जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====

केनियाच्या स्वातंत्र्यलढ्यात या भारतीय व्यक्तीचे योगदान महत्वाच ठरलं होत…!


भारत हा असा देश आहे जेथे बर्‍याच जाती आणि धर्मांचे लोक एकत्र राहतात. बर्‍याच भिन्न संस्कृती असूनही, आपल्यात एक समानता आहे, की आपण अत्याचार सहन करू शकत नाही. कदाचित हेच कारण आहे की आमच्याकडे गांधीजी पण झाले आणि चंद्रशेखर आझाद देखील झाले.

अनेकदा आपण ऐकले आहे की बापू एकच होते, पण बापू फक्त एक व्यक्ती नव्हते, ते एक विचार होते. ते एक व्यक्ती म्हणून एक असू शकतात, पण विचार आणि कल्पना या मानाने अगणित असू शकतात.

अशाच एका व्यक्तीबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत. त्यांना केनियाचे बापू किंवा महात्मा म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

new google

त्यांचे नाव माखन सिंह होते. १९५० मध्ये, पंजाब राज्यातील माखन सिंग यांनी केनियामध्ये इंग्रजांच्या विरोधात आंदोलन सुरू केले. माखन सिंग हे केनिया ट्रेड युनियनचे नेते होते. केनियाला संपूर्ण स्वराज्य देण्याची मागणी केली.
ब्रिटीशांसमोर प्रथमच केनियामधील एखाद्याने इतक्या शक्तिशाली मार्गाने स्वातंत्र्याचा आवाज उठविला होता.

सरकारविरूद्ध बोलल्यामुळे इंग्रजांनी त्यांना तुरूंगात टाकले. परंतु असे असूनही कामगार संघटनेने त्यांचा आवाज थांबवला नाही आणि माखन सिंग यांना सोडण्यासाठी संप सुरू केला आणि त्यानंतर या संपाने केनियामध्ये चळवळीचे रूप धारण केले.

जवळजवळ ११ वर्षे, त्यांना वेगवेगळ्या तुरुंगात ठेवण्यात आले, फक्त त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाच त्यांना भेटायला परवानगी होती.
केनिया १९६३ मध्ये स्वतंत्र झाला आणि माखन सिंग यांना तुरूंगातून सोडण्यात आले.

त्यांचा जन्म २ डिसेंबर १९१३ रोजी पंजाबमधील गुजरनवाला जिल्ह्यात (आता पाकिस्तानचा भाग) येथे झालेला. त्यांचे वडील केनियाला गेले होते आणि काही काळानंतर त्यांनी तिकडे आपल्या कुटूंबाला देखील बोलवले.

माखन सिंह अभ्यासामध्ये खूप चांगले होते, त्यामुळे स्थानिक आणि भारतीयांना त्यांची चांगली ओळख झालेली. त्यांना कामगार संघटनेत नेताही बनविण्यात आले. त्यानंतरच त्यांनी केनियामध्ये पूर्ण स्वराज्याची मागणी केलेली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here