आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

गरिबीमुळे लाकडं उचलून नेणाऱ्या मीराबाईने आज ऑलम्पिकमध्ये सिल्व्हर मेडल उचललं !


वेटलिफ्टर मीराबाई चानुने ऑलम्पिक स्पर्धेत भारताचे खाते उघडत, देशासाठी पहिले मेडल पटकावले आहे. ४९ किलो वेटलिफ्टिंगमध्ये तिने सिल्व्हर मेडल पटकावले आहे. मीराबाईने तब्बल २०२ किलो वजन उचलले असून तिच्या प्रतिस्पर्धी चिनी वेटलिफ्टरने तब्बल २१०किलो वजन उचलले आहे.

मीराबाईच्या अगोदर भारताच्या नावावर वेटलिफ्टिंगमध्ये एक ब्रॉंझ मेडल होते. २००० सालच्या ऑलिंपिक्समध्ये कर्णम मल्लेश्वरी यांनी पहिल्यांदा या खेळात भारताला मेडल मिळवून दिले होते. पण मीराबाईनी एक नवीन अध्याय रचला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पदक पटकवणारी ती पहिली महिला ठरली आहे.

मणिपूरमध्ये जन्माला आलेली मीराबाई लहानपणापासूनच जड वस्तू उचलण्यात तरबेज आहे. पण तिने कधी याकडे करियर म्हणून बघितले नव्हते. मीराबाईला एक तिरंदाज व्हायचे होते. पण आठव्या इयत्तेत तिच्या स्वप्नात फार मोठे बदल झाले. आठव्या इयत्तेत तिला तिच्या शालेय पुस्तकात कुंजरानी देवी या भारतीय वेटलिफ्टरची कथा वाचायला मिळाली.

new google

कुंजरानी देवी देखील इंम्फाळ शहरात जन्मलेल्या कुंजरानी देवींनी वेटलिफ्टिंगमध्ये भारतासाठी अनेक मेडल्स जिंकले होते, परंतु जेव्हा ऑलिम्पिकची वेळ आली तेव्हा मात्र त्या अपयशी ठरल्या होत्या. शालेय पुस्तकात त्यांची कथा वाचून मीराबाईला प्रेरणा मिळाली. त्याकडे तिने करीयर म्हणून पाहण्यास सुरुवात केली.

करियर म्हणून देखील हा रस्ता फार अवघड होता. मीराबाईच्या घराजवळील ट्रेनिंग सेंटर हे तब्बल ६० किलोमीटर अंतरावर होते. PWD विभागात काम करणारे वडील आणि छोट दुकान चालवणाऱ्या आईला तिचा हा खर्च परवडणारा नव्हता. पण कुठलीच अडचण मीराबाईला अडवू शकली नाही. तिने तीचा प्रवास सुरु ठेवला. मग आलं २०१४ चं वर्ष ज्यावेळी ग्लासगो शहरात कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते.

मीराबाई

ईथे पहिल्यांदा मीराबाई लोकांच्या निदर्शनास आली. तिथे देखील मीराबाईने सिल्व्हर मेडल पटकावले होते. पण त्यावेळी गोल्ड मेडल देखील भारतानेच पटकावले असल्याने सर्वांच्या नजरा त्याकडेच होत्या. यामुळे मीराबाईच्या मनाला थोडी निराशा जाणवली. पण २०१६ साली मीराबाईने स्वतःला पुन्हा सिद्ध केले. तिने ऑलिम्पिकसाठी सुरू असलेल्या ट्रायल्समध्ये नॅशनल रेकॉर्ड मोडला. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक झाले. तिने यावेळी तिच्या रोलमॉडेल असलेल्या कुंजरानी यांचा रेकॉर्ड मोडला होता.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही, २०१६ मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये मीराबाईचे प्रदर्शन फार निराशाजनक होते.

तिला मेडल तर पटकवता आले नाहीच पण ती क्लिन एन्डमध्येच अयशस्वी ठरली. ती १२ स्पर्धकांमधील दुसरी स्पर्धक होती जिला कुठलेच वजन उचलता आले नाही.

तिच्या या अपयशामुळे सर्वाना वाटले की आता तिचे करियर धोक्यात येईल, अनेकांनी तिच्या कोच विजय शर्मांवर टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती फार दुखावली. तिने तिच्या कोचला विश्वासात घेऊन सांगितले की ती पुढच्या वेळी स्वतःला सिद्ध करून राहील!

मीराबाई जे म्हणाली तिने ते करून देखील दाखवले. तिने स्वतःला अजून ताकदीने सिद्ध केले. २०१६ नंतर २०१७ साली पार पडलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तिच्या निंदकांना तिने एक जबरदस्त उत्तर दिले. कर्णम मल्लेश्वरी यांच्यानंतर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड मेडल जिंकणारी दुसरी महिला ठरली. एवढेच नाही, २०१८ साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये देखील तिने फार उत्कृष्ट प्रदर्शन केले. गोल्डकोस्टमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत तिने एकूण १९६ किलो वजन उचलले. स्नेचमध्ये ८६ किलो आणि क्लिन एन्डमध्ये ११० किलो वजन तिने उचलले. तिने तिच्या कामगिरीच्या बळावर स्वर्णपदक पटकवले. २०२० सालचे एशियन्स गेम या एप्रिलमध्ये आयोजित करण्यात आले होते, त्यात देखील मीराबाईने ब्राँझ पदक पटकावले होते.

आपल्या कामगिरीच्या बळावर तिने ऑलिम्पिक स्पर्धेत यंदा नामांकन मिळवले होते. अखेरीस तिने त्या संधीचे सोने करत रियो ऑलम्पिकमध्ये वाट्याला आलेल्या मानहानीच्या खुणा तिने पुसून टाकल्या आहेत.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

या भारतीय खेळाडूने मारलेला षटकार अरबी समुद्रात जाऊन पडला होता..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here