आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू नव्हे, तर बरकतुल्ला खान होते…!


एक प्रश्न नेहमी जवळपास सगळ्याच जनरल नॉलेज म्हणून विचारला जातो तो म्हणजे, स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान कोण? शाळेत असल्यापासून तर आत्तापर्यंत आपण हेच ऐकत आलो आहोत की पंडित जवाहरलाल नेहरू हेच स्वतंत्र भारताचे पाहिले पंतप्रधान होत. अगदी लहनातल्या लहान मुलाला हा प्रश्नविचारला तरