन्यात त्याचं स्थान पक्कं नव्हतं.अखेर त्याला नशिबाचीही थोडीफार साथ मिळाली. हरभजनसिंग जायबंदी झाला अन् मिश्राला खेळण्याची संधी मिळाली. या कसोटी मालिकेच्या चौथ्या सामन्यापूर्वी अनिल कुंबळेनं क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. म्हणून अमित मिश्रा लेगस्पिनर च्या रुपात भारतीय संघाची पहिली चॉइस बनला.

2009 साली श्रीलंकेविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर मिश्राला पुन्हा वगळण्यात आलं आणि प्रग्यान ओझा ची संघात वर्णी लागली. 2010 बांगलादेशविरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजीत महत्त्वपूर्ण योगदान देत संघाला 113 धावांनी विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. यात त्यानं गोलंदाजीत सात विकेट घेतले तर दुसऱ्या डावात अर्धशतक ठोकलं, तरीही त्याला पुन्हा ड्रॉप करण्यात आलं.

चांगली कामगिरी करूनही त्याला वारंवार ड्रॉप का केलं जात होतं? याचं उत्तर फक्त निवड समितीच देऊ शकत होती. अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांचं स्थान पक्क असल्यानं आणि त्यांच्यानंतर आर अश्विनची संघात एण्ट्री झाल्यानं अमित मिश्राला बाजूला ठेवण्यात आलं.

अनिल कुंबळेच्या निवृत्तीनंतर हरभजन सिंग देखील खराब परफॉर्मन्स मुळं बाहेर पडला. त्यानंतरही मिश्राला नो चान्स होता. यावेळी निवड समितीनं खराब क्षेत्ररक्षणाचा कारण पुढं देऊन त्याच्याजागी युवा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना आजमावून पाहिलं. पुढं हळूहळू अमित मिश्रा निवड समितीच्या नजरेपासून दूर होत गेला.

अमित मिश्रा

निवड समितीला त्याला वारंवार संधी दिली असती तर त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फुलली असती. कसोटीत एक टेंलेंडर बॅट्समन म्हणून त्यानं आपलं कौशल्य सिद्ध केलं होतं. 2011 साली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात  84 धावांची खेळी केली होती तर रणजी क्रिकेटमध्ये त्यानं द्विशतकही ठोकलं होतं.

जर मिश्राचा दिवस असेल तर तो एकहाती सामने जिंकून देत होता. 2013 साली झिम्बाब्वेविरूद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतील पाच सामन्यात त्याने 18 तब्बल विकेट घेऊन आपली क्षमता दाखवली. त्यानंतर 2016 साली त्यानं न्यूझीलंडविरूद्धच्या पाच सामन्यांत 15 बळी घेऊन मालिकावीराचा पुरस्कार देखील पटकावला.

अमित मिश्राने भारतीय संघाकडून 22 कसोटी 76, 36 वनडे सामन्यात 64 तर 8 टी ट्वेंटीमध्ये 13 बळी घेतलेत. अमित मिश्राच्या फिरकीची जादू आयपीएलमध्ये सर्वाधिक चालली. आयपीएलमध्ये तीनदा हॅटट्रिक घेणारा तो पहिला गोलंदाज ठरला. त्यानं 2008 साली डेक्कन चार्जर्स, 2011 साली किंग्ज इलेव्हन पंजाब तर 2013 साली पुणे वॉरियर्स संघाविरुद्ध हॅट्रिक घेतली होती.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज आहे. आयपीएलमध्ये त्यानं 154 सामन्यात 166विकेट घेतल्या आहेत. लवकरच तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या लसिथ मलिंगाचा देखील विक्रम पाठीमागे टाकू शकतो.

कर्णधाराचा पाठिंबा, उत्तम युवा खेळाडूंचा भरणा आणि निवड समितीचं दुर्लक्ष यामुळं अमित मिश्रा भारतीय संघात आपलं स्थान कायमचं पक्कं करु शकला नाही. सध्या तो 38 वर्षांचा झालाय. पुन्हा भारतीय संघात पुनरागमन करेल, याची शाश्वती फारच कमी आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here