आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

नेहरूंच्या या चुकीमुळे आज चीनमध्ये आहे कैलास!


भगवान शिव यांचे निवासस्थान म्हणून मानले जाते कैलाश मान सरोवर. हिंदूंचे हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आज चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये आहे. पण या मागे पंडित जवाहरलाल नेहरूंची चूक होती हे कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल.

इतिहासाची पाने पलटताना लक्षात येते की नेहरूंच्या धोरणांमुळे हे घडले आणि त्यामुळेच आज कैलास चीनमध्ये आहे व तेथे जाण्यासाठी चिनी व्हिसा मिळवणे आवश्यक आहे.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर अशी चर्चा सुरू झाली की कैलास मान सरोवर हा भारताचा एक भाग आहे, तो भारताला देण्यात यावा, परंतु नेहरूंच्या धोरणांमुळे असे होऊ शकले नाही.

स्वातंत्र्योत्तर नंतरचा इतिहास आणि बरीच ऐतिहासिक कागदपत्रे पाहिल्यानंतर हे माहिती झाले की नेहरूंनी केवळ कैलासच नव्हे तर ऐतिहासिकदृष्ट्या भारताचा भाग असलेला एक मोठा परिसरही चीनला दिला.

ही तेव्हाची बाब आहे जेव्हा चिनी सैन्य अत्यंत कमकुवत होते आणि चीनपेक्षा भारताची सैन्य बरीच ताकदवान होती, तेव्हा नेहरूंनी मनात आणले असते तर सहजपणे कैलाश मान सरोवरला भारतात सामील करता आले असते पण त्यांनी तसे केले नाही.

कैलास मान सरोवरच्या इतिहासावर नजर टाकली तर लक्षात येईल की तो प्राचीन भारताचा एक महत्वाचा भाग होता.

खरं तर, प्राचीन भारतात तिबेट नावाचे कोणते स्थान ही नव्हते आणि कैलास मान सरोवरचा संपूर्ण परिसर भारतीय राजांच्या ताब्यात होता.काळाच्या ओघात, जेव्हा मुघल आणि ब्रिटिशांचे भारताचे राज्य होते, तेव्हा त्यांनी या पर्वतीय भागात फारसा रस दाखविला नाही आणि मग भारत स्वातंत्र्यानंतर, चीनने तिबेटवर हल्ला केला आणि मान सरोवर त्यांच्या अधीन करून घेतले.

कैलाश पर्वत

त्यावेळी, जर भारताची लष्कराने प्रयत्न केला असता तर ते चीनी सैन्याचा नाश करू शकले असते, परंतु त्यांनी तसे केले नाही, कारण नेहरू जी होते, त्यांनी चीनला आपला मित्र मानून कोणतीही कठोर पावले उचलली नाहीत.

नेहरूंनी केवळ दलाई लामा आणि त्यांच्या समर्थकांना चिनी सैन्यापासून वाचवले आणि त्यांना आपल्या देशात स्थान दिले. पण कैलास मान सरोवर परत मिळविण्यात ही काही रस दर्शविला नाही.

असे म्हटले जाते की नंतर संसदेमध्येही या विषयावर बर्‍याच वेळा चर्चा झाली, पण नेहरू प्रत्येक वेळी या विषयावर अनुत्तरीत झाल्याचे दिसून आले. कैलाश मान सरोवरला चीनच्या तावडीतून मुक्त करण्याचा भारताने प्रयत्न केला पाहिजे, असे संसदेत बर्‍याच लोकांचे मत होते, परंतु असे काहीही झाले नाही.

काही तज्ज्ञांचे असेही मत आहे की जर सरदार वल्लभभाई पटेल यांचा मृत्यू झाला नसता तर त्यांनी कैलासच्या बचावात महत्त्वाची भूमिका बजावली असती आणि कदाचित आज कैलास मान सरोवर भारताच्या ताब्यात आले असते.

आपण इतिहासाच्या पानांवर उजाळा दिला असता तरी तीच माहिती आढळून येते. या विषयावर प्रत्येकाचे मत भिन्न असू शकते, हा लेख फक्त काही महत्वाची माहिती गोळा करून लिहिला गेला आहे.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला पकडणारा आयपीयस अधिकारी...!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here