आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

बैलहोंगलच्या या राणीने 27 दिवस शिवाजी महाराजांसोबत युद्ध केले होते..


राणी मल्लम्मा … हे नाव काही लोकांनी ऐकले असेल, पण आजही भारतीय इतिहासात तीची ‘वॉरियर क्वीन’ म्हणून आठवण केली जाते. राणी मल्लम्मा आपल्या पराक्रम आणि वीरतेसाठी ओळखली जाते. ती एक निर्भीड योद्धा होती, जिच्या धैर्यापुढे सर्वात मोठे योद्धाही हार मानत असत.

भारतीय इतिहासातील राणी मल्लम्मा ही पहिली राज्यकर्ती होती जिने महिलांची स्वतंत्र ‘युद्ध बटालियन’ बनवलेली..

राणी मल्लम्मा कोण होती?

राणी मल्लम्माचे पूर्ण नाव बेलावडी मल्लम्मा होते. ती कर्नाटकातील बेलगावी जिल्ह्यातील बैलहोंगलची राणी होती.
राणी मल्लम्मा ही राजा मधुलिंग नायकची मुलगी होती. तिच्या नवऱ्याचे नाव राजा ईशप्रभू होते. ‘सावित्रीबाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राणी मल्लम्मा छत्रपती शिवाजी महाराजांशी देखील लढल्या होत्या.

new google

महिलांच्या स्वतंत्र ‘युद्ध बटालियन’ची स्थापना करणारी राणी मल्लम्मा ही भारतीय इतिहासातील पहिली शासक होती.त्यांची ही बटालियन ‘युद्ध कौशल्या’ मध्ये प्रवीण होती. या बटालियनच्या महिला सेनानी, साड्या परिधान करून आणि हातात तलवारी घेऊन, त्यांच्या घोड्यांसह लढायच्या आणि त्यांचे नेतृत्व राणी मलम्मा करत असत.

राणी

राणी मल्लम्मा अशी राजपूत योद्धा होती जी निर्भीडपणे बड्या बड्या योध्दांसोबत लढायची.. केवळ ब्रिटीश राज्यकर्तेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज  यांच्यासोबतही तिने युद्ध केलेलं.

भारतीय इतिहासात मोजकेच योद्धा होते ज्यांनी राणी मल्लम्माचा सामना करण्याची हिम्मत दाखविली. छत्रपती शिवाजी महाराज त्यापैकी एक होते.१७ व्या शतकात राणी मल्लम्माच्या धाडसीपणा आणि निर्भयतेबद्दल सर्वांना खात्री होती. तिच्या ‘महिला बटालियन’च्या मदतीने ज्यांनी तिच्या राज्यावर हल्ला केला त्यांना पराभूत करण्याचे धाडस तिच्यात होते.

इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात राणी मल्लम्मा आणि शिवाजी महाराज यांच्यात २७ दिवस चाललेल्या युद्धाचा उल्लेख केला आहे. यादरम्यान, राणी मल्लम्माचा पती ईशप्रभूने लढताना वीरगती मिळविली.पण राणीने आपल्या ‘महिला बटालियन’ सह लढणे सुरू ठेवले. या युद्धात राणी मल्लम्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराभव केला.

छत्रपती शिवाजी महाराज युद्धात पराभूत होऊनही राणी मल्लम्माच्या शौर्याने आणि धैर्याने आश्चर्यचकित झाले.

राणी

या दरम्यान, राणी मल्लम्मा यांनी शिवाजी महाराजांकडे त्यांच्या ‘महिला योद्धां’सोबत युद्धात मराठा सैनिकांच्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केली त्यांनतर महाराजांनी आपल्या शिपायाला शिक्षाही केली होती. शिवाजी महाराजांच्या या वागण्यावर खूश होऊन राणी मल्लम्मा यांनी कर्नाटकातील यादव हनुमान मंदिरात शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली, जी आजही आहे.

मल्लम्मा आणि शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा उल्लेख आहे ज्यामध्ये राणीने महाराजांचा पराभव केला. लेखक शिव बसवा शास्त्री यांनी आपल्या ‘थरातुरी पंचमारा इतिहासा’ या पुस्तकात राणी मल्लमा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील युद्धाचा उल्लेखही केला आहे. या व्यतिरिक्त, राणी मल्लम्माचे शिक्षक शंकरा भट्टारू लिखित ‘शिव वंश सुधारनवं’ या संस्कृत पुस्तकातही त्याचा उल्लेख आहे.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here