आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

१८५७च्या राष्ट्रीय उठावात भारतीयांची मदत केलेली ही महिला इतिहासात हरवलीय..!


१८५७ मध्ये भारतीयांनी इंग्रजांविरुद्ध बंड केले. ब्रिटीशांना भारताबाहेर घालवण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणी भारतीय क्रांतिकारकांचा संघर्ष झाला. महिलांनीही या क्रांतीत अभूतपूर्व योगदान दिले. १८५७ च्या क्रांतीबद्दल बोलताना राणी लक्ष्मीबाई, बेगम हजरत महल, झलकारी बाई यांसारख्या थोर महिलांची नावे चटकन मनात येतात.

टाईम्स ऑफ इंडियाच्या एका बातमीनुसार, अशा अनेक स्त्रिया आहेत ज्यांनी क्रांतीमध्ये भाग घेतला, परंतु त्यांची वीर गाथा इतिहासात हरवली.

इतिहासकार आणि लेखक डॉ. रोझी लेव्हलिन जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, सिकंदर बागेत एका आफ्रिकन महिलेने ब्रिटिशांविरूद्ध भारतीय क्रांतिकारकांशी खांद्याला खांदा लावून लढा दिलेला.

new google

जोन्स यांनी लखनऊ आणि त्याच्या इतिहासावर संशोधन केले आणि त्यात लिहिलेले आहे. एकदा सनतकदा उत्सवात जोन्स त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलत होते तेव्हा त्यांनी इतिहासात जवळजवळ नामशेष झालेली ही गोष्ट सांगितली.

डॉ. जोन्स अवध आणि लखनऊ मध्ये झालेल्या १८५७ च्या घटनांवर आधारित पुस्तक प्रकाशित करणार आहेत.

१८५७-५९ मध्ये विल्यम फोर्ब्स-मार्शल यांनी लिहिलेल्या “Reminiscence Of The Great Mutiny”या पुस्तकात या महिलेचा उल्लेख आहे.

मिशेलच्या म्हणण्यानुसार, काही इंग्रज सैनिकांनी लखनऊमधील सिकंदर बागची लढाई संपल्यानंतर मोठ्या पिंपळाच्या झाडाखाली आश्रय घेतलेला. या सैनिकांच्या आसपास इंग्रजी सैनिकांचे बरेच मृतदेह होते. कॅप्टन डॉसनच्या मते, या मृतांचे मृतदेह पाहून असे दिसते की कोणीतरी वरून गोळीबार केला आहे.

भारतीय

कॅप्टन डॉसनने आपल्या सैनिकांना झाडाच्या फांद्या तपासायला सांगितले की त्यावर कोणी लपलेले आहे का ते पाहा. एका सैनिकानं तो हल्लेखोर पाहिला. शिपायाने आपली बंदूक चालवली व वरून एक मृतदेह खाली पडला.

मिशेलने आपल्या पुस्तकात पुढे लिहिले आहे की मृताने ‘टाइट फिट रेड जॅकेट’ आणि ‘गुलाबी रंगाची पायघोळ पॅन्ट’ घातलेली होती. जॅकेट उघडल्यावर ब्रिटीशांना समजले की तो महिलेचा मृतदेह आहे.

गोळीबार करणाऱ्या शिपायाने देखील अशी खंत व्यक्त केली की, जर ती स्त्री असल्याचे आपल्याला माहित असते तर तो स्वतः हजार वेळा मरण्यासाठी तयार झाला असता परंतु त्याने तिला मारले नसते.

डॉ. जोन्सने द बेटर इंडिया सोबत बोलताना सांगितले की , केवळ मिशेलच्या पुस्तकातूनच त्या स्त्री क्रांतिकारकांबद्दल कळते. ती बाई सिकंदर बागेच्या युद्धात शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष करत राहिली व अखेरीस तिने बर्‍याच इंग्रज सैनिकांना यमसदनी पोहोचवले.

अरब स्लेव ट्रेडर्स आपल्या सोबत हजारो गुलाम घेऊन भारतात आलेले. गुलामांचा व्यापार अरब देशातील स्लेव व्यापारी आणि भारतातील स्लेव व्यापारी यांच्यात होत असे.

अनेक शतकांपासून पुरुष, स्त्रिया, मुले पूर्व आफ्रिकेतून भारतात आणली जात होती. डॉ. जोन्स यांच्या म्हणण्यानुसार, मिशेल असा उल्लेख केलेली आफ्रिकन महिला सैनिक मिशेल, एकतर आफ्रिकेतून आली आहे किंवा ती भारतातच जन्मली असावी.

नवाब वाजिद अली शाह यांना आफ्रिकन महिला आणि आफ्रिकन भारतीय मिश्रण असलेल्या स्त्रिया आवडल्या. बेगम हजरत महल एक आफ्रिकन गुलामांची मुलगी होती.

नवाब वाजिद अली शाह यांच्या सैन्यात  हब्शियन पलटनही होती, त्यात आफ्रिकन सैनिकांचा समावेश होता. डॉ. जोन्स यांनी सांगितले की या पलटण मध्ये एकही महिला सैनिक असणार नाही. परंतु नवाब शहा यांच्याकडे महिला अंगरक्षक होते. ब्रिटीशांनी या महिला शरीररक्षकांना ‘अ‍ॅमेझॉन’ असे म्हटलेले.

डॉ. जोन्स यांच्या मतानुसार, ती आफ्रिकन महिला देखील या महिला सैनिक संघाचा भाग असण्याची शक्यता होती. नवाब शाल यांच्याकडे एक ‘गुलाबी पलटन’ होती आणि बहुदा बॉडीगार्डलाही हेच नाव असू शकत. महिलेने घातलेल्या वेशभूषेवरून ती त्या पलटनचा भाग असल्याचे सिद्ध होते.

डॉ. जोन्स यांचा अस म्हणणं आहे की ब्रिटिशांकडे चांगली शस्त्रे होती आणि भारतीयांकडे शस्त्रास्त्रांची कमतरता होती, या मोठ्या कारणांमुळे भारतीय हे युद्ध हरले.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here