आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चंबळच्या काठांवर राज्य करणाऱ्या या दरोडेखोरांच्या नावाने लोक थरथर कापत असत…!


कधीकधी परिस्थिती एखाद्या व्यक्तीला इतकी लाचार करते की तो चुकीच्या मार्गाला जातो आणि दरोडेखोरांच्या टोळीचा भाग बनू शकतो. एकेकाळी चंबळच्या काठांवरही दरोडेखोरांची सत्ता होती.

अनेक वर्षांपासून आपण दरोड्यावर आधारित बॉलिवूड चित्रपट पहात आहोत. चित्रपटाची कथा पाहिल्यास हे एवढं तरी समजल आहे की कोणतीही व्यक्ती दरोडा घालण्यासाठी कधीच खुश होत नाही.

चंबळ मध्ये घरोघरी फूलन देवी, पानसिंग तोमर आणि मानसिंग यांच्यासारख्या डाकुंची भीती होती. इतकेच नाही तर मुलांना भीती घालण्यासाठी त्यांच्या आजी त्यांना दरोडेखोरांच्या कथा सांगायच्या. जर या दरोडेखोरांच्या कहाण्या तुमच्या मनातुन धूसर झाल्या आहेत, तर मग या.. पुन्हा एकदा या लेखातून त्यांची कहाणी जाणून घेऊया…

new google

हेही वाचा: मुघलांचा पाडाव करून हिंदू साम्राज्याची स्थापना सम्राट हेमूने केलेली..!

१. फूलन देवी: फूलन देवी डाकू स्वत:च्या आनंदातून बनलेली नव्हती, तर उच्च जातीच्या लोकांनी केलेल्या अत्याचारानंतर ती डाकू बनलेली. असे म्हणतात की बालपणी बेहमई गावच्या राजपुतांनी फूलन देवीवर सामूहिक बलात्कार केला.
सूड म्हणून तिने २२ राजपूतांना जाहीरपणे मारले आणि सर्वांच्या नजरेत भितीदायक डाकू बनली. १९८३ मध्ये फुलन देवी यांनी शासनाच्या समजावणी नंतर आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पणानंतर फूलन देवी उर्फ ​​डाकू राणीने राजकारणाचा मार्ग निवडला आणि ती विधानसभेची सदस्य झाली.

२. डाकू मान सिंह: डाकू मान सिंहला चंबळच्या इतिहासातील सर्वात भयानक दरोडेखोर म्हटले जाते. मान सिंह यांचा जन्म खेडा राठोड गावातील राजपूत कुटुंबात झाला. स्थानिक लोकांनी मान सिंगला रॉबिन हूड या नावाने देखील संबोधले.
आपल्या हयातीत मान सिंहने १,११२ दरोडे आणि १८५ खून केले आहेत. १८५ खूनांमध्ये त्याने ३२ पोलिसांना ठार मारले होते.

असे म्हणतात की १९५५ मध्ये तो एका झाडाखाली बसला होता, तेव्हा अचानक त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आले. अस देखील म्हणतात की मान सिंह चांगल्या लोकांशी चांगला वागायचा.

हेही वाचा: उत्तर कोरियात फिरायला गेलेल्या या तरुणाने कोरिया हुकुमशाहीचे खरे स्वरूप जगासमोर आणले होते..!

३. निर्भयसिंग गुर्जर: लोक निर्भयसिंग गुर्जर यांना नक्षलवादी म्हणूनही ओळखतात, जो चंबळच्या डाकूंमध्ये शेवटचा डाकू होता. निर्भयसिंग गुर्जर याच्यावर सुमारे २०५ गुन्हे दाखल होते. एक काळ असा होता की नक्षलवादी म्हंटल की लोक थरथरायचे, पण वेळ बदलली आणि २००५ मध्ये तो एका मोठ्या चकमकीत मारला गेला.

४. पानसिंग तोमर: पानसिंग तोमर हा फक्त एक डाकू नव्हता तर तो चॅम्पियन आणि सैनिक देखील होता. पानसिंग तोमर एक सामान्य व्यक्ती देखील होता, जो करिअरमध्ये खूप चांगले काम करत होता, परंतु परिस्थितीमुळे आणि लोकांनी त्याला डाकू बनण्यास भाग पाडले.

दरोडेखोर
१९८१ मध्ये इंस्पेक्टर महेंद्र प्रतापसिंह चौहान यांनी पानसिंग तोमरला सापळा लावून ठार केले. सैनिक आणि चॅम्पियनची
असलेल्या पानसिंग तोमर याची कहाणी इतकी रंजक होती की त्याच्यावर बॉलिवूडमध्ये चित्रपट बनला.

५. जगजीवन परिहार: जगजीवन परिहार हा चंबळचा धोकादायक डाकू होता, ज्याला पकडण्यासाठी ७.२५ लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. पोलिसांकडून वाचण्यासाठी जगजीवन अनेक युक्त्या करत. कित्येकदा तो साडी नेसून त्यांना चकमा देण्यात यशस्वी झाला होता. परंतु, हा क्रम फार काळ टिकू शकला नाही आणि २००७ मध्ये तो मुरैना जिल्ह्यात झालेल्या चकमकीत मारला गेला.

६. सीमा परिहार: दशकभर चंबळच्या दऱ्याखोऱ्यांवर राज्य करणारी सीमा परिहार ही एक दरोडेखोर होती जी फुलन देवीने पासून प्रेरित झालेली. वयाच्या १३ व्या वर्षी सीमाचे डाकुंनी अपहरण केले, आणि त्यानंतर तिचे आयुष्य बदलले आणि ती दरोडेखोर बनली.

परंतु कालांतराने तिने दरोडा घालणे सोडून सामान्य जीवन जगण्याचा निर्णय घेतला. नंतर सीमा परिहार नेता बनली तसेच ती बिग बॉसमध्ये देखील दिसली आहे.

आज परिस्थिती बदलत आहे, परंतु एक काळ असा होता जेव्हा दरोडेखोरांच्या भीतीमुळे लोक दिवसा देखील चंबळला जायला घाबरत असत.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

नाचणाऱ्या हिराबाईच्या प्रेमाखातर क्रूर औरंगजेब बादशहा धर्माच्या मर्यादा देखील ओलांडायला तयार झाला होता..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here