आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

बॉलीवूडचा पहिला विनोदी अभिनेता कोणी असेल तर तो महमूद अलीचं…!


बॉलिवूडच्या चित्रपटात कॉमेडीला लोकप्रिय करण्यात कोणी महत्वपूर्ण भूमिका बजावली होती तर ती महमूद यांनी. ५० आणि ६० च्या दशकात बॉलिवूडपट हे फार गंभीर स्वरूपाचे असायचे. पण महमूद यांनी आपल्या विनोदाने या चित्रपटांना वेगळेपण प्रदान केले. बॉलिवूडचे विनोदसम्राट म्हणून त्यांनी स्वतची वेगळी ओळख निर्माण केली.

महमूद अली यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ ला झाला. एक बाल कलाकार म्हणून त्यांनी आपल्या करियरची सुरुवात केली. जेव्हा वयाने थोडे मोठे झाले तेव्हा ते प्रसिद्ध अभिनेत्री मीना कुमारी यांना टेबल टेनिस शिकवण्याचे काम करू लागले. पुढे त्यांनी मीना कुमारी यांची बहीण मधु हिच्याशी विवाह केला. पुढे त्यांना एक अपत्य देखील प्राप्त झाले.यानंतर त्यांना अधिक पैशाची गरज भासू लागली,यातून त्यांनी अभिनयाकडे आपला मोर्चा वळवला.

१९५३ मध्ये त्यांनी प्यासा व दो बिघा जमीन या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका बजावली. पुढे १९५८ मध्ये त्यांनी परवरिश या चित्रपटात राज कपूर यांच्या भावाची भूमिका बजावली.१९६५ मध्ये गुमनाम या चित्रपटात त्यांनी आचाऱ्याचा अभिनय केला, तो देखील फार लोकप्रिय ठरला. पडोसन, बॉम्बे टु गोवा, प्यार किये जा, दो फुल, दिल तेरा दीवाना’, ‘ससुराल’, ‘लव इन टोक्यो’, ‘जिद्दी’ आणि ‘अंदाज़ अपना अपना’ या चित्रपटात त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या.

new google

महमूद अली

महमूद हे फार कुशल कलाकार होते. ते चित्रपटातील कुठलाही सिन एका टेकमध्ये करायचे. त्यांना रिहर्सलची देखील गरज पडत नव्हती. यामुळेच त्यांना बॉलिवूडमध्ये वन टेक आर्टिस्ट म्हणून ओळखले जाऊ लागले. ६० व ७० च्या दशकातील बहुतांश चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या नावाने चित्रपट चालायचे व हिट व्हायचे.

महमूद यांनी बॉलिवूडच्या अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांच्या उत्तम अभिनयाने बऱ्याचदा ते चित्रपटाच्या मुख्य नायकापेक्षा जास्त वरचढ ठरायचे. पण बॉलिवूडमध्ये एक असा नट देखील होता, ज्याच्या अभिनयाचा प्रभाव महमूद यांच्यावर पडला होता, तो नट म्हणजे किशोर कुमार. महमूद किशोर कुमारांच्या अदाकारीचे चाहते होते. ते त्यांच्या अभिनयाने इतके प्रभावित झाले की त्यांनी किशोर कुमारांसाठी ‘पडोसन’ आणि ‘साधू और शैतान’ या चित्रपटांची निर्मिती केली.

एकदा महमूद यांना त्यांच्या आवडत्या अभिनेत्या विषयी विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले होते की,’ मला बॉलिवूडमधल्या बहुतांश अभिनेत्यांच्या मर्यादा माहिती आहे, पण किशोर कुमार मात्र वेगळे आहेत, त्यांच्या अभिनयाची छाप त्यांच्या पात्रावर अशी काही पडते की त्यांचा अभिनय माझ्या मनात अनामिक भीती निर्माण करतो.

अभिनयाच्या बरोबरीने महमुद यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. ‘छोटे नवाब’ हा त्यांच्या प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट होता. पुढे त्यांनी भूत बंगला या चित्रपटाची निर्मिती केली. पुढे त्यांनी १९६५ मध्ये पडोसन या विनोदपटाची निर्मिती केली, जो फार यशस्वी ठरला. आजही तो चित्रपट बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट विनोदपट म्हणून ओळखला जातो. १९९६ साली महमूद यांनी शाहरुख खानला सोबत घेऊन ‘दुष्मन दुनिया का’ हा चित्रपट तयार केला. पण हा चित्रपट अयशस्वी ठरला.

१९९८ मधील ‘घर बाजार’ हा त्यांचा शेवटचा चित्रपट होता. यानंतर ते अमेरिकेत स्थायिक झाले. पुढे २००४ ला तिथेच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलाने ( लकी अली) देखील बॉलिवूडमध्ये एक सुप्रसिद्ध गायक म्हणून प्रचंड नावलौकिक मिळवला.

महमूद यांनी गंभीर बॉलीवूडपटांना विनोदाची झालर पांघरूण एक वेगळ्या उंचीवर नेऊन पोहचवले, हे मात्र नक्कीच!

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

बंगालच्या या नवाबाने 146 इंग्रज अधिकाऱ्यांना बंदी बनवले होते,तर बाकी भीतीनेच पळून गेले होते!

ताजमहाल नव्हे तर कवी रहीम यांनी बांधलेले ‘रहीमचा मकबरा’ हे प्रेमाचे पहिले प्रतीक होते..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here