आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

शिवाजी महाराजांच्या काळातील ही घातक शस्त्रे पाहूनच शत्रूचे मनोबल तुटायचे…!


शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीत मराठ्यांनी ही १० प्राणघातक शस्त्रे वापरली होती. १७ व्या शतकात, जेव्हा भारतावर मुघल राजवटीचा झेंडा फडकत होता. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा झेंडा उभारला आणि देशाच्या सर्वात मजबूत मराठा साम्राज्याचा पाया घातला.

शिवाजी महाराज एक शूर, हुशार आणि निर्भिड शासक होते. त्यांनी कधीही शत्रूला पाठ दाखवली नाही, ना कधी गौरवशाली मराठा साम्राज्याच्या सीमेचा विस्तार करणे थांबवले. प्रशासन आणि सैनिकी कौशल्यांच्या जोरावर त्यांनी दक्खन आणि मध्य भारतपर्यंत आपले साम्राज्य वाढविले.

या कामासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मोठ्या सैन्यासह प्राणघातक शस्त्रे निवडली. यापैकी काही शस्त्रे अशी आहेत जी स्वत: शिवाजी महाराज शत्रूंचा नाश करण्यासाठी वापरत असत. शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ज्या वाघाच्या नखांनी मारले त्याबद्दल कदाचित तुम्हाला माहिती असेलल.

new google

पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही शस्त्रांबद्दल सांगणार आहोत, जे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठ्यांनी वापरले होते.

१. तलवार

एक भारतीय तलवार जी मध्ययुगीन काळात एक महान शस्त्र मानली जात असे. त्यात वक्राकृती ब्लेड होता आणि लाकडी मूठ लावली होती. या मुठीतच बोटांसाठी एक गार्डही देण्यात आला होता. हे एक टोकदार आणि धारदार शस्त्र होते जे शत्रूच्या छातीवरुन आरपार जात असे.

२. फिरंगी

हा बोलचालीचा एक शब्द आहे, जो परदेशी लोकांसाठी वापरला जात असे. या तलवारीची युरोपियन रचना असल्याने त्याला ‘फिरंगी’ असे म्हणत. यात सरळ ब्लेड आहे जे एका बाजूला धारदार आहे तर दुसर्‍या बाजूला सहा इंच जाड आहे. या युरोपियन तलवारीने शिवाजी महाराजांना ‘भवानी’ आणि ‘जगदंबा’ या तलवारी बनवण्यास प्रेरित केले.

शस्त्रे

३. शमशीर

हे हत्यार मूळचे कोठे आहे याबाबत कोणतीही माहिती नाही. पण पर्शियन भाषेत त्याचे नाव शमशीर आहे. शमशिरची खास गोष्ट म्हणजे ती पर्शियन आणि अरबी तलवारींचे मिश्रण होते. पर्शियन तलवार सामान्यत: सरळ असते आणि अरबी तलवार वक्र असते, यामध्ये दोन्ही वैशिष्ट्ये होती. मराठ्यांनी याचा उपयोग शत्रूंच्या विरोधात केला.

४. खंड

या तलवारीला दोन्ही बाजूंनी धार होती. हँडलवर त्याची रूंदी कमी असून, ती लांबीला बरीच मोठी होती. मध्यभागी व वरच्या भागात रुंद असल्याने या तलवारीचा उपयोग शत्रूंना दोन तुकडे करण्यासाठी केला जात असे. त्याचे सुरुवातीचे टोक धारदार नव्हते.

५. खंजर

याचा वापर जवळच्या लढाईत केला जात असे. हे दुहेरी धार असलेले शस्त्र, लांबीला लहान असून ते वक्र आणि टोकदार असे आहे. याला धरायला म्यान देखील आहे. असे म्हणतात की याची उत्पत्ती ओमानमध्ये झाली होती, परंतु त्याचे नाव अरबी आहे.

६. कटार

जवळच्या लढाईत शत्रूवर वार करण्यासाठी याचा वापर केला जात असे. यात ‘एच’ आकाराच्या हँडलसह एक लहान ब्लेड असतो. खंजीराप्रमाणे हेही म्यानमध्ये झाकलेले असते. लहान असल्याने ते सहजपणे कंबरेवर बांधले जाऊ शकते आणि आवश्यकतेनुसार लगेच बाहेर काढले जाऊ शकते.

७. गुप्ती

ही एक छोटी, तीक्ष्ण, पण प्रभावी तलवार आहे. याच्या टोकदारपणा मुळे ही शत्रूच्या पोटी सहजपणे आरपार जाऊ शकते.
हे शस्त्र लाकडापासून बनवलेल्या म्यानाने झाकलेले आहे, ज्यामुळे एखादी व्यक्ती शस्त्र घेऊन जात आहे की काठी याचा अंदाज लावणे कठिण जात असे.

८. बिछवा

हा एक भारतीय खंजीर आहे ज्याचे एका टोक वक्र आणि दुसरे धारदार आहे. याला सहज पकडण्यासाठी आणि हल्ला करण्यासाठी यात लहान दिसणारी मूठ बसवली आहे.

९. कुऱ्हाड

लोखंडाचे बनलेले हे शस्त्र खूप प्राणघातक होते. याचा उपयोग शत्रूचे डोके एका घावात फोडण्यासाठी केला जात असे.

१०. वाघ नख

वाघ नाख म्हणजे वाघाची नखे. शिवाजी महाराजांनी या शस्त्राने अफझलखानचा वध केला. या शस्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते सहज लपविले जाऊ शकते आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्याने अचानक हल्ला ही करू शकतो.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : गुन्हेगारी जगतातील सर्वांत खतरनाक महिला किलर विषयी वाचा सविस्तर …

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here