आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

चीनच्या या गावातील लोक असा काय उद्योग करतात की, सर्वच गावकरी करोडपती झालेत..!


जर तुम्ही ग्रामीण भागात गेले असाल तर तुम्ही कच्चे घरे, कच्चे रस्ते, शेतातील कोठारे नक्कीच पाहिली असणार कारण ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या शेतीमध्ये असेच काहीसे दृश्य आपल्याला दिसते.

पण आपण कधी अश्या गावाबद्दल ऐकले वा पाहिले आहे का जिथे राहणारे सर्वच शेतकरी लखपती आहेत! त्यांच्याकडे असणारे आलिशान बंगले, पक्के रस्ते आणि त्या गावाचे सौंदर्य मोहक व कौतुकास्पद असेल. असे आदर्श गाव, जगातील सर्वात श्रीमंत गाव, फक्त स्वप्नांच्या जगात घडू शकते असा आपला विचार असावा, परंतु मी जर म्हटले की प्रत्यक्षात असे एक गाव आहे जे अगदी स्वप्नासारखे आहे, तर आपण काय म्हणाल?

चला तर मग जगातील हे सर्वात श्रीमंत गाव कोठे आहे  त्याबद्दल जाणून घेऊया सविस्तर..

जगातील चीनमधील एकमेव श्रीमंत गाव 

वास्तविक चीनच्या जिआनजीन शहराजवळील हुझळी गाव हे एकमेव असं गाव आहे जे श्रीमंत आहे आणि इथले सर्व लोक लक्षाधीश आहेत. संपूर्ण चीनमधील सर्वात श्रीमंत कृषी गावाचे नाव त्याला मिळाले आहे.

करोडपती

या गावात प्रत्येक व्यक्तीला 80 लाख रुपये मिळतात.

जगातील सर्वात श्रीमंत गाव जिथे सुमारे 2000 लोक राहतात, ज्यांचे शेतीतून वार्षिक उत्पन्न एक लाख युरो म्हणजेच 80 लाख रुपये एवढे आहे. केवळ कमाईच नाही, तर चीनमध्ये राहणाऱ्या लक्षाधीशांची संख्या चीनच्या इतर सर्व खेड्यांच्या तुलनेत सर्वाधिक आहे.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जगातील सर्वात श्रीमंत गाव हेच कसे?

हुझळी हे गाव आज सर्वात श्रीमंत आणि संपन्न गाव आहे पण सन १९६१ मध्ये या खेड्यातील शेतीची अवस्था अत्यंत बिकट होती. त्यावेळचे गाव कम्युनिस्ट पार्टी कमिटीचे माजी अध्यक्ष वू रेनवाओ यांनी या गावाचा चेहरामोहरा बदलण्याची जबाबदारी स्वीकारली.

औद्योगिक विकासाच्या नियोजनाबरोबरच त्यांनी कृषी व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस नियमही बनवले. गावात स्टील, रेशीम व ट्रॅव्हल उद्योग आणि कृषी क्षेत्र विकसित करण्यात वू रेनॉन यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. या भागातील कंपन्यांची शेअर बाजारात यादी करून गावकऱ्यांची नावे भागधारकांमध्ये समाविष्ट केली गेली.

या भागातील नफ्यातील वाटा गावातील सर्व भागधारकांमध्ये वाटप केले जाते. गावकरी त्यांच्या शेअर्समधून मिळवलेल्या नफ्यातील एक मोठा भाग म्हणजेच 80 टक्के करात वजा केला जातो.

८०% टक्के कर भरण्याच्या बदल्यात या गावातील नोंदणीकृत नागरिकांना बंगला, कार, मोफत आरोग्य सुरक्षा, नि: शुल्क शिक्षण, शहर हेलिकॉप्टरचा नि: शुल्क वापर आणि हॉटेलमध्ये मोफत खाद्य सुविधा दिली जाते.

 

50 वर्षांवरील महिलांना आणि 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना मासिक पेन्शनसह तांदूळ आणि भाज्या देखील दिल्या जातात. बापरे! हे जगातील सर्वात श्रीमंत गाव – हाय-टेक शहरे देखील या गावासमोर अपयशी ठरली आहेत.

हुअळी गावात प्रवेश करताच येथे मोठ्या इमारती, रुंद व पक्के रस्ते, हॉटेल, सुंदर उद्याने, जलतरण तलाव दिसतात. अश्या सुविधांनी युक्त या खेड्यासमोर जगातील हायटेक शहरेही फिकट दिसु लागतात.

जगातील ह्या सर्वात श्रीमंत गावाची कहाणी ऐकल्यावर तुम्ही नक्कीच म्हनताल की आमच्या स्वप्नांचे गाव तर असेच आहे जेथे सर्व लोक समृद्ध आणि आनंदी असतील.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here