‘पगडी संभल जट्टा’ चळवळीद्वारे इंग्रजांचा विरोध करणारे अजितसिंग कोण होते?


 

२००२ मध्ये ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट आलेला. काळजाचे ठोके चुकवणारी दृश्ये आणि सर्व कलाकारांची कामगिरी. अजय देवगन, सुशांत सिंह, फरीदा जलाल, अमृता राव अशा कलाकारांचा हा चित्रपट सर्वांनाच आवडला.

या चित्रपटातच महाविद्यालयीन कार्यक्रमात भगतसिंग आणि त्याचे साथीदार ‘पगडी संभाल जट्टा, पगडी संभाल होये …’ या गाण्यात गोऱ्या लोकांसमोर, गाणे गाऊन दाखवतात आणि नाचतात. सुखविंदर सिंग यांच्या आवाजातील हे गाणे ऐकून खुपच भारी वाटते.

 अजितसिंग

यापूर्वी हे गाणे मोहम्मद रफी यांनी १९६५ च्या ‘शहीद’ चित्रपटात गायले होते. गाणं वेगळं आहे, सूर वेगळे आहेत, चित्रीकरण वेगळं आहे. पण दोन्ही गाणी ऐकल्यानंतर मनात निर्माण झालेल्या भावना सारख्याच होत्या.

new google

कधी असा विचार केला आहे का, ‘पगडी संभाल जट्टा’ हा शब्द कोठून आला असेल?

‘Tribune India’ मधील एका लेखानुसार ब्रिटीशांनी पंजाब लँड कॉलोनाइजेशन आणि बारी दोआब कैनल कायदा लागू बनवला होता. या कायद्यांतर्गत कालवा बांधण्याच्या बहाण्याने शेतकर्‍यांच्या जमिनी हडप केल्या जात असे व त्यांच्यावर मनमानी कर लावण्यात येत असे.

सरदार अजितसिंग यांनी ब्रिटीश सरकारने केलेल्या या अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू केले.

२२ मार्च, १९०७ रोजी, लयलपुर (आता पाकिस्तानचा भाग) मध्ये एक रॅली काढली. त्यावेळी झांग स्याल नावाचे एक वृत्तपत्र होते, ज्यांचे संपादक बांके दयाल यांनी हे गाणे गायले होते. हे गाणे इतके प्रसिद्ध झाले की या चळवळीचे नाव ‘पगडी सम्भल जट्टा’ आंदोलन असे ठेवले गेले.

इंग्रज सरकार यावर गप्प कसे राहू शकेल? भारताचे राज्य सचिव लॉर्ड मॉर्ली यांनी ब्रिटीश संसदेला सांगितले की पंजाबमध्ये एकूण 33 सभा आयोजित झाल्या असून त्यापैकी १९ मध्ये मुख्य सभापती सरदार अजितसिंह होते.

अजितसिंग आपल्या बोलण्याने जनतेला भारून टाकत असत आणि लोक त्यांचे ऐकत असत. २१ एप्रिल १९०७ रोजी त्यांनी दिलेलं भाषण ‘देशविरोधी’ मानलं गेलं. यापैकी काही सभांमध्ये लाला लाजपत राय यांनी ही भाषणे दिली.

अजितसिंग

मे १९०७. मध्ये ब्रिटीशांनी तिन्ही कायदे मागे घेतले, परंतु दोघांनाही ६ महिन्यांसाठी बर्मा कारागृहात पाठविण्यात आले.

अजितसिंग यांचा जन्म २ फेब्रुवारी १८८१ रोजी खटकर कलां (तत्कालीन जालंधर जिल्हा) येथे झाला. अर्जन सिंग, किशन सिंह (भगतसिंग यांचे वडील), अजितसिंग आणि स्वर्ण सिंह हे देशभक्त होते.

अजितसिंगने बरेली कॉलेजमधून कायद्याचे प्रशिक्षण घेतलेले.

१९०३ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अजितसिंग आणि किशन सिंह भारतीय राजकुमारांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले. भारतातील अनेक राजपुत्र व्हायसराय लॉर्ड कर्झन यांच्या दिल्ली दरबारात पोहोचले होते. अजितसिंग आणि किशनसिंग यांनी तेव्हा राजकुमारांना इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न केला.

१९०६ च्या कॉंग्रेसच्या अधिवेशनातही दोन्ही भाऊ उपस्थित होते. अधिवेशनातून पंजाबला परत आल्यावर, दोन्ही भावांनी ‘भारत माता सोसायटीची’ स्थापन केली, ज्याला उर्दूमध्ये ‘अंजुमन-ए-मोहब्बत-ए-वतन’
असे नाव आहे.

या सोसायटीने उर्दू भाषेत ब्रिटीश पत्रके छापली. या सोसायटीत सूफी अंबा प्रसाद, घसिटा राम, कवी लालचंद फलक, नंद किशोर मेहता, लाला रामसरन दास, जिया उल्लाह यांच्यासह अनेक सदस्य होते.

डिसेंबर १९०७ मध्ये अजितसिंग आणि सूफी अंबा प्रसाद यांनी सूरतच्या कॉंग्रेस अधिवेशनात हजेरी लावली. इकडे बाळ गंगाधर टिळकांनी अजितसिंग यांना मुकुट घालून ‘पंजाबच्या शेतकऱ्यांचा राजा’ म्हणून घोषित केले.

देश सोडण्यासाठी भाग पाडले….

आपल्याला चुकीच्या प्रकरणात अडकवणार आहेत हे अजितसिंग याना समजून चुकलेले, सुफी अंबा प्रसाद यांच्यासमवेत अजितसिंग कराचीहून जहाजाने इराणला गेले.त्यांनी स्वतःचे मिर्झा हसन खान हे नाव ठेवले आणि १९१४ पर्यंत इराण, तुर्की, फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये वास्तव्य केले.

त्यानंतर त्यांनी १८ वर्षे (१९१४-१९३२) ब्राझीलमध्ये घालविली. ते जेथे पण जातील तेथील लोकांना वेगवेगळ्या भाषा शिकवून त्यांनी आपले आयुष्य घालवले.

अजितसिंग देशाबाहेरही देशासाठी काम करत राहिले. त्यांनी इटलीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट घेतली आणि ११,००० सैनिकांची तुकडी घेऊन आझाद हिंद लष्कर याची स्थापना केली. त्यांची लेनिन, त्रोतस्की आणि मुसोलिनी यांच्याशीही भेट झाली.

स्वतंत्र भारतात घेतला शेवटचा श्वास!

जुलै १९४७ मध्ये ते उपचारासाठी डलहौसीला पोहोचले परंतु तेथे त्यांची प्रकृती खालावली. पंडित नेहरूंचे
‘Tryst with Destiny’ हे भाषण ऐकून त्यांनी स्वतंत्र भारतात शेवटचा श्वास घेतला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा : निर्वानिकरन : पर्यावरणाची सर्वांत मोठी समस्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here