आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

चार्ली चॅपलिन हा केवळ हॉलिवूडच नाही तर जगातील सर्वात मोठा कॉमेडियन म्हणून अजूनही प्रसिद्ध आहे.


बॉलिवूड असो वा हॉलीवूड, प्रत्येक कलाकारासाठी विनोद करणे हे सर्वात कठीण काम आहे. प्रत्येक कलाकार रोमान्स, ऍक्शन आणि रडारडी स्क्रीनवर करतच असतात.

परंतु कॉमेडीच्या अचूक वेळेमुळे प्रेक्षकांना हसवणे हे टॅलेंट प्रत्येकाला जमत नाही. म्हणूनच प्रत्येक कलाकाराला विनोद करणे सर्वात कठीण काम वाटते. मेहमूद, जगदीप, असरानी, ​​जॉनी लीव्हर आणि राजपाल यादव यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक कलाकार याची परिपूर्ण उदाहरणे आहेत.

हॉलिवूडबद्दल बोलताना प्रत्येकाच्या मनात येणारे पहिले नाव चार्ली चॅपलिन आहे. चार्ली चॅपलिनला फक्त हॉलीवूडच नव्हे तर जगातील सर्वात मोठा विनोदकार मानले जाते. चार्ली चॅपलिनही खास होते कारण ते काहीही न बोलता लोकांना हसवायचे.

शब्दाच्या जोरावर प्रेक्षकांना हसविणे अजूनही सोपे आहे, परंतु शब्द न बोलता आपल्या अभिनायसह लोकांना हसवणे सर्वात कठीण काम आहे. चार्ली चॅपलिन याच कामाचे बेताज राजा होते.

चार्ली चॅपलिन कोण होता?

चार्ली चॅपलिनचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी इंग्लंडमध्ये लंडन येथे झाला होता. सर चार्ल्स स्पेन्सर चॅपलिन एक ब्रिटिश विनोदी कलाकार, चित्रपट निर्माता आणि संगीतकार होते, जे मूक चित्रपट युगातील प्रसिद्ध अभिनेते होते. चार्ली चॅपलिन यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. वयाच्या १४ व्या वर्षापासून त्याने स्टेज शो करण्यास सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी त्याने हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली.

चार्ली चॅपलिन

या दरम्यान, चार्ली चॅपलिनने शेकडो चित्रपटांमध्ये काम केले आणि तो जगातील सर्वात लोकप्रिय कलाकार झाला. त्यांची चित्रपट कारकीर्द ७५ वर्षे चालली.

चार्ली चॅपलिनवर बंदी घालण्यात आली

१९५० च्या दशकात कम्युनिस्ट असल्याच्या संशयावरून ज्यांवर बंदी घातली गेली होती त्यांच्यापैकी चार्ली चॅपलिन देखील एक होते. या दरम्यान त्यांचा ‘लाइमलाइट’ नावाचा चित्रपट तयार झाला होता, पण या वादामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. यातून दु: खी झाल्याने चार्ली चॅपलिनने हॉलिवूड कायमचा सोडलं आणि स्वित्झर्लंडच्या लॉसने येथे जाऊन स्थायिक झाला.

२५ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली चॅपलिन यांचे स्वित्झर्लंडमध्ये निधन झाले. २७ डिसेंबर १९७७ रोजी चार्ली चॅपलिन यांना कोर्सियर-सूर-वेवे या गावातल्या अ‍ॅंग्लिकन स्मशानभूमीत पुरण्यात आले. दोन महिन्यांनंतर ग्रामस्थांनी पाहिले की ,चार्ली चॅपलिनचे थडगे खोदण्यात आले असून त्याची शवपेटी देखील गायब झाली होती. या दरम्यान, त्यांची शवपेटी शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले गेले, परंतु यश मिळू शकले नाही.

२ मार्च, १९७८ आणि १६ मे १९७८ च्या दरम्यान चार्ली चॅपलिनची पत्नी उना चॅपलिन आणि तिचे वकील यांना २७ फोन कॉल आले. यादरम्यान, चार्ली चॅपलिनच्या मृतदेहाच्या बदल्यात त्यांच्याकडे ६ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची मागणी केली गेली होती, परंतु चार्ली चॅपलिनच्या पत्नीने असे सांगून नाकारले की, “चार्ली जर  जिवंत असते तर ते यावर खूप हसले असते.”

त्यानंतर स्विस पोलिसांनी सुमारे २०० टेलिफोन बूथवर नजर ठेवण्यास सुरुवात केली. १ मे १९७८ रोजी पोलिसांनी रोमन वार्डेस या २५ वर्षीय पोलिश निर्वासितला फोन वरून खंडणी मागत असताना अटक केली. त्याच्याच सांगण्यावरून पोलिसांनी लवकरच त्याचा बल्गेरियन सहकारी गँन्स्टो गेनेव याला ही पकडले.

यानंतर चार्ली चॅपलिनच्या कुटुंबीयांनी त्यांचे शरीर पुन्हा एका सुरक्षित काँक्रिटच्या कबरीत पुरले.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here