आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

नाचणाऱ्या हिराबाईच्या  प्रेमाखातर क्रूर औरंगजेब धर्माच्या मर्यादा देखील ओलांडायला तयार झाला होता..!


सहावा मुग़ल सल्तनतचा वारस किंवा राजा म्हणजे औरंगजेब बादशहा. हा तोच औरंगजेब आहे ज्याच्याविषयी आपण इतिहासाच्या पुस्तकांतुन वाचलय किंवा मुघल बादशहांपैकी सर्वात जास्त क्रूर राजा म्हणजे औरंगजेब अशी ज्याची
ओळख आहे. आपण कधीकधी अगदी सहज म्हणून जातो की, इतिहास गवा है…पण खरच इतिहास साक्ष देतो या
औरंगजेबाच्या क्रुरपणाची!

१६५८ ते १७०७ इतका कालखंड मुघलांची गादी सांभाळलेल्या या बादशाहाच्या नावाजलेल्या लवस्टोरी बद्दल आज
आपण युवाकट्टाच्या या लेखाद्वारे जानुन घेणार आहोत. आता मुग़ल म्हटले की जवळपास सर्वच बादशाह हे रागीट किंवा अतिशय क्रूर असेच आपल्या वाचनात आलेले आहेच. आता त्यातल्या त्यात औरंगजेब म्हणजे मात्र कृरतेचा कळसच! कारण त्याच्या क्रोर्याचे किस्से ऐकताना भलेभले घाबरत होते हे आपण वाचलेलं.

असे म्हटले जाते की औरंगजेब हा रक्तपात करणारा असा मुघल होता, ज्याने आपल्या वडिलांना तुरूंगात टाकले, आपल्या भावांचा व पुतण्यांचा निर्घृणपणे खून केला तसेच आपल्या प्रजेवर पाशवी कृत्य करत त्याने शेकडो हिंदू मंदिरांचा नाश केला. असही मुग़ल साम्राज्य काळात हिन्दू मंदिरांची मुघलांनी केलेली नासधुस आपल्या सारख्या मराठ्यांना माहितच आहे.

आता भल्याभल्यांना आवरला नाही तो स्त्रिमोह या औरंगजेबाला काय आवरणार? मुळातच कृरतेचा कळस म्हणून
ओळख जरी असली तरी औरंगजेबाचे मन मात्र एक मुलीसाठी धडपडत होते. प्रेम आंधळ असत म्हणतात न…त्यातलाच काहीसा प्रकार. कारण या हसीनासाठी औरंगजेब काहीही करायला तयार होता,कुठल्याही मर्यादा ओलांडायला तयार होता.

अगदी मद्य देखील प्राशन करायला तो मागेपुढे बघत नसे. आम्ही मद्याचा विषय यासाठी सांगतोय कारण औरंगजेबाचा धर्म मद्य प्राशन करण्याची परवानगी देत नाही. म्हणजे थोडक्यात या हसीनासाठी तो धर्माच्या नियमांविरोधात जायला देखील मागेपुढे पाहत नसे.

हेही वाचा: मुघलांचा पाडाव करून हिंदू साम्राज्याची स्थापना सम्राट हेमूने केलेली..!

तर, आपल्या मृत्यूपर्यंत राज्य करणाऱ्या  औरंगजेबाचा जन्म 4 नोव्हेंबर, 1618 रोजी झाला. तो मुघल सम्राट शाहजहांचा मुलगा होता. सुरुवातीपासूनच स्वभावाने कठोर असल्या कारणाने, लवकरच त्यांना कारभाराची जबाबदारी सोपविण्यात आली. १६३६ मध्ये त्याला डेक्कनचा राज्यपाल बनविण्यात आले.

