आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

नॉर्मन प्रिचर्डः भारतासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारा खेळाडू


ग्रीसची राजधानी अथेन्स येथे १८९६ मध्ये ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.

ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंची पहिली टीम १९२० मध्ये पाठविली गेली, जेव्हा देशातील प्रमुख उद्योगपतींपैकी एक असलेल्या दोरबजी टाटा यांच्या अध्यक्षतेखाली समितीने या स्पर्धेत भाग घेण्यासाठी. खेळाडूंची निवड केली.

हे पाच खेळाडू होते- पुरमा बॅनर्जी, फडेप्पा चौगुले, सदाशिव दातार, कुमार नवले आणि रणधीर शिंदे. पण ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारे हे पहिले खेळाडू नाहीत. यापूर्वी देखील एका खेळाडूने भारताकडून या खेळांमध्ये भाग घेतला होता आणि पदकही जिंकले होते.

new google

ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारा पहिला

अ‍ॅथलीटऑलिम्पिक खेळांना आता १२५ वर्षे झाली आहेत. या ऑलिम्पिकमध्ये भारताने आतापर्यंत २८ पदके जिंकली आहेत. यातील दोन पदके त्याच एका अ‍ॅथलीटने जिंकली.

ऑलिम्पिक पदक

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकणार्‍या या खेळाडूचे नाव नॉर्मन प्रीचर्ड आहे. नॉर्मन प्रिचर्डचा जन्म कोलकाता येथे झाला होता,ते नंतर ब्रिटनमध्ये गेले आणि शेवटपर्यंत अमेरिकेत राहिले.

१९०० च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणारे नॉर्मन हे पहिले भारतीय खेळाडू होते.

त्यांनी जिंकलेली २ रौप्यपदके!!

त्यांनी या खेळांमध्ये धावपटू म्हणून भाग घेतला. यात २०० मीटर अडथळे शर्यत आणि २०० मीटर डॅश स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. हा पराक्रम करणारा तो पहिला आशियाई अ‍ॅथलीट ठरला. नॉर्मन बहुमुखीपणाने समृद्ध होते. धावण्याबरोबरच त्यांना फुटबॉल खेळायलाही आवडले.

कोलकात्यात वास्तव्य करताना त्यांनी अनेक फुटबॉल सामने जिंकले. ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी ते भारतीय पासपोर्टवर पॅरिस येथे पोहोचले होते. ऑलिम्पिकमध्ये त्याने जिंकलेल्या पदकांवर ब्रिटनने सुद्धा दावा केलेला. असे असले तरी नॉर्मनने यात स्वतंत्र अ‍ॅथलीट
म्हणून या खेळांमध्ये भाग घेतलेला.

ब्रिटीश इतिहासकारांचे म्हणणे आहे की नॉर्मन ब्रिटीश अ‍ॅमेच्योर अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या टीमसह पॅरिसमध्ये दाखल झालेले. तेव्हा त्यांच्याकडे बंगाल प्रेसीडेंसी अ‍ॅथलेटिक क्लब आणि लंडन अ‍ॅथलेटिक क्लबचेही सदस्यत्व होते.

अभिनयामध्ये देखील नशीब आजमावून पाहिले…

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्यांच्याकडून जिंकलेल्या पदकांचे श्रेयही भारताला दिले आहे. याचा उल्लेख त्यांनी आपल्या अधिकृत वेबसाइटवरही केलेला आहे. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर नॉर्मन प्रिचर्ड इंग्लंडमध्ये स्थायिक झाले होते. येथे त्यांनी व्यवसाय केला. त्यानंतर ते अमेरिकेत गेले आणि त्यांनी अभिनयाला सुरुवात केली.

नॉर्मन ट्रेवर या नावाने त्यांनी बर्‍याच नाटकांत आणि चित्रपटांत काम केले. देशासाठी पहिले ऑलिम्पिक पदक जिंकणारा नॉर्मन खरोखरच हुशार होते.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:  हे आहेत इतिहासातील अत्यंत खतरनाक स्नायपर्स

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here