आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

खजुराहोच्या या प्रसिद्ध जिवंत शिवलिंगाचे कोडे आजपर्यंत वैज्ञानिक देखील सोडवू शकले नाहीयेत..


विज्ञान कितीही प्रगती करू यावरून प्रत्येकालाच फरक पडतो का? आजही जगता अशी काही रहस्ये आहेत जी शास्त्रज्ञांच्या समजण्यापलीकडे आहे. असेच एक रहस्य आपल्या देवादिदेव महादेवाच्या शिवलिंगाशी संबंधित आहे. ह्या शिवलिंगाला जिवंत शिवलिंग म्हणून ओळखले जाते. तसेच तुम्हाला या शिवलिंगाचा विज्ञानाशी काय संबंध हा प्रश्न पडला असेलच, तर चला जाणून घेऊया.

शिवलिंगाचे जिवंत कसे व काय त्याचे रहस्य?

ही गोष्ट बरीच लोकांना चकित करेल, परंतु सत्य ही आहे की मध्य प्रदेशात भगवान शिवांचे एक जीवित शिवलिंग आहे. मतंगेश्वर महादेव नावाचे हे शिव मंदिर मध्य प्रदेशातील खजुराहो येथे आहे. असे म्हणतात की जगातील हे एकमेव शिवलिंग आहे, जे सतत वाढत आहे. म्हणूनच त्याला जिवंत शिवलिंग म्हणतात. या शिवलिंगाची लांबी 9 फूट एवढी आहे.

या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे हे पृथ्वीच्या वर जितके आहे तितकेच पृथ्वीच्या पृष्ठभागाखालीही म्हणजेच आतमध्येही आहे. या शिवलिंगची लांबी दरवर्षी एक इंचाने वाढते आहे. यावरून काही लोक असेही म्हणतात की ज्या दिवशी शिवलिंगाचे बूड पाताळलोकाला जाऊन पोहचेल, त्या दिवशी जग संपेल.

शिवलिंग

चला जाणून घेऊया की या शिवलिंगाचा उगम कसा झाला?

या जिवंत शिवलिंगाचा पुराणात उल्लेख आहे. त्यानुसार भगवान शिवने युधिष्ठिरला एक चमत्कारीक मणी दिला होता. युधिष्ठिरच्या माध्यमातून तो मणी मातंग ऋषीकडे पोहोचला. ऋषींनी हा जादुई मणी राजा हर्षवर्मनकडे सोपविला, जो राजाने जमिनीमध्ये गाडला. मैदानामध्ये गाडल्यानंतर मनीची देखरेख करण्यासाठी कोणीच नव्हतं. त्यानंतर त्याच जागेवर एक चमत्कारी शिवलिंग तयार झालेले दिसले व त्याचे नाव मतंगेश्वर शिवलिंग असे ठेवले गेले.

मानवांप्रमाणेच या शिवलिंगाचाहीआकार वाढतो, यामुळे लोक त्याला जिवंत शिवलिंग म्हणतात. हे शिवलिंग इतके रहस्यमयी आहे की जे आजपर्यंत शास्त्रज्ञांनाही समजू शकलेले नाही.

===

new google

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here