आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!जरी भगवान शिव यांची असंख्य मंदिरे देशभरात आहेत, परंतु त्यांच्या 12 ज्योतिर्लिंगांची बाब अद्वितीय आहे.
असे म्हटले जाते की भोलेबाबाच्या या ज्योतिर्लिंगांचे नुसते स्मरण आणि दर्शन केल्याने माणसाच्या सर्व पापांचा नाश होतो.

भगवान शंकराच्या या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असे शिव धाम आहे जे सुमारे 400 वर्षे बर्फाखाली दडलेले होते. चला तर मग जाणून घेऊया शिवाच्या या प्रसिद्ध धामाशी संबंधित हा रोचक इतिहास.


भूगर्भशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञांच्या मते, 12 ज्योतिर्लिंगांपैकी सर्वोत्कृष्ट, केदारनाथ धाम सुमारे 400 वर्षे बर्फाखाली गढलेले होते. बर्फात दबलेले असूनही या मंदिराचे कोणतेही नुकसान झाले नाही. जेव्हा बर्फ मंदिराच्या माथ्यावरुन मागे हटवला तेव्हा मंदिराच्या पायथ्यापर्यंत मंदिर जस्यास तसे होते.


असे म्हटले जाते की 13 व्या ते 17 व्या शतकापर्यंत, म्हणजे सुमारे 400 वर्षे, एक लहान हिमयुग होता ज्यामध्ये हिमालयाचा एक मोठा भाग बर्फाखाली दबला गेला होता. शास्त्रज्ञांच्या मते आजही मंदिराच्या भिंतीवर आणि दगडावर त्याच्या खुणा आहेत. मंदिराच्या भिंतीवर आणि दगडांवर असलेले हे चिन्ह हिमनदी घासल्याने बनलेले आहे.

अनेक खडक वाहून नेणाऱ्या हिमनदीच्या लाटा सर्व वेळ हलत राहततात पण त्याचे वजनही खूप आहे. ज्यामुळे हिमनदीच्या मार्गात येणारी प्रत्येक गोष्ट घासली जाते.

केदारनाथ धामभोवती तीन बाजूंनी पर्वत आहेत. केदारनाथ धाम केवळ पर्वतांनी वेढलेले नाही तर पाच पवित्र नद्यांचा एक अद्भुत संगम देखील येथे दिसतो. मंदाकिनी, मधुगंगा, क्षीरगंगा, सरस्वती आणि स्वर्णगौरी यांचा संगम याच ठिकाणी होतो.
यापैकी काही नद्या अस्तित्त्वात नसल्या तरी, अलकनंदाची उपनदी असलेल्या मंदाकिनी नदी आजही अस्तित्वात आहे. येथे हिवाळ्यात मुसळधार बर्फ आणि पावसाने भरपूर पाणी असते.

भगवान शिव यांना समर्पित केदारनाथ धाम देवभूमी हे उत्तराखंडमधील सर्वात मोठे मंदिर आहे. हे मंदिर कापलेल्या दगडाचे मोठमोठ्या तुकड्यांपासून बांधले गेले आहे.

मंदिर

16 जून 2013 रोजी केदारनाथमध्ये मोठी तबाही झाली. या नैसर्गिक आपत्तीत अनेक निरपराध लोक काळाच्या गाळात अडकले होते. या शोकांतिकेत केदारनाथच्या सभोवतालचे सर्वकाही नष्ट झाले, परंतु जर काही शिल्लक राहिले तर ते फक्त मुख्य केदारनाथ मंदिर होते.

या भयंकर शोकांतिकेला 4 वर्षानंतर, केदारनाथ धाम पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींमुळे खूप चर्चेमध्ये आहे. बाबा केदारनाथला भेट देण्याबरोबरच पीएम मोदींनी येथे 5 विकास प्रकल्पांची पायाभरणी केली. मोदींनी केदारपुरीमध्ये अनेक पुनर्निर्माण प्रकल्पांची पायाभरणी केली. ज्यामध्ये आदि गुरु शंकराचार्यांच्या समाधीच्या नूतनीकरणाचादेखील समावेश आहे.

दिवाळीच्या सणाच्या दुसऱ्या दिवसापासून केदारनाथ मंदिराचे दरवाजे 6 महिने बंद असतात आणि मे महिन्यात 6 महिन्यांनी जेव्हा केदारनाथचे दरवाजे उघडले जातात तेव्हा उत्तराखंडचा प्रवास सुरू होतो.

हे आहे आपले केदारनाथ धाम, जे हिमयुगाच्या काळात 400 वर्षे बर्फात बुजले होते आणि 2013 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करूनही हे धाम सुरक्षित आहे आणि हे धाम शतकानुशतके सुरक्षितच राहील कारण या मंदिराचा मालक स्वतः महाकाल आहेत ज्यांचे कसलीही वेळ-काळ काहीही बिघडवू शकत नाही.

new google

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here