आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|युट्यूब

===

रामनामी : नखापासून ते पायाच्या बोटापर्यंत श्रीरामाचे नाव शरीरावर गोंदून घेणारा अदिवासी समुदाय..!


गेल्या कित्येक वर्षांपासून भगवान राम यांच्या नावाचा आणि मंदिर बांधण्याच्या संदर्भात अनेक वाद-विवाद ऐकले जात आहेत. गेल्या पाच वर्षात रामाच्या नावावर बरेच राजकारण देखील झाले आहे.पण भारताच्या छत्तीसगड राज्यात असा एक समाज आहे, जो आपल्या संपूर्ण शरीरावर राम नावाचे टॅटू गोंदवतो.

आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ‘रामनाम’ नावाचा समाज कसा विकसित झाला आणि संपूर्ण शरीरावर राम नाव गोंदवण्याची परंपरा एक संस्कृती कशी बनली…!  शरीराच्या कोणत्याही भागावर अनेक प्रकारचे टॅटू बनवण्याचा छंद आज फॅशन म्हणून बघितला जाऊ शकतो.

छत्तीसगडची राजधानी रायपूर या आदिवासी भागात एक समुदाय आहे, जिथे रामाचे नाव लोकांच्या संपूर्ण शरीरावर लिहिलेले असते. डोक्यापासून पायापर्यंत, पोटापासून पाठीपर्यंत, जिथे बघावं तिथं राम हे नाव लिहिलेले असते, येथे रामाचे नाव प्रत्येक व्यक्तीच्या अंगावर लाखो वेळा लिहिले आहे. म्हणूनच त्यांना रामनामी म्हणतात.

शरीरावर जितक्या वेळा रामनाम लिहिले असेल तीतकी प्रतिष्ठा आणि सन्मान मिळतो,अस या लोकांचा समज आहे. त्यामुळे ते आपल्या संपूर्ण शरीरावर रामनाम गोंदवून घेतात.. रामनामी समाजात शरीराच्या कोणत्याही भागात राम-राम लिहिणाऱ्यांना शिरोमणी म्हटले जाते.आणि जे संपूर्ण कपाळावर रामाचे नाव लिहितात त्यांना सर्वांग रामनामी असे म्हणतात.

त्यात पण जे पूर्ण शरीरावर रामनाम लिहिले असेल तर त्यांना नखशीख रामनामी म्हणून ओळखले जाते. हे लोकं आपल्या समुदाया मध्ये विशेष दर्जा प्राप्त झालेले असतात.

रामनामी

संस्कृती आणि परंपरेसाठी महत्त्वाचे आहे राम नावाचे टॅटू.

या समुदायाच्या ह्या परंपरा आणि संस्कृतीला एक विरोधाभासी घटना कारणीभूत आहे. खरे तर शेकडो वर्षांपूर्वी उच्च जातीच्या लोकांनी मागासवर्गीय लोकांना मंदिरात प्रवेश दिला नाही. याला विरोध करून त्यांनी संपूर्ण शरीरावर रामाचे नाव लिहायला सुरुवात केली. यामुळे त्यांना रामनामी जातीचा समुदाय म्हटले जाऊ लागले.

छत्तीसगडमधील चार जिल्ह्यात ही जमात राहते. बदलत्या काळानुसार, तरुण पिढीला संपूर्ण शरीरावर रामाचे नाव लिहिणे शक्य होत नाही, परंतु त्यांच्यासाठी छातीवर टॅटू असलेले राम नाव देखील तेवढेच आवश्यक आहे. ही त्यांची संस्कृती आणि परंपरेची ओळख आहे.

रामनामी समाजातील लोक राम नाम शरीरावर गोंदवतात, राम नावाने लिहिलेले कपडे घालतात. रामचरित्र मानसची पूजा करतात. त्यांचा संपूर्ण एक पंथ आहे. पण हे लोक ना कोणत्याही रामाच्या मंदिरात जातात ना रामाच्या मूर्तीची पूजा करतात.

अयोध्येतल्या राम मंदिराशीही त्यांचा काही संबंध नाही. समुदायाच्या श्रद्धेनुसार, प्रत्येक माणूस आपल्या राम मंदिरात आणि मूर्तींमध्ये नव्हे तर झाडे, वनस्पती आणि प्राण्यांमध्ये राहतो.

जर शरीरावर रामाचे नाव गोंदवलेले असेल तर टोपीपासून कुर्ता, ते गळ्यातल्या उपरण्याच्या टोकापर्यंत त्यावर राम नाव लिहिलेले असते. त्यांच्या घरावर देखील राम-राम लिहिले जाते आणि जेव्हा ते भेटतात तेव्हा ते एकमेकांना राम-राम म्हणत शुभेच्छा देतात. स्थानिक लोक आणि तज्ञांच्या मते, रामनामची ही परंपरा जवळपास दीडशे वर्ष जुनी आहे.

या पंथातील लोक रामनामी भजन मेळाव्यात भेटतात. या मेळाव्याचा हेतू पंथातील लोकांना भेटणे आणि नवीन लोकांना दीक्षा देणे. पंथाचे लोक रामनामी भजन मेळ्यात कुटुंबासह सामील होतात. येथे नवीन लोकांना दीक्षा दिली जाते.


=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक |युट्यूब| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण अवश्य वाचा :

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारताचा ओसामा समजल्या जाणाऱ्या वीरप्पनला पकडणारा आयपीयस अधिकारी...!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here