आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

न्यूझीलंडची ही आदिवासी जमात आपल्या पूर्वजांच्या कवट्या संग्रहित करून ठेवतात..!


जगभरात असंख्य आदिवासी जनजाती आहेत. प्रत्येक समुदायाला त्यांचा विशिष्ट असा सांस्कृतिक वारसा व परंपरा लाभलेली आहे. अशीच एक आदिवासी जमात न्यूझीलंडमध्ये देखील आहे, त्या आदिवासी जमातीला ‘माओरी’ म्हणून ओळखले जाते. हा समुदाय त्याच्या विचित्र परंपरांसाठी जगभरात ओळखला जातो.

यापैकीच एका परंपरेंनुसार जेव्हा या समुदायातील एखाद्या व्यक्तिचे निधन होते तेव्हा त्याच्या डोक्याला धडावेगळं करून त्याचा संग्रह या जमातीकडून करण्यात येतो. मृत लोकांच्या असंख्य कवट्या संग्रहित करण्याच्या या परंपरेला ‘मोकामोकाई’ म्हणून ओळखले जाते.ह्या आदिवासी समुदायाबद्दल व त्याच्या विचित्र परंपरेविषयी आपण विस्ताराने जाणून घेऊ…

माओरी जमातीचे लोक १३ व्या शतकापासून न्यूझीलंडमध्ये वास्तव्य करीत आहेत. या आदिवासी जमातीच्या लोकांच्या चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारचे टॅटू गोंदवलेले असतात. प्राचीन इजिप्तच्या लोकांप्रमाणे या समुदायात देखील मृत व्यक्तींचे अवशेष संवर्धित करून ठेवण्याची परंपरा आहे. या समुदायात ज्यावेळी एखाद्या सरदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या मुंडक्याला धडावेगळे करण्यात येते. यानंतर त्याच्या कवटीतून डोळे आणि मेंदू बाहेर काढण्यात येतो. यानंतर त्या कवटीला उकळत्या पाण्यात टाकले जाते व उकळले जाते. यामुळे कवटी वर असलेली सर्व घाण निघून जाते.

new google

वरील प्रक्रिया पार पडल्यानंतर त्या कवटीमध्ये विशिष्ट प्रकारचा पदार्थ भरण्यात येतो. मग याला पाण्यात उकळून भट्टीवर भाजण्यात येते. यानंतर बराच काळ ही कवटी उन्हात वाळत घालण्यात येते. यानंतर त्या कवटीवर विशिष्ट प्रकारचे टॅटू गोंदवण्यात येते. पुढे ही कवटी त्याच्या परिवाराकडे सुपूर्द करण्यात येते. हा परिवार ह्या कवटीचे जतन करून ठेवतो व एखाद्या उत्सवाच्या क्षणी ही कवटी बाहेर काढली जाते. कवट्या जतन करण्याच्या या विशिष्ट प्रथेला मोकामोकाई म्हणून ओळखले जाते.

कवट्या

सुरुवातीला हा आदिवासी समूह फक्त आपल्या पूर्वजांच्या कवट्यांची मोकमोकाई करायचा पण कालांतराने त्यांनी त्यांच्या शत्रूच्या कवट्यांवर देखील हा प्रयोग करण्यास सुरूवात केली. हे त्यांच्या शक्तीचे व वर्चस्वाचे प्रतीक बनले होते. इतकेच नाही आपली ताकद दाखवून देण्यासाठी या जनजातीने आपल्या शत्रूच्या कवट्या युरोपियन लोकांच्या बाजारात विकायला देखील सुरुवात केली.

यातून त्यांनी आपल्या शत्रूवर आपले किती प्रभुत्व आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता.

माओरी जमातीने कधीच आपल्या पूर्वजांच्या कवट्या युरोपियन लोकांना विकल्या नाहीत. पण त्यांनी शत्रूंचा कवट्यांचा चांगलाच व्यापार केला.

मस्कट युद्धाच्या दरम्यान या कवट्यांची मार्केटमध्ये मोठी डिमांड होती. पण १८३१ मध्ये साऊथ वेल्सचा गव्हर्नर असलेल्या राफ डार्लिंगने नवीन आदेश जारी करून या कवट्यांच्या व्यपारावर बंदी आणली.त्याने न्यूझीलंडच्या बाहेर ह्या कवट्यांचा व्यापारावर संपूर्ण बंदी घालण्यात आली. युरोपियन लोकांमध्ये या कवट्यांचे विशेष आकर्षण होते.

होराटीओ गॉर्डन रॉब्ले नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्याने या कवट्यांचा मोठा संग्रह केला होता. तो कवट्यांवर करण्यात आलेल्या नक्षीकामाचा मोठा चाहता होता. त्याच्याकडे आशा विशिष्ट टॅटू असलेल्या तब्बल ३५ कवट्या होत्या. १९०८ साली त्याने या सर्व कवट्या सरकारला सुपूर्द केल्या पण सरकारने त्या कवट्या स्वीकारल्या नाहीत.

आज या मोकमोकाई कवट्या न्यूझीलंडच्या राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. देश विदेशातून अनेक पर्यटक या कवट्या पाहण्यासाठी येत असतात.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here