आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धात या सैनिकाने ६० पाकिस्तानी टैंक उडवले होते..!स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात बरीच युद्धे झाली त्यामध्ये भारत जिंकला. १९६५ च्या युद्धामध्ये पाकिस्तान विजयी असल्याचा दावा केला जात असला, तरी इतिहासकारांचे याबद्दल भिन्न मत आहे. ते म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत भारत या युद्धात पराभवाच्या वाटेवर नव्हता.

असो, आज आम्ही तुम्हाला १९६५ च्या त्याच भारत-पाकिस्तान युद्धाच्या नायकाबद्दल सांगू ज्याने आपल्या धाडसाच्या आणि सैनिकांच्या जोरावर पाकिस्तानच्या अनेक टॅंक उध्वस्त केल्या होत्या.


आम्ही बोलत आहोत शहीद लेफ्टनंट कर्नल ए.बी. तारापोर यांच्याबद्दल. त्यांचे  पूर्ण नाव अर्देशिर बुर्जोरजी तारापोर होते, ते पुण्याचे रहिवासी होते.त्यांचे वंशज वीर शिवाजी महाराजांच्या सैन्याचे नेतृत्व करतात. त्यांना शौर्य वारसारुपीच मिळाले आहे . वाचन व खेळातील अव्वल, ए.बी. तारापोर यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर भारतीय सैन्य दलासाठी परीक्षा दिली. १९४२ मध्ये, हैदराबाद सैन्याच्या पायदळ दलासाठी त्यांची निवड झाली.

सैनिक

पण तारापोर याना आरंभाच्या रेजिमेंटमध्ये सुरुवातीपासूनच सामील व्हायचे होते. त्यांचे धैर्य आणि समर्पण पाहून त्यांना लवकरच पहिल्या हैदराबाद इम्पीरियल सर्व्हिस लाँन्सर्सकडे पाठवले गेले.  स्वातंत्र्यानंतर ते १९५१ मध्ये पूना हॉर्स रेजिमेंटच्या १७ व्या बटालियनमध्ये तारापूर येथे तैनात होते. १९६५ मध्ये पाकिस्तानने काश्मीर ताब्यात घेण्याच्या वाईट हेतूने भारतावर हल्ला केला. तेव्हा मोर्चा सियालकोटमध्ये हाताळला गेला होता.
 मोर्चा ताब्यात घेण्यासाठी तारापोर यांना रणांगणावर पाठवले होते.

new google

आपल्या बटालियनला सोबत देऊन त्यांनी पाकिस्तानमधील सियालकोट गाठला. येथे त्यांनी अशी रणनीती बनवून हल्ला केला की पाकिस्तानच्या सैनिकांना माघार घ्यायला भाग पाडले गेले. यानंतर तारापोर यांना फिल्लौरावर हल्ला करण्यास सांगितले गेले जेणेकरून चविंदाला पकडता येईल. तारापोर आपल्या सैनिकांसह पुढे गेले तर दुसरीकडे पाकिस्तानकडून अमेरिकेतून अद्ययावत युद्ध टॅंकसह भारतीय सैनिकांवर चालून येत  होते.


पण तारापोर व त्यांच्या सैनिकांनीही प्रत्युत्तर देण्यासाठी कसलीही कसर सोडली नाही. १७ व्या पूनिया हार्स आणि गढवाल रायफल्स रेजिमेंटने एकत्रितपणे पाकिस्तानच्या चाविंदा परिसराला मागून घेरण्याचे उद्दीष्ट ठेवले होते. यादरम्यान गढवाल रायफल्सचे काही सैनिक शहीद झाले. पण तारापोर यांच्या सैनिकांनी हार मानली नाही ते ठाम राहिले. त्यांच्या नेतृत्वात १७ व्या पूना हॉर्सच्या सैनिकांनी पाकिस्तान सैन्याच्या ६० युद्ध टॅंक उध्वस्त केल्या.यामुळे पाकिस्तानी सैन्य चांगलंच हादरले.   चविंदाच्या या युद्धामध्ये तारापोरही शत्रू सैनिकांच्या गोळ्याचे लक्ष्य बनले होते.

शेवटचा क्षण पाहून त्यांनी आपली शेवटची इच्छादेखील व्यक्त केली. जर ते शहीद झाले तर त्यांचे शेवटचे संस्कारही या रणांगणात करावे अशी  त्यांची शेवटची इच्छा होती. ते शहीद झाल्यानंतर त्याच्या रेजिमेंटने त्यांच्या इच्छेचा मान ठेवत तसंच केलं. शासकीय इतमामात त्यांच्यावर युद्धभूमीतच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.

. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर सर्वोच्च सैन्य पदक ‘परमवीर चक्र’ प्रदान केले होते.

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here