जगभरातील रंजक माहिती व लेख वाचण्याकरिता आमच्या फेसबुक पेजला लाईक करा.

====


हजारो वर्षांपूर्वीच्या चीनच्या भिंतीमध्ये लपलेली आहेत ही रहस्ये…!
ही  एवढी मोठी भिंत चीनच्या विविध राज्यकर्त्यांनी ५ व्या शतकापासून ते १६ व्या शतकापर्यंत उत्तरेकडील आक्रमणकर्त्यांपासून संरक्षण करता यावे म्हणून बांधल होती.

आपण जगातील 7 अजूबे मानतो ते ताजमहाल, पेट्रा, कोलोसीयम, चेचन इत्झा, माचू पिच्चू, क्राइस्ट द रिडीमर आणि द ग्रेट वॉल ऑफ़ चाइना इत्यादी आहेत. तथापि, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, आयफेल टॉवर, सिडनी ओपेरा हाऊससह अन्य १३ चमत्कारांचा देखील या यादीमध्ये समावेश होतो.

चीन

आज आपण चीनच्या ग्रेट वॉल बद्दल बोलू. चीनची हि लांबलचक भिंत त्याचे बांधकाम, मजबुती आणि भिंतीचा दीर्घ इतिहास इत्यादीमुळे जगप्रसिद्ध आहे. ही प्रचंड मोठी भिंत चिखल व दगडाने बनलेली तटबंदीची भिंत आहे जी चीनच्या विविध शासनकर्त्यांनी इ.स.पू. ५व्या शतकापासून ते १६ व्या शतकादरम्यान उत्तरी आक्रमणकर्त्यांपासून संरक्षण करण्यासाठी बांधली. म्हणूनच या भिंतीला ‘थे ग्रेट वॉल ऑफ चायना’ म्हटल्या जाते आणि ही ग्रेट वॉल आता २,3०० वर्षांपेक्षा जास्तच जुनी आहे.

आज आम्ही तुम्हाला या जगातील प्रसिद्ध ‘वॉल ऑफ चायना’ संबंधित काही मनोरंजक तथ्ये संगनार आहोत..

1- ही भिंत चीनचे खूप पूर्वीचे राजा ‘किन शि हुआंग’ यांची कल्पना होती, त्यानंतर लगभग 2000 वर्षांनी ही भिंत बांधली गेली असा इतिहास आहे.

२- या भिंतीच्या बांधणीचे श्रेय कोणत्याही एका राजाचे नसून अनेक राजे व शासकांना
दिले जाते.

– तसेच ही भिंत बनवताना दगडांमध्ये तांदळाच्या पिठाचा वापर केला जायचा. हे नक्कीच तुम्हाला माहित नव्हतं, हो ना?

4- चीनच्या या भिंतीची लांबी ६४०० किमी आहे व ही जगातील सर्वात मोठी मानवनिर्मित रचनाकृती आहे. म्हणूनच ऐतिहासिक ही!

५. ही संपूर्ण भिंत सलग नसून लहान-लहान भागांनी बनलेली आहे. त्यात बर्‍याच ठिकाणी रिकामी जागाही आहेत.

६. या द ग्रेट ‘वॉल ऑफ चायना’ च्या रिकाम्या जागा जोडल्यास त्याची लांबी ८८४८ किमी इतकी होईल.

7- या भिंतीची रुंदी इतकी आहे की ५ घोडेस्वार किंवा १० पाय सैनिक एकाच वेळी गस्त घालू शकतात. आहे ना मजेशीर?

8- या ‘वॉल ऑफ चायना’ ची उंची सर्व ठिकाणी समान नाहीये, कुठे हि भिंत ९ फूट उंच आहे तर काही ठिकाणी ३५ फूट उंच देखील आहे.

9. शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी ‘वॉल ऑफ चायना’ मध्ये बर्‍याच ठिकाणी छिद्रही बनवलेले आहेत.

10. चीनची ही भिंत प्रथमच सन १९७० मध्ये सर्वसाधारण पर्यटकांसाठी उघडनयेत आली.

11- युनेस्कोने १९८७ मध्ये ‘चीनच्या वॉल’चा समावेश जागतिक वारसा यादीमध्ये केला होता.

12- सन १२११ मध्ये चंगेज खानने ही ‘वॉल ऑफ चायना’ तोडून चीनवर हल्ला केला होता.

13- १९६० च्या दशकात काही लोकांनी या भिंतीच्या विटा काढून घरे बांधायला सुरुवात केली होती.

14- आजही ‘वॉल ऑफ चाइना’ ची चोरी होत आहे. या भिंतीची एक वीट चोर बाजारात 3 पौंडामध्ये विकली जाते.

15- ‘चीनची ही ग्रेट वॉल’ ही एकमेव मानवनिर्मित रचना आहे जी अंतराळातूनही दिसते.

चीन

16- ज्या कामगारांनी ही भिंत बनविण्यामध्ये मेहनत घेतली नाही त्यांना या भिंतीतच पुरण्यात आले होते असे म्हणतात.

17- चिनी भाषेत या भिंतीला ‘वान ली चांग चांग’ म्हणतात ज्याचा अर्थ ‘चीनची मोठी भिंत’ आहे.

18- दरवर्षी जगभरातून सुमारे १० दशलक्ष पर्यटक चीनची भिंत बघायला येतात.

19- आकडेवारीनुसार ही भिंत बांधण्यात सुमारे १० लाख लोकांनी आपला जीव गमावला. म्हणूनच याला जागेला जगातील सर्वात मोठे स्मशानभूमी देखील म्हटले जाते.

20- बराक ओबामा, रिचर्ड निक्सन, क्वीन एलिझाबेथ द्वितीय आणि जपानचा सम्राट अकिहितो यांच्यासह जगभरातील सुमारे 400 नेत्यांनी ही भिंत पाहिली आहे.

खरतर ही भिंत चीनने देशाला शत्रूंपासून वाचवण्यासाठी बनविली होती, परंतु नंतर नंतर याचा वापर एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वस्तूंच्या वाहतुकीसाठी करण्यात येत होता.

तुम्हाला हि माहिती कशी वाटली व यातली काही रहस्य तुम्हाला पूर्वी ज्ञात होती का कमेंट करून नक्की  सांगा.

new google

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

तुम्हाला हे सुद्धा वाचायला आवडेल. = अस्सल  हापूस आंबा कसा ओळखायचा?

या भारतीय खेळाडूने मारलेला षटकार अरबी समुद्रात जाऊन पडला होता..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here