जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

आग्र्यामधील या प्रसिद्ध गुरुद्वाऱ्यात गुरु तेग बहादूर यांना ९ दिवस डांबून ठेवले होते…!


 

गुरुद्वारा ‘गुरु का ताल’ आग्रा मधील असे ऐतिहासिक ठिकाण, जिथे गुरु तेग बहादूर यांना ९ दिवस तुरूंगात डांबले गेलेले!

‘गुरुद्वारा गुरु का ताल’ हे शहरातील एक प्राचीन धार्मिक स्थळांपैकी एक आहे.

new google

आग्रा शहरात अशी अनेक ऐतिहासिक स्थाने आहेत, ज्याबद्दल आपण ऐकत आणि वाचत आलो आहोत. परंतु, तेथे बरीच ठिकाणे अजूनही अशी आहेत, ज्यांचा मनोरंजक इतिहास फक्त काही लोकांना माहिती आहे. यातील एक ऐतिहासिक स्थळ म्हणजे ‘गुरुद्वारा गुरु का ताल’.

‘गुरुद्वारा गुरु का ताल’ हे शहरातील जुन्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे, ज्यास लोकांमध्ये खूप मान्यता आहे.
असे म्हटले जाते की संत बाबा साधूसिंग जी मुनी यांच्या नेतृत्वात १९७० मध्ये गुरुद्वारा बांधण्यात आली. याच ठिकाणी शीख समुदायाचे ९ वे गुरु, गुरु तेग बहादूर यांना ९ दिवस तुरूंगवास भोगावा लागला. या स्थितीचा पुरावा म्हणून तेथे, एक अखंड ज्योत अखंड पेटलेली आहे.

त्याचा रंजक इतिहास कसा आहे?

गुरु तेग बहादूर

तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला गुरुद्वारामध्ये तलाव असल्याचे दिसून येईल. गुरु तेग बहादूर साहिब यांनी या तलावामध्ये आपले हात ठेवून स्वतःला औरंगजेबाच्या सैन्याला देऊन टाकले होते. या गोष्टीचे महत्व शीख समुदायापेक्षा जास्त चांगले कोण समजू शकेल?

गुरु तेग बहादूर यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आलेली ही गुरुद्वारा लाल दगडाने बांधली गेली आहे, ज्याची रचना मुघल स्थापत्य शैलीने प्रेरित आहे.

म्हणूनच गुरुद्वाराची रचना फतेहपूर सिक्री आणि आग्रा किल्ल्यासारखी दिसते. या गुरुद्वाराबद्दल असेही म्हणतात की येथे अशी शक्ती आहे, जी प्रत्येकाच्या इच्छा पूर्ण करते. या विश्वासामुळे येथे भाविकांची गर्दी होत असते. जो इथे प्रामाणिक मनाने येतो, त्याची इच्छा नक्कीच पूर्ण होते.!

गुरु तेग बहादूर यांच्याबद्दल असे म्हणतात की औरंगजेबाच्या कारकीर्दीत त्यांनी मुस्लीम धर्म न स्वीकारून स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले होते. गुरु तेग बहादूर साहिब यांचे बलिदान आमच्या कायम स्मरणात राहील आणि तुम्ही देखील कधी आग्राला गेलात तर नक्की या गुरुद्वाराला भेट द्या.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

या भारतीय खेळाडूने मारलेला षटकार अरबी समुद्रात जाऊन पडला होता..!

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here