आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

5000 वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या महाभारत युद्धातील हा योद्धा आजही आहे जिवंत…!


महाभारत युद्धात अनेक महापराक्रमी योद्ध्यांनी भाग घेतला होता. धर्म आणि अधर्माच्या मध्ये झालेले हे भीषण युद्ध आजपर्यतचे सर्वांत मोठे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धामध्ये अनेक योद्ध्यांना मारतांना अधर्माचा सहारा घेतला गेला होता.

आजच्या या लेखामध्ये आपण अश्याच एका योध्याब्द्द्ल जाणून घेणार आहोत जो महाभारत युद्धात सहभागी  तर झाला होता परंतु तो आजूनही जिवंत असल्याच म्हटलं जातंय.

आपण ज्या महाभारताच्या योध्याबद्दल बोलत आहोत, तो म्हणजे  अश्वत्थामा.  कौरव आणि पांडवांचा गुरु द्रोणाचार्य यांचा मुलगा.  या योद्धाने कौरवांच्या वतीने महाभारताच्या युद्धात युद्ध केले. पण केवळ एका चुकीमुळे अश्वत्थामाला जगाच्या शेवटापर्यंत जगण्याचा आणि पृथ्वीवर भटकंती करण्याचा शाप मिळाला.

new google

भगवंत श्रीकृष्णाने हा भटकंतीचा शाप त्याला दिला होता.

पौराणिक कथांनुसार, वडील द्रोणाचार्य यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अश्वत्थामा यांनी अभिमन्यूचा मुलगा परीक्षितचा वध करण्यासाठी ब्रह्मास्त्रांचा उपयोग केला होता, परंतु त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने परीक्षितचे रक्षण केले होते.

त्यानंतर अर्जुनाने तलवारीने अश्वत्थामाच्या डोक्याचे केस कापले. या चुकीमुळे संतप्त होऊन श्रीकृष्णाने जगाच्या शेवटापर्यंत पृथ्वीवर भटकण्याचे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा याला शाप दिला.

असे म्हटले जाते कि अश्वत्थामा असिरगड किल्ल्यात भटकत आहे. तर कुठे आहे हा किल्ला?

बुरहानपूर हे मध्य प्रदेशातील एक लहान शहर आहे. या शहराच्या काठावर असिरगडचा किल्ला उंच टेकडीवर वसलेला आहे. असे म्हटले जाते की हा तोच गड आहे जिथे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा  गेल्या 5000 वर्षापासून  भटकत आहे.

महाभारत

या किल्ल्याभोवती कोणतेही निवासी क्षेत्र नाही, परंतु या किल्ल्यावरून जाणाऱ्या अनेकांना तेथे अश्वत्थामा असल्याचा भास होत असतो.

ते म्हणतात की अश्वत्थामाच्या कपाळावरुन रक्त येते. तो एक छाया नाही, सावली नाही, भूत नाही, परंतु तो जिवंत व्यक्ती आहे, जो लोकांशी बोलतो.

त्या किल्ल्यातील महादेवाची दररोज पूजा केली जाते.

असिरगडाच्या या किल्ल्यात एक प्राचीन शिव मंदिर आहे. कोणीतरी दररोज गुलाल आणि फुले घेऊन या शिवकालीन मंदिरात पूजा करून जातो. आजही ते एक रहस्य आहे की, नेमके मंदिरात पूजा कोण करतो?

काही लोकांच्या मते  या मंदिरात जाण्याचा एक छुपा मार्ग आहे ज्याद्वारे अश्वत्थामा येथे येऊन शिवपूजाकरून जातो.तसेच अश्वत्थामा वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करत असल्याचे देखील म्हटले जाते.

असे म्हणतात की श्रीकृष्णाने शाप दिल्यानंतर द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा यांना व्यास मुनींनी आश्रय दिला होता. आजही मध्य प्रदेश, ओरिसा आणि उत्तराखंडच्या जंगलात अश्वत्थामा पाहिल्याच्या बातम्या आहेत. खोद्र महादेव मध्य प्रदेशातील महूपासून १२ किमी अंतरावर असलेल्या विंध्याचलच्या टेकड्यांवर वसलेले आहे. असे मानले जाते की हे द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा यांचे तपस्या ठिकाण आहे आणि आजही अश्वत्थामा येथे येतो.

विशेष म्हणजे, भविष्य पुराणानुसार असे म्हणतात की कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूचा ‘कल्कि’ अवतार पृथ्वीवर येईल.

त्यावेळी, कल्की अवतारच्या सैन्यात द्रोणाचार्य यांचा मुलगा अश्वत्थामा देखील उपस्थित असेल. जो अनीतीच्या विरूद्ध लढा देईल. पण तोपर्यंत अश्वथामा पृथ्वीवर असाच फिरत राहणार का, हा मोठा  प्रश्न आहे.

अश्वत्थामा यांच्याबाबतीत असलेल्या या गोष्टीमुळे आजही लोक संभ्रमात  आहेत की, खरचं अश्वत्थामा जिवंत असेल का?

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here