आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

जगातील या एकमेव जागेवर एकही देश आपला दाव करत नाहीये, वाचा नक्की काय आहे कारण…..


सुदान आणि इजिप्तच्या सीमे दरम्यान २०६० चौरस किलोमीटरची रिकामी जागा आहे, जी नकाशावर बीर तविल नावाने ओळखली जाते.

आपण खूप वेळा ऐकले असेल की दोन देशांनी एका छोट्या भूभागासाठी रक्त सांडले. परंतु आपण अशा जमिनीबद्दल कधी ऐकले आहे, ज्यावर कोणत्याही देशाला आपला दावा देखील सांगायचा नाही?

होय, या जगात एक स्थान असे आहे, जेथे सर्वात मोठ्यातील मोठा देशही आपले पाय ठेवण्यास कचरतो.

new google

बीर तविल असे या जागेचे नाव आहे. इजिप्त आणि सुदानच्या सीमेवर २०६० चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेला हा भाग पूर्णपणे बेवारस आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाने यावर दावा केलेला नाही.

१८९९ मध्ये, युनायटेड किंगडमने सुदान आणि इजिप्त दरम्यानची सीमा निश्चित केली. परंतु इजिप्तला किंवा सुदानला कोणालाही या जमिनीवर अधिकार गाजवायचा नव्हता.

देश

परंतु, बीर तविल बेवारस का आहे?

यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे या ठिकाणची परिस्थिती. हा भाग तांबडा समुद्राजवळील वाळवंटाचा आहे.
येथे खूप कोरडे व गरम वारे वाहतात. दूरदूर पर्यंत वाळवंट असलेल्या या निर्जन जागेवर पाण्याचा आणि वनस्पतींचा मागमूस देखील नाही त्यामुळे येथे जगणे सोपे नाही.

काही लोक या वाळवंटात तेल आणि सोन्याचे साठे असल्याची चर्चा करतात. पण असे असूनही कोणालाही इथे यायचे नाही.

जेव्हा एक भारतीय या निर्जन भूमीचा राजा बनला!

होय, इंदूरमध्ये राहणार्‍या एका भारतीय व्यक्तीने २०१७ मध्ये स्वत: ला या जागेचा मालक म्हणून घोषित केले होते. सुयश दीक्षित यांनी या जागेला ‘किंगडम ऑफ दीक्षित’ असे नाव दिले. तसेच, आपल्या देशाचा ध्वज येथे ठेवला. याची छायाचित्रेही सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली होती.

एवढेच नव्हे तर त्यांनी एक वेबसाइट तयार केली आणि लोकांना येथे नागरिकत्व घेऊन गुंतवणूक करण्यास सांगितले.
पण तो स्वत: देखील फार काळ इथे राहू शकला नाही. तेथून परत आल्यानंतर तो पुन्हा कधीच तिकडे गेला नाही.

यापूर्वी देखील, एक अमेरिकन आणि रशियन लोकांनी देखील या जागेवर आपला हक्क सांगितला, परंतु या ठिकाणी कोणीही स्थायिक झाले नाही. आतापर्यंत बीर तविलवरील कोणाचा ही दावा मान्य करण्यात आलेला नाही.
अशा परिस्थितीत, तुम्हाला जर तिथला राजा व्हायचे असेल तर आपण तेथे नक्की प्रयत्न करू शकता.!

 

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here