आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम|युट्यूब

===

रंगा-बिल्ला: फाशीवर लटकूनही २ तास जिवंत राहिला होता हा भारतीय कुख्यात गुन्हेगार..!रंगा आणि बिल्ला यांच्या नावांशी तुम्ही सर्वच परिचित असाल. कसे म्हणताय? अरे, ही नावे तुम्ही बर्‍याचदा चित्रपटात ऐकली असतील. पण वास्तविकतेत, ही काल्पनिक नावे नाहीत तर 70 च्या दशकात हे दोघेही भारताच्या कुख्यात गुन्हेगारांपैकी एक होते. त्यां दोघांचे नाव एकत्रित घेतले जाते कारण ते एकत्र मिळून गुन्हे करायचे.

७० च्या दशकात छोटीमोठ्या चोरीच्या गुन्ह्यात जगात पाऊल टाकणारे रंगा (कुलजीत सिंग) आणि बिल्ला (जसबीर सिंग) हे अगदी कुख्यात गुन्हेगार बनले होते. सन 1978 मध्ये या दोघांनीही अपहरण आणि खुनाची घटना घडवून आणली होती, त्यामुळे देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई तणावात आले होते. या दरम्यान, त्याच्या गुन्ह्यांची चर्चा परदेशातही होऊ लागली.

हे दोघे इतके कुख्यात का होते?

२६ ऑगस्ट १९७८ रोजी रंगा आणि बिल्ला यांनी भारतीय नौदल अधिकारी मदन मोहन चोप्राची मुले गीता (१६) आणि संजय (१४) यांचे पैशासाठी अपहरण केले होते परंतु जेव्हा रंगा-बिल्ला यांना जेव्हा कळले की या मुलांचे वडील नौदल अधिकारी आहेत, तेव्हा त्यांनी मुलांचा बलात्कार करून त्यांना ठार मारले. अपहरणानंतर दोन दिवसांनी २८ ऑगस्ट १९७८ रोजी दोन्ही मुलांचे मृतदेह सापडले .

रंगा

या हत्याकांडाने दिल्लीसह संपूर्ण देश हादरले होते. त्यावेळी परदेशातही या घटनेची चर्चा होत होती. यानंतर रंगा-बिल्लाच्या गुन्ह्यांची भीती लोकांमध्ये वाढू लागली. या वेळी देशभरात संतापाचे वातावरण होते. संसदेच्या रस्त्यावर मोरारजी देसाई सरकारवर कडक टीका झाली. यानंतर स्वत: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

राजकारणी आणि माध्यमांच्या वाढत्या दबावामुळे अखेर दिल्ली पोलिसांनी कठोर संघर्षानंतर ८ सप्टेंबर १९७८ रोजी रंगा आणि बिल्लाला आग्रा येथून अटक केली. हे दोघेही सैनिकांसाठी राखीव असलेल्या आग्रा येथील ‘कालका मेल’ च्या डब्यात चढले होते. एका सैनिकानं त्याला वर्तमानपत्रात प्रकाशित केलेल्या चित्रातून ओळखलं होतं. यानंतर त्या दोघांना तिहाड तुरुंगात पाठविण्यात आले.

या प्रकरणातील खटला 4 वर्षे चालला. यानंतर १९८२ साली ‘रंगा आणि बिल्ला’ ला फाशी देण्यात आली.

दिल्लीच्या ‘तिहार जेल’ चे अधीक्षक असलेले सुनील गुप्ता यांनी आपल्या ‘ब्लॅक वॉरंट: कन्फेशन्स ऑफ ए तिहाड जेलर’ या पुस्तकात रंगा आणि बिल्ला यांना फाशी देण्याचा उल्लेख केला आहे. त्यांनी लिहिले, ‘१९८२ मध्ये, जेव्हा रंगा आणि बिल्लाला फाशीवर टांगण्यात आले होते, २ तासाच्या फाशीनंतर, डॉक्टर दोघे मरण पावले आहेत की नाही हे तपासण्यासाठी फाशीवर गेले आणि त्यांना’ रंगा ‘ची नाडी उडत असल्याचे जाणवले. म्हणजे फाशी देऊनही नन्तर दोन तासापर्यंत रंगा जिवंत होता. त्यानंतर तो मरण पावला.

यानंतर या दुष्ट गुन्हेगाराचा मृत्यू झाल्यावर रंगाची नाल खालून खेचली गेली. बहुतेक प्रकरणांमध्ये, मान आणि विंडपिप किंवा दोहोंच्या एकत्रितपणे मज्जातंतूमुळे मेंदूमध्ये रक्त प्रवाह थांबतो आणि 2 ते 3 मिनिटांत त्या व्यक्तीचा मृत्यू होतो.

 

new google

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

‘बचपनका प्यार भूल नही जाणा रे ‘याआधीही अश्या अनेक मुलांना सोशल मिडीयाने स्टार बनवलंय…!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here