आपल्या नवीन जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी तो बुरहानपूरला पोहोचला. तिथे त्यांचे स्वागत करण्यासाठी काका सैफ खानने त्यांच्या राजवाड्यात रंगीबेरंगी कार्यक्रम आयोजित केला. याच वेळी त्यांची हिराबाईंशी भेट झाली. हिराबाईंची ओळख अशी होती की,ती लहानपणा पासूनच कोठ्यात वाढली होती. असे म्हटले जाते की, हिराबाई इतकी सुंदर होती की पहिल्यांदाच औरंगजेबाने तिला बघितल्यावर स्वतःचे बनवण्याचा विचार केला होता.

हिराबाई विषयी अधिक बोलायचे झाल्यास , ती केवळ सुंदरच नव्हती, तर संगीताचीही कला तिला अवगत होती. सम्राटापासून ते द्वारपाल पर्यंत प्रत्येकजण तिच्याबद्दल वेडा असायचा. हे सर्व जाणून घेतल्यावर औरंगजेब तिच्याशी जवळीक वाढवण्यासाठी अधिक उत्सुक झाला. त्याने आपल्या मनातील ही बाब काकू मलिकाबानू यांना सांगितली.

परंतु हिराबाई कोठेवाली असल्याने तिची मावशी आणि काका दोघेही या नात्याविरूद्ध होते. परंतु या औरंगजेबाची दहशतच इतकी होती की, ते त्याच्यासमोर काहीही करू शकले नाहीत ; उलट त्याना औरंगजेबाची मदतच करावी लागली. आता बघुया की हिराबाई आणि औरंगजेबाची भेट कशी झाली ते- औरंगजेबाला भेटण्याची इच्छा असल्याचे हिराबाईंना सांगण्यात आले. तो मुघल सम्राटाचा राजपुत्र असल्याने हिराबाईंसाठी ही भेट विशेष होती. या निमित्ताने तिने एक खास मेकअप केला आणि औरंगजेबासमोर स्वत: ला सादर केले.

या पहिल्याच भेटीत हिराबाईंनी औरंगजेबाला पूर्णपणे स्वत: चे बनवले. तिच्या सौंदर्याची जादू त्याच्यावर अशा प्रकारे झाली  की तो  इतर कोणाचाही विचार करू शकत नवता. असे म्हणतात की हिराबाईंना भेटल्यानंतर तो आपल्या राजवाड्यात परत आला , परंतु त्याचे हृदय मात्र हिराबाईंकडेच राहिले.

झोपेत असताना सुद्धा तो फक्त हिराबाईचाच विचार करत असे.. औरंगजेबाने अगोदरच हिराबाईला जैनाबादी हे नवीन नाव दिले होते. तिच्या इश्काचा रंग औरंगजेबावर अशा प्रकारे चढला होता की त्याने हिराबाईलाच आपली बेगम बनविन्याचे ठरवून टाकले.

औरंगजेब
तसा औरंगजेब धर्मांधपणाने आपल्या धर्मावर विश्वास ठेवत असत. तो एक कट्टर धर्मवादी होता. दिवसातून पाच वेळा नमाज असो किंवा मद्यापासून दूर रहाने. पण असं म्हणतात की प्रेमाच्या नशेमध्ये माणसाला काहीच आठवत नाही, तोच प्रकार औरगजेबाच्या बाबतीत घडला होता. हिराबाईसाठी तो धर्माच्या कोणत्याही मर्यादा तोडण्यास तयार होता.

एक दिवस तो हिराबाईसमवेत आपल्या खोलीत होता. दरम्यान, हिराबाईंनी एक वाइनचा पेला त्याच्या दिशेने उचलला आणि त्याला ते पिण्यास सांगितले. सुरुवातीला त्याने आपल्या धर्माचा हवाला देऊन नकार दिला, परंतु जेव्हा हिराबाईने त्यांच्या  प्रेमाची गळ घातली, तेव्हा त्याने क्षणार्धात तो मद्य प्याला पिण्यासाठी घेतला, परंतु हीराबाईने तो वाईन ने भरलेला प्याला पिण्यापूर्वीच तोडला. कारण खरं तर, तिला औरंगजेबाचे स्वतःवरचे प्रेम पहायचे होते.

