आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

==

…आणि चक्क भारतात शून्य रुपयाच्या नोटा छापल्या गेल्या…!
तुम्ही कदाचित जाणून असताल कि झिरो रुपया चलन भारतात नाहीये मग ​’झिरो रूपी नोट्स’ का व कोणी छापल्या. त्यास उत्तर म्हणून सर्वात आधी आम्ही हे सांगू की आरबीआयने आजपर्यंत ‘झिरो रूपया’ नोटा छापल्या नाहीत. आता प्रश्न उद्भवतो की जर आरबीआयने नोटा मुद्रित केल्या नसतील तर हे काम कोणी केले?

नोट

तामिळनाडूमधील ५ व्या स्तंभ नामक संस्थेने भारतात २००७ साली पहिल्यांदाच ‘झिरो रूपया’च्या नोटा छापल्या होत्या.

​वास्तविक असं झालं की, दक्षिण भारतातील काही ना-नफा संस्था (एनजीओ) द्वारे भारतात “शून्य रूपयाच्या” नोट्स छापल्या गेल्या. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाचा विरोध करणे आणि लोकांना त्याची जागृती व जाणीव करून देणे हा यामागील खरा हेतू होता.

​2007 मध्ये तामिळनाडूमधल्या ‘5 वा स्तंभ’ नावाच्या संस्थेने प्रथम या नोटा छापण्याची सुरुवात केली होती. या काळात स्वयंसेवी संस्थेने लाखो शून्य रुपयांच्या नोटा छापल्या. या नोटा हिंदी, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या चार भाषांमध्ये छापल्या गेल्या. या नोटांवर असे लिहिले होते की, ‘जर कोणी लाच मागितली असेल तर ही नोट द्या आणि आम्हाला ती बाब सांगा!’

नोट

​‘झिरो रुपया’ नोट छापण्यामागील या संस्थेचा खरा उद्देश म्हणजे देशात ‘झिरो करप्शन’ चे वातावरण निर्माण करणे हा होता. यावेळी संघटनेने तामिळनाडूमध्ये लाचखोरीबाबत जनजागृती करण्यासाठी आणि जनतेला त्यांचे हक्क आणि वैकल्पिक उपायांची आठवण करून देण्यासाठी 25 लाखांच्या आणखी नोटा लोकांमध्ये वितरित केल्या होत्या.

​या दरम्यान संस्थेच्या स्वयंसेवकांनी या नोटा रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि बाजारपेठेतील लोकांना वाटल्या. याशिवाय लग्नाच्या समारंभाच्या प्रवेशद्वारावर, वाढदिवसाच्या मेजवानी आणि सामाजिक सोहळ्यासाठी माहिती डेस्कवर देखील लावल्या गेल्या. या दरम्यान ‘झीरो रूपया’ नोटसह लोकांना भ्रष्टाचाराची योग्य माहिती मिळावी म्हणून लोकांना माहिती पुस्तिका आणि पत्रके वाटप करण्यात आली.

​गेल्या ५ वर्षांपासून ही संघटना दक्षिण भारतातील १२०० हून अधिक शाळा, महाविद्यालये आणि सार्वजनिक संस्थांमध्ये भ्रष्टाचाराबद्दल जनजागृती करण्यासाठी कार्यरत आहे. या दरम्यान संस्थेने ३० फूट लांब आणि १५ फूट उंचीचे शून्य रुपयांचे नोट बॅनरही बनवले होते. ज्यावर ५ लाखाहून अधिक लोकांनी सही आहे.

​त्यावेळी या एनजीओने असा दावाही केला होता की या नोटांमुळे एकूण भ्रष्टाचारात १% टक्के घट झाली आहे.

new google

 

==

आमचे नवनवीन लेख वाचण्यासाठी www.kolhapuritadka.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या. [email protected] kolhapuritadka.com | All Rights Reserved

हेही वाचा:

या वयातील महिलांना असते रोमान्सची सर्वांत तीव्र इच्छा.. झाला खुलासा.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here