आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

औरंगाबादची स्थापना गुलामा पासून योद्धा बनलेल्या या आफ्रिकन योध्याने केलेली…


 

अनेक परकीय राज्यकर्त्यांनी भारतावर राज्य केले. परदेशी घराण्याचे अनेक राजे या भूमीवर जन्माला आले, त्यांनी राज्य केले आणि राज्य गमावले देखील. इथली माती बऱ्याच राजांच्या उदय आणि अधोगतीची साक्ष देते. कित्येक राजवंशांची भरभराट आणि वाताहात होताना इथल्या मातीने पाहिलं आहे.

या पृथ्वीवर असे काही राज्यकर्ते होते ज्यांनी या मातीचे संरक्षण करण्याचा देखील प्रयत्न केला आणि तेही परदेशी असूनही. द इंडियन एक्स्प्रेसच्या एका लेखानुसार मलिक अंबर हा असाच योद्धा होता.

new google

आफ्रिकेतून गुलाम म्हणून भारतात आलेल्या मलिक अंबरची कहाणी अतिशय रंजक आणि वेगळी आहे.
युवा अवस्थेत असताना तो बर्‍याच वेळा विकला आणि खरेदी केला गेला. नशिबाने त्याला त्याच्या इथिओपियन घरापासून दूर नेत भारतात आणले. अंबर भारतात केवळ त्याचे स्वातंत्र्यच परत मिळवले नाही, तर त्याने सामाजिक कार्याच्या अनेक पायऱ्या पार केल्या, स्वतःचे सैन्य उभे केले आणि एका शहराची स्थापना केली. ज्याला आज आपण औरंगाबाद म्हणून ओळखतो.

इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार, अंबरचा जन्म इथिओपियाच्या खंबाटा प्रदेशातील ओरोमा जमातीमध्ये १५४८ मध्ये झाला होता. आज या देशातील ३५ टक्के लोकसंख्या ओरोमा जमातीची आहे. गुलामांच्या व्यवसायात येण्यापूर्वी अंबरचे नाव ‘चापू’ होते. इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की एकतर अंबरला युद्धात कैदी म्हणून नेले गेले होते किंवा दारिद्र्यामुळे त्याच्या पालकांनी त्याला विकले होते.

अंबरला मध्य आशियाच्या बाजारात नेण्यात आले जेथे त्याला अरबांनी विकत घेतले. तिकडे त्याची खूप वेळा खरेदी विक्री झाली.इतिहासकार रिचर्ड. एम. ईटन यांनी १३००-१७६१ ई द इंडियन हिस्ट्री ऑफ द डेक्कन या पुस्तकात लिहिले आहे की, ‘चापू’ येमेनमधील ८० डच गिल्डर्सना विकला गेला.

तेथून त्याला बगदादमध्ये नेण्यात आले जेथे एका व्यापाऱ्याने चापूच्या क्षमता ओळखल्या आणि त्याला शिक्षित केले, त्याचे इस्लाम मध्ये धर्मांतर केले आणि त्याचे नाव ‘अंबर’ ठेवले.

अंबरला १५७० च्या दशकात दक्खन (दक्षिण भारत) येथे आणण्यात आले. येथे चंगेज खानने त्याला विकत घेतले, खान स्वत: गुलाम होता आणि अहमदनगरच्या निजाम शाहीचा पेशवा (मुख्यमंत्री) होता.

गुलामाचे नशिब असे पालटले.

खानने अंबरसह एक हजार ‘हबशी’ विकत घेतले. ईटनच्या म्हणण्यानुसार, सोळाव्या शतकात दक्खनच्या राजवटीत निग्रो विकत घेत असत. हे निग्रो त्यांच्या प्रामाणिकपणा आणि सामर्थ्यासाठी परिचित होते म्हणूनच त्यांना लष्करी दलातही सामाविष्ट केले जाई.

इब्न बटूटाने असेही लिहुन ठेवले आहे की, निग्रोनींच हिंद महासागरात प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची हमी घेतली होती. हे निग्रो इतके प्रसिद्ध होते की एक जरी निग्रो जहाजावर असला तरी समुद्री चाचे जहाजावर हल्ला करत नसत.

दक्खन समाजात निग्रो कायमच गुलाम राहत नसत, मालकाच्या मृत्यूनंतर निग्रोस मुक्त करण्यात येत असे. त्यानंतर तो त्याच्या इच्छेनुसार साम्राज्याच्या कोणत्याही शक्तिशाली कमांडरची सेवा करू शकत असे.

यातील काही निग्रो स्वत: शक्तिशाली योद्धा बनले आणि असाच एक हबशी होता अंबर. अंबरने ५ वर्षे चंगेज खानसाठी काम केले, त्यानंतर खान मरण पावला, आणि अंबरला स्वातंत्र्य मिळाले. यानंतर अंबरने विजापूरच्या सुलतानसाठी २० वर्षे काम केले. विजापूरमध्ये, अंबरला एका छोट्या तुकडीचा कारभार देण्यात आला आणि त्याला ‘मलिक’ हे टोपणनाव प्राप्त झाले.

औरंगाबाद

१५९५ मध्ये अंबर अहमदनगर सल्तनीत परत गेला आणि दुसर्‍या एका हबशीसाठी काम करू लागला. हाच काळ होता जेव्हा मोगल शासक अकबराने दख्खनवर डोळे ठेवून अहमदनगरच्या दिशेने वाटचाल सुरू केली होती. इतिहासकारांच्या मते ही अकबरची शेवटची मोहीम होती.

औरंगाबादची स्थापना

एक योद्ध्या व्यतिरिक्त अंबर कुशल शासक देखील होता. इ.स. १६१० मध्ये जेव्हा अहमदनगर मोगलांनी ताब्यात घेतले तेव्हा अंबरने राजवटीसाठी एक नवीन राजधानी स्थापित केली, या शहराचे नाव खिरकी (औरंगाबाद) होते.

मराठ्यांसह या शहरात २ लाखाहून अधिक लोक राहू लागले. या शहरात कालवे वगैरे बांधण्यात आले. पिल्लईच्या म्हणण्यानुसार, अंबरनेच औरंगाबादेत जामा मशिद आणि काली मशिदीची निर्मिती केली.

छत्रपती शिवाजी महाराजांनीही आपल्या ‘शिव भारत’ या महाकाव्यात अंबरचा उल्लेख केला आहे आणि ते सूर्यासारखे शूर असल्याचे वर्णन त्यात केले आहे. शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी हे देखील अंबरच्या जवळचे होते.

१६२६ मध्ये अंबरचा मृत्यू झाला आणि त्याची समाधी खुलदाबादमध्ये बांधली गेली. अंबरच्या मृत्यूनंतर जहांगीर यांचे आत्मचरित्र लिहिलेल्या मुतामिद खान यांनी लिहिले की ‘लढाई कौशल्य, न्याय, शासन करण्यात यांच्या सारखं कोणी नव्हतं. इतिहासामध्ये त्यांच्यासारखा कोणी हबशी गुलाम नाही. १७ व्या शतकात औरंगजेबाने या शहराचे नाव औरंगाबाद ठेवले.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

राजस्थानच्या या गावात शेतकरी शेती नाही तर अभिनय करतात..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here