आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

या भारतीय खेळाडूने मारलेला षटकार अरबी समुद्रात जाऊन पडला होता..!


आत्तापर्यंत भारतीय क्रिकेट संघात एकापेक्षा एक भारी फलंदाज आणि खेळाडू आले आहेत. सचिन तेंडुलकर, कपिल देव, एमएस धोनी, विराट कोहली या व्यतिरिक्त इतरही अनेक दिग्गज खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या दमदार कामगिरीने क्रिकेटविश्वात त्यांचा दरारा निर्माण केला.

जरी हे सर्व क्रिकेटर्स त्यांच्या खेळाचे खूप चांगले प्रदर्शन करत असले तरीही, आजपर्यंत कोणताही क्रिकेटपटू संदीप पाटीलसारखा झाला नाही.! संदीप पाटील हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्याने एका सिझन मध्ये १०२ षटकार मारलेत!

मुंबईत झाला जन्म

भारतीय क्रिकेट संघाच्या या बलाढ्य फलंदाजाचा जन्म १८ ऑगस्ट १९५६ रोजी झाला. आज कदाचित तुम्ही त्याला ओळखण्यास नकार द्याल पण एकेकाळी त्याचे क्रिकेट विश्वात फार मोठे नाव असायचे. संदीप पाटील यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्हजवळील पारसी जिमखाना मैदानावर खेळताना असा षटकार मारला की तो सरळ गेला आणि थेट अरबी समुद्रात पडला.

new google

अव्वल गोलंदाजांना त्यांनी चारली धूळ

संदीप पाटील असे आक्रमक फलंदाजांपैकी एक होता ज्यांनी आपल्या काळातील अव्वल गोलंदाजांना देखील पाणी पाजले. त्यातील एक बॉब विलिस होता. संदीपने त्याच्या एका षटकात सलग ६ चौकार लगावले. संदीपने वनडे मध्ये नव्हे तर कसोटी सामन्यांमध्ये सलग ६ चौकार मारण्याचा पराक्रम केला.

राष्ट्रीय पातळीवरील बॅडमिंटनपटू देखील होते!

खेळाडू

संदीप पाटील हा केवळ क्रिकेट विश्वाचा राजा नाही तर क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो राष्ट्रीय स्तराचा बॅडमिंटनपटू तसेच टेनिस व फुटबॉलचा ही चांगला खेळाडू होता. ही सर्व माहिती जाणून घेतल्यामुळे असे वाटते की जणू संदीप पाटील फक्त खेळण्यासाठी जन्मला आहे.!

संदीपचे वडील त्यांच्या काळात प्रथम श्रेणीतील क्रिकेटपटू असायचे आणि या कारणामुळे संदीपला क्रिकेटचे आकर्षण नी त्याची जास्त आवड होती. १९८३ मध्ये वर्ल्ड कप जिंकणार्‍या भारतीय संघात संदीप पाटीलही समावेश झाला होता.

या विश्वचषकात संदीपने इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत ३२ चेंडूत ५१ धावा केल्या. त्यावेळी फलंदाजीची संथ गती लक्षात घेता संदीपची हे खेळण्याची पद्धत आजच्या काळाच्या टी -20 पेक्षा ही थोडी वेगवान होती.

विश्वचषक जिंकल्यानंतर जेव्हा भारतीय संघ परत आला, तेव्हा त्याने संदीप पाटीललाही एक स्टार बनवले.
क्रिकेटचा स्टार झाल्यानंतर संदीपचे हृदय बॉलिवूड स्टार पूनम ढिल्लनवर पडले. पूनमबरोबर जाहिरात चित्रीकरणामुळे त्याने सामना होईपर्यंत खेळण्यास ही नकार दिलेला.

संदीपने पूनमच्या प्रेम प्रकरणाच्या नादात ‘कभी अजनबी थे’ नावाच्या चित्रपटातही काम केले होते.
या चित्रपटात त्यांच्या संघाचा कर्णधार सय्यद किरमानी यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. एक चित्रपट केल्यानंतरच त्याचे हृदय पूनम आणि चित्रपट या दोन्हींपासून दूर गेले. आणि त्यानंतर ते क्रिकेट विश्वात परतले.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते भारतीय संघाचे प्रशिक्षक झाले. या व्यतिरिक्त त्याने केनियाच्या क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकाचीही जबाबदारी देखील स्वीकारलेली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला पकडणारा आयपीयस अधिकारी...!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here