औरंगजेबच्या आयुष्यातील बदलांची ही फ़क्त एक सुरुवात होती, जी त्याच्या प्रेमामुळे होत होती. अजून
बरेच काही यायचे बाकी होते.

हेही वाचा: उत्तर कोरियात फिरायला गेलेल्या या तरुणाने कोरिया हुकुमशाहीचे खरे स्वरूप जगासमोर आणले होते..!

हिराबाईवरील त्याचं प्रेम जसजसं वाढत गेलं, तसतसे त्यांनी आपल्या कामात रस दाखवणेही थांबवले. त्याने अधिकाधिक वेळ हिराबाईबरोबर घालवायला सुरुवात केली. दोघांचेही प्रेम शिगेला होते. या दरम्यान, हिराबाई ही एका जिवघेन्या आजाराची शिकार झाली. आणि मग हळूहळू त्यांच्या प्रेमाचा असर कमी-कमी होऊ लागला.

हिराबाईच्या प्रेमात फार  वेड्या झालेल्या औरंगजेबाला हे थोडेच मान्य असणार आहे? हिराबाईंचे आरोग्य सुधारण्यासाठी त्यांने मोठ्या संख्येने हाकीम ठेवले. यानंतरही त्यांना आराम मिळाला नाही म्हणून, औरंगजेबाने त्यांच्यासाठी नवस देखील केले. असे असूनही तो हिराबाईला वाचवू शकलानाही. असे म्हणतात की औरंगजेब हिराबाईच्या मृत्यूनंतर पूर्णपणे खचला होता.

आता हे मात्र दुर्दैवच म्हणावे लागेल की, एका मोठ्या काळासाठी हिराबाईच्या प्रेमात औरंगजेब आखंड बुडाला होता परंतु तिला तो आपली पत्नी बनवू शकला नाही. असेही नाही की हिराबाईखातिर त्याने लग्नही केले नाही. त्याने एक नव्हे तर अनेक विवाह केले.

दिलराज बानो बेगम ही औरंगजेबाची ची पहिली पत्नी झाली. 1637 मध्ये औरंगजेबाने तिच्यासोबत लग्न केले होते. बानो बेगमच्या स्मरणार्थ, औरंगाबादमध्ये 1651 ते 61 दरम्यान एक मकबरा बांधला गेला जो अगदी ताजमहालसारखा दिसतो.  मकबऱ्याला याच कारणास्तव दक्षिणेचा मुकुट किंवा ताजमहलाची प्रतिकृती असेही म्हणतात.

आता राहिला प्रश्न हिराबाईचा तर जरी त्याला रान्यांची कमी नव्हती किंवा तो या विरहाच्या धक्क्यातून सावरायला जरी सक्षम होता तरी देखील त्याला स्वतःला सावरायला बराच वेळ लागल. दरम्यान याच काळात १६३८ मध्ये, मुगल सम्राट शाहजहांने राजा ताजुद्दीन जरुलची मुलगी नवाबबाई यांना त्याचा मुलगा औरंगजेबशी लग्न करण्याची विनंती केली, त्यानंतर दोघांनीही गाठ बांधली आणि औरंगजेबाला नवाबबाईकडून तीन मुलेदेखील झाली.

औरंगाबादी महल मोगल ही सम्राट औरंगजेबची तिसरी पत्नी होती. महल मोगलविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही, तरीही असा विश्वास आहे की औरंगाबादी महलचे लग्न औरंगाजेबशी 28 सप्टेंबर 1661 मध्ये झाले होते. औरंगजेबाला तिच्यापासून मुलगी झाली. तसेच १६८८ मध्ये औरंगाबादी महल ला प्लेगची बाधा झाली आणि त्यातच तिचे निधन झाले.

अशी मान्यता आहे की या नंतर औरंगजेबाच्या आयुष्यात कोणतीही स्त्री आली नाही.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here