आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|

===

या महिला वैज्ञानिकला लोकांना विनाकारण ठार मारण्याची सवय लागली होती..


लोकस्टा ही रोममधील एक सुंदर आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक होती, जिला सामान्यत: सगळे मध्ययुगीन काळाची पहिली वैज्ञानिक म्हणूनही ओळखतात.

याचे सर्व श्रेय आपल्या महान वैज्ञानिकांना जाते. जर शास्त्रज्ञांनी परिश्रम घेतले नाहीत तर कदाचित आधुनिक युगाची कल्पना करणे कठीण होते. परंतु इतिहासात एक वैज्ञानिक अशीही होती, जी मानवी जीव घेण्यासाठी प्रसिध्द होती. तिचे नाव होते लोकस्टा.!

लोकस्टा ही रोममधील एक सुंदर आणि सुप्रसिद्ध वैज्ञानिक होती, जिला सामान्यत: सर्वजण मध्ययुगीन काळाची पहिली वैज्ञानिक म्हणून ओळखतात. एवढेच नव्हे तर तिला इतिहासातील पहिली सिरियल किलरही म्हटले जाते.
या सुंदर वैज्ञानिकेला विज्ञानामध्ये खूप रस होता आणि ती वेळोवेळी बरेच प्रयोग करत असे. तिने झाडांचे गुण आणि तोटे यावरही संशोधन केलेले.

महिला

ती रंगरूपाने जरी सुंदर असली तरी मनातून तेवढीच विखारी होती…

तिला समजले होते की लोक त्यांच्या इच्छेसाठी शत्रूंना मरण देण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. पण, शत्रूचा मृत्यू नैसर्गिक दिसला पाहिजे. या मानवी इच्छांना डोळ्यासमोर ठेवून लोकस्टाने विषाचा प्रयोग सुरू केला. या प्रयोगात तिला भयानक जालीम विष सापडले, जे खाल्ल्यानंतर माणूस जगण्याची आशा उरत नव्हती.!

असे म्हटले जाते की लोकस्टाने, महारानी ऍग्रीप्पीना सोबत मिळून, रोमचा शासक क्लॉडियस यावर विष प्रयोग केला. राणीला वाटत होते की तिचा नवरा क्लॉडियस चांगला शासक नाही. म्हणूनच तिने राजाला मारण्यासाठी लोकस्टाला बोलावले.

राजाच्या जेवणामध्ये लोकस्टाने तिने तयार केलेले विष मिसळले. ते खाल्ल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

ग्रीक लेखक कॅसियस डियो यांच्या म्हणण्यानुसार, या देखण्या वैज्ञानिकेला तिच्या या क्रौर्याबद्दल शहरभर धिंड काढून फिरवण्यात आले आणि मगच तिला ठार मारण्यात आले.अशाप्रकारे जगातून एक धोकादायक आणि विषारी वैज्ञानिका संपुष्टात आली.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here