आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

केविन मिटनिक हा असा एकमेव गुन्हेगार हॅकर आहे ज्याला सरकार करोडो रुपये देतेय…!


केविन मिटनिक हे नाम बहुतांश लोकांना माहीत नसेल… परंतु जेव्हा आपण Google वर ‘जगातील सर्वात मोठा हॅकर’ शोधतो तेव्हा केविनचे नाव सर्वात वर असेल. केविन मिटनिक यांचे नाव हॅकिंगच्या जगात पुरेसे प्रसिद्ध आहे. ‘ब्लॅक हॅट हॅकर’ म्हणून ओळख मिळवलेला केव्हिन मिटनिक हा जगातील सर्वात हुशार हॅकर आहे.

केविन मिटनिक कोण आहे?

केविन मिटनिक यांचा जन्म ६ ऑगस्ट १९६३ रोजी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथे झाला. केविनला लहानपणापासूनच हॅकिंगची आवड होती. वयाच्या १२ व्या वर्षी त्यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून लॉस एंजेलिस बसमध्ये विनामूल्य प्रवास करण्यास सुरवात केलेली.

new google

८० च्या दशकात केविनने जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे सिक्रेट्स हॅक केले. तो कोणताही गुप्त प्रोजेक्ट सहज हॅक करू शकत असे. ९० च्या दशकापर्यंत तो अमेरिकेचा मोस्ट वॉन्टेड सायबर क्रिमिनल बनला होता.

९० च्या दशकात केविन मिटनिकने नोकिया, आयबीएम, मोटोरोला यासारख्या बड्या कंपन्यांचे सर्व्हरही हॅक केले.
पण आज ‘सायबर हॅकिंग’ टाळण्यासाठी बर्‍याच देशांची सरकारे केविनला दरमहा कोट्यावधी रुपये देतात. इतकेच नव्हे तर गुगल, अ‍ॅमेझॉन, याहू या मोठ्या कंपन्याही ‘सायबर हॅकिंग’ टाळण्यासाठी केविनला दरमहा कोट्यावधी रुपये देतात.

केविन मिटनिक

केविनने अमेरिकन डिफेन्स ऑर्गनायझेशन ‘पेंटागन’ ची साइटही हॅक केली होती. अमेरिकेच्या ‘नॅशनल सिक्युरिटी अलर्ट प्रोग्राम’ चे उल्लंघन आणि ‘कॉर्पोरेट सीक्रेट्स’ चोरल्याप्रकरणी केव्हिनला ३ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

यानंतर पुन्हा ‘सायबर क्राईम’ च्या गुन्ह्यात त्याला परत अडीच वर्षे तुरुंगात पाठवण्यात आले.

याशिवाय बेकायदा हॅकिंगमुळे केविन मिटनिक अनेक वेळा तुरूंगातही गेला आहे. या डोकेबाज हॅकरने एकूण ६ वर्षांचा काळ तुरूंगात घालविला आहे. केविन इतका हुशार होता की तो एकदा तुरुंगातून पळूनही गेलेला. केविनच्या आयुष्यावर दोन हॉलिवूड चित्रपटही बनले आहेत.

सन २००० मध्ये, केविन मिटनिकने स्वतःला बदलण्याचा निर्णय घेतला.आज ते एक यशस्वी आयटी सल्लागार झाले आहेत.
या व्यतिरिक्त ते एक सार्वजनिक वक्ते आणि यशस्वी लेखक देखील आहेत. केविन आज जगातील सर्वोच्च फॉर्च्युन ५०० कंपन्यांसाठी सुरक्षा सल्ला प्रदान करतात. जगातील अनेक बड्या कंपन्यांना त्यांनी ‘सायबर सिक्युरिटी’ वर टिप्स द्यायला सुरवात केली आहे.

आजकाल केविन मिटनिक अमेरिकेत आपली एक ‘सायबर सिक्युरिटी’ कंपनी चालवित आहे. अमेरिकन सरकार केव्हिनला ‘सायबर सिक्युरिटी’ साठी दरवर्षी कोट्यवधी रुपये देत आहे.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा:

कधी गायची जागरणात गाणे ,आज नेहा कक्कर अव्वल दर्जाची गायक बनली ती या एका शोमुळेच….!

या दोन देशभक्त बाबांनी इंग्रजांशी लढण्यासाठी लाखो सैनिक तयार केले होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here