आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

हैदराबादचा हा निजाम एकदा घातलेले कपडे परत कधीच घालत नव्हता…!
इतिहासकारांचे म्हणणे आहे की,  निजाम मोगलांचा एजंट म्हणून हैदराबादला आला. १७२२ मध्ये संधी पाहून त्याने स्वत: ला हैदराबाद संस्थान आणि त्या राज्याचा स्वतःस राजा घोषित केले. इतिहासात 7 निजाम आहेत ज्यानि हैदराबादवर राज्य केले. परंतु त्यांच्यापैकी फक्त एक जण होता ज्यांने प्रथमच इंग्रजी किंवा पाश्चात्य कपडे परिधान केले. त्याच्या काही अचंबित करणाऱ्या गोष्टी पाहुयात.

जगातील सर्वात मोठी अलमारी


 मेहबूब अली खान हा हैदराबादचा सहावा निजाम होता. त्याला वेगवेगळे कपडे घालण्याची फार आवड. तो जो ड्रेस घालायचा, पुन्हा तो घातला नव्हता. त्याचा परिणाम असा होता की त्याच्याकडे जगातील सर्वात मोठी अलमारी होती. हे कपाट त्याच्या जुन्या हवेलीच्या उजव्या बाजूला तयार केले गेले होते. त्याची लांबी 240 फूट होती आणि ती कपड्यांसह बूट आणि इतर वस्तूंनी भरली होती.

निजाम

त्यात तो नेहमी जुने कपडे काढून टाकत असे आणि  फक्त नवीन कपडे ठेवत असे.ते (ड्रेस) ठेवण्यासाठी मेहबूब अली खान यांनी 124 शेल्फ्स विकत घेतल्या होत्या.जुजुने कपडे तो लांब फेकून देत असे  जेणेकरून त्यामध्ये नवीन कपडे ठेवले जातील. सध्या हैदराबादच्या जुन्या वाड्यात ते कपाट आजही संग्रहित  आहे. यात एक टोपी आणि दोन जोडे बूट आहेत. ते आता संग्रहालयात रूपांतरित झाले आहे. बूट पाहतांना हे माहित होते  की ते फक्त एकदाच परिधान केले असावेत, कारण त्यात लंडनच्या कंपनीचे शिक्के जश्यास तसे आजूनही आहेत.


वॉर्डरोबमध्येही एक लिफ्ट होती

त्याच्या वॉर्डरोबमध्येही एक लिफ्ट होती. ही लिफ्ट हाताने चालवले जात असे. त्याचे शेल्फ्स बर्माहून आलेल्या सागवानच्या लाकडापासून बनविलेले होते. त्यात कोणतीही दीमक नव्हती. ही वॉर्डरोब पूर्वीसारखीच आहे. लेगेंडॉट्स ऑफ हैदराबाद या पुस्तकात या वॉर्डरोबचा उल्लेख आहे.

new google

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

या भारतीय खेळाडूने मारलेला षटकार अरबी समुद्रात जाऊन पडला होता..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here