आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

हा कुख्यात अमेरिकन ड्रग्स माफिया शहीद सैनिकांच्या मृतदेहातून अमली पदार्थांची तस्करी करायचा…!


तसा ड्रग्स आणि अमेरिकेचा संबंध फार जुन्या काळापासून.. अमेरिकन ड्रग्स डीलरच्या अनेक कथा आपण आजपर्यंत ऐकल्या असतील, वाचल्या असतील. या आमली पदार्थांच्या धंद्यातील प्रतेकाची वेगळी अशी काहीतरी खाशियत असायची.. असाच एक अमली पदार्थ तस्कर अनेक दिवस अमेरिकन पोलिसांसाठी डोकेदुखी बनून राहिला होता.. तो तस्कर म्हणजे ‘फ्रॅंक लुकास’. आमली पदार्थाच्या तस्करीत सर्वांत भयानक अशी युक्ती कोणी वापरली असेल तर ती यानेच..

फ्रॅंक लुकास याने  शहीद सैनिकांच्या मृतदेहांमध्ये अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी विशेष कोफिन तयार केले होते. १९६०-७० च्या दशकाच्या उत्तरार्धात, अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यात युद्ध सुरू होते, दुसरीकडे, ब्लू मॅजिक नावाचे ड्रग्ज अमेरिकेच्या हार्लेम आणि नेवार्कमध्ये लोकांचा बळी घेत ​​होते.

या दोन्ही गोष्टींमुळे सरकार अस्वस्थ झालेले, त्यानंतर पोलिसांनी तपास केल्यावर असे आढळले की हे ड्रग्ज अमेरिकेतील शहीदांच्या मृतदेहांद्वारे व्हिएतनाममधून येत आहेत. आणि मग समोर आले अमेरिकेच्या ड्रग माफियाचे नाव फ्रँक लुकास.

अमेरिकेतील पोलिसही त्याच्या ड्रग्स तस्करीच्या शैलीने आश्चर्यचकित झाले,की त्याने अनेक वर्षांपासून पोलिसांना कसे चकवले.

ड्रग्स

आज आम्ही तुम्हाला या गँगस्टरची कहाणी सांगणार आहोत, ज्याला ड्रग्सच्या दुनियेचा राजा म्हटले जाते. फ्रँक लुकास इतका प्रसिद्ध झाला की त्यावर एक पुस्तक आणि अमेरिकन गँगस्टर नावाचा सिनेमा देखील बनला आहे.

लहानपणीच उतरला गुन्हेगारीच्या जगात..

फ्रँक लुकास हा अमेरिका उत्तर कॅरोलिना येथे जन्मलेला एक सामान्य माणूस होता, त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट होती. तो जिथे राहत होता तिथे गुन्हेगारीच्या जगाचे मोठे-मोठे बदमाश असायचे.एके दिवशी त्यांनी रागाच्या भरात फ्रँकच्या भावाचा बळी घेतला. आता घर चालवण्याची जबाबदारी फ्रँकसमोर आली होती. लहानपणापासूनच तो कधीकधी जेवण चोरुन तर कधी दारूड्यांच्या खिशातून पैसे काढून घेत असे. मोठा झाल्यावर त्याने दुकानात काम करणे सुरू केले पण क्षुल्लक चोऱ्या चालूच ठेवल्या.

एके दिवशी जेव्हा दुकानाचा मालक आला नाही तेव्हा फ्रॅंकने गपचूप $400 चोरले. जेव्हा मालकाला पैसे मिळाले नाहीत तेव्हा त्याने पोलिसांना बोलावले. पोलिसांच्या भीतीने फ्रॅंक आपले घर सोडून न्यूयॉर्कला पळून गेला. येथे फ्रॅंक गाडी चालवायला शिकला आणि आणि त्याने एका गँगस्टरची गाडी चालवायला सुरवात केली.

जॉन्सन असे त्या गुंडाचे नाव होते, जो त्या काळात मोठा ड्रग्स विक्रेता होता. त्याला फ्रँक खूप आवडला, त्याने त्याला या गुन्हेगारी जगाशी संबंधित सर्व रहस्ये व युक्त्या शिकवल्या. एके दिवशी जॉनसन दोन गटांमधील झालेल्या चकमकीत मरण पावला.

१९६८ मध्ये जॉन्सनच्या मृत्यूनंतर फ्रँकने त्याची जागा घेण्यास उशीर केला नाही. आता त्याला गुन्हेगारीच्या जगाचा नवा राजा व्हायचं होत. या उद्देशाने त्याने त्वरीत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर ड्रग्जची विक्री सुरू केली. पण या व्यवसायात एक अडचण होती, ती म्हणजे मध्यस्थ, जे त्याच्याकडे ड्रग्ज पुरवत असत परंतु त्या बदल्यात ते भारी कमिशन आकारत असत. फ्रॅंकने सर्व नफा स्वत: कडेच ठेवण्याचे ठरविले आणि त्या सर्वांना मार्गातून काढून टाकण्याचे ठरवले. याच हेतूने त्याने ड्रग्स देणाऱ्या सर्व मध्यस्थांना ठार मारण्यास सुरवात केली.

