आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

एका कुत्र्यामुळे या दोन देशात भयंकर युद्ध झाले होते..!


 

इतिहासात, या युद्धास ‘इंसीडेंट पेट पेट्रिच’ किंवा ‘द वॉर ऑफ द स्ट्रॅ डॉग’ म्हणून देखील ओळखले जाते.

आतापर्यंत जगात बरीच मोठी युद्धे झाली आहेत, त्यात ‘पिग वॉर’ पासून ‘वर्ल्ड वॉर’ अशी अनेक युद्धं झाली आहेत. 1900 ते 2000 या काळात जगभरात एकूण 37 मोठी युद्धे लढली गेली. या दरम्यान, छोट्या छोट्या गोष्टींवरुन काही युद्धं झाली. तर यातील एक युद्ध हे कुत्र्यामुळे झाले.


गोष्ट 1925 सालची आहे. या दरम्यान ग्रीस (युनान) आणि बल्गेरिया दरम्यान बरेच संघर्ष चालू होते. मग या दोन देशांदरम्यान असे काहीतरी घडले जे ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटेल. वास्तविक, कुत्र्यामुळे या दोन देशांमध्ये “युद्ध” चालू झालं, होय,एका कुत्र्यामुळे.

युद्ध

खरतरं, या दोन देशांमधील सुरू असलेल्या तणावामुळे ग्रीसमधील एका कुत्र्याने चुकून डेमेरकॅपियाची सीमा ओलांडली. आता तो कुत्रा पकडण्यासाठी त्याचा मालक (जो ग्रीक सैन्यात सैनिक होता) चुकून म्हणा व नाईलाजाने मॅसेडोनियाच्या हद्दीत घुसला.

या दरम्यान, “डेमेरकॅपिया सीमा” संरक्षित करण्याची जबाबदारी बल्गेरियन सैनिकांवर होती. जेव्हा बल्गेरियन सैनिकांनी एक ग्रीक सैनिक त्यांच्या हद्दीत घुसला हे पाहिले तेव्हा त्यांनी संकोच न करता त्याच्यावर गोळी चालविली. यानंतर दोन्ही देशांमधील राजकीय तणाव वाढला आणि युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, आपल्या सैनिकाच्या हत्येचा राग आल्याने ग्रीसने बल्गेरियातील पेट्रीक शहर ताब्यात घेतले.

ग्रीस आणि बल्गेरिया दरम्यान हे युद्ध 18 ऑक्टोबर 1925 ते 23 ऑक्टोबर 1925 या काळात लढले गेले. 7 दिवस चाललेल्या या युद्धात दोन्ही देशांतील सुमारे 50 जण ठार झाले. ग्रीसने युद्ध सुरू केले असले तरी बल्गेरियांनी युद्ध जिंकले. यानंतर ‘लीग ऑफ नेशन्स’ च्या हस्तक्षेपाने हे युद्ध संपले.

युद्धाच्या समाप्तीनंतर दोन्ही देशांदरम्यान एका करारावर स्वाक्षरी घेण्यात आली. या करारामध्ये ग्रीसने युद्ध सुरू केल्याने बल्गेरियाला झालेल्या नुकसानीची भरपाई होईल असा निर्णय घेण्यात आला. तेव्हा ग्रीसने बल्गेरियाला 45 हजार पौंड दिले, जे आजपर्यंत सुमारे 47 लाख रुपये आहे.

new google

फक्त एका कुत्र्यामुळे ग्रीसला एवढी किंमत चुकवावी लागली.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा…  जाणून घ्या कडू कारले खाण्याचे फायदे

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here