हेही वाचा: केविन मिटनिक हा असा एकमेव गुन्हेगार हॅकर आहे ज्याला सरकार स्वतः करोडो रुपये देतेय…!

फ्रँक त्याच्या उद्देशाने यशस्वी झालाही. हळूहळू त्याने अमेरिकेच्या ड्रग्स व्यवसायाचा ताबा घेतला. दरम्यान, पोलिसांनीही त्यांचे काम सुरू केले. त्याने तेजीत ड्रग्ज पाठविणाऱ्यांना पकडण्यास सुरवात केली. हा काळ होता जेव्हा फ्रॅंकला व्यवसाय करण्यास अडचणी येऊ लागल्या. हे टाळण्यासाठी त्याने असा उपाय केला, ज्याला आजही पोलिस सर्वात नियोजित गुन्हा असे म्हणतात.

सैनिकांच्या शरीरातून केली अमली पदार्थांची तस्करी…

हे तेव्हाचे दिवस आहेत जेव्हा अमेरिका आणि व्हिएतनाम दरम्यान युद्ध सुरु झालेले. तोपर्यंत फ्रॅंककडे ड्रग्ज येणे बंद झाले होते. मग तो थायलंडला गेला आणि तेथे प्रसिद्ध ब्लू मॅजिक ड्रग्स आणण्याचा सौदा केला. आता एकच अडचण होती ती म्हणजे ही ड्रग्ज अमेरिकेत कशी आणायची? हे ड्रग्ज ९८% शुद्ध होते, आणि ते बाजारात हातोहात विकल्या जात असे. यावेळी फ्रँक लुकासने एक मोठा डाव खेळण्याचे ठरवले.

युद्धाचा फायदा घेण्याच्या उद्देशाने त्याने काही भ्रष्ट अधिकाऱ्यांना फसवले, त्यांच्यामार्फत त्याने व्हिएतनाममध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या मृतदेहांसह न्यूयॉर्कमध्ये ड्रग्सची वाहतूक करण्यास सुरवात केली. यासाठी त्याने एक खास प्रकारची शवपेटी तयार केली ज्यात ड्रग्स आरामात ठेवता येतील आणि यात कोणाला काही शंकाही येणार नाही. तसेही शहीद झालेल्यांची शवपेटी कोण तपासेल?

आता अमेरिकेत ड्रग्ज वेगाने पसरू लागले. लहान मुले देखील याच्या बळी पडू लागली. त्याच्या अति प्रमाणामुळे हजारो लोक मेली. पोलिस प्रचंड तणावात होते, त्यामुळे त्यांनी ड्रग्ज विक्रेत्यांना पकडण्यास सुरवात केली. त्यांच्यावर इतका छळ करण्यात आले की हळूहळू त्यांनी सर्व काही सांगून टाकले.

आता फ्रँकचं नाव पोलिसांसमोर आलेलं, म्हणून पोलिसांनी त्वरित त्याच्या न्यू जर्सीच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरातून ड्रग्ससह कोट्यावधी रुपयेही सापडले,आणि पोलिसांनी तातडीने त्याला ताब्यात घेतले.

१९७५ मध्ये त्याच्यावर शेकडो तरुणांच्या मृत्यूसाठी गुन्हा दाखल झाला होता. कोर्टाने त्याला ७० वर्षांची शिक्षा सुनावली,
परंतु लबाड फ्रँकने येथेही त्याचे डोके चालवले, त्याने ड्रग माफियांची माहिती देण्यासाठी त्याच्या सुटकेची अट घातली.
त्याने सांगितलेली सर्व माहिती अचूक ठरली आणि अमेरिकेत अंमली पदार्थांचा व्यवसाय जवळजवळ कोसळला.
७ वर्ष तुरूंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर त्याची सुटका झाली. फ्रँकने आपले उर्वरित आयुष्य साक्षीदार संरक्षण कार्यक्रमातच व्यतीत केले.

काही काळानंतर त्याने त्याची कथा लिहिली – ओरिजनल गँगस्टर. हे २०१० मध्ये प्रकाशित झाले. या चुकांमधून शिका आणि सर्व लक्ष अभ्यासावर केंद्रित करा, असे आवाहन फ्रँकाने या पुस्तकाच्या माध्यमातून तरुणांना केले होते. उच्च श्रेणीचे शिक्षण मिळवा आणि आपली स्वप्ने सत्यात उतरवा कारण हा एक चांगला मार्ग आहे.

या पुस्तकातून मिळालेली रक्कम आपण गरीब लोकांना दान करू असेही फ्रँकने म्हटले होते. १ जून २०१९ रोजी, फ्रॅंकने त्याचा अंतिम श्वास घेतला आणि त्या बरोबरच अमेरिकेचा सर्वात मोठा ड्रग्ज विक्रेता इतिहासाच्या पानांचा एक भाग बनून राहिला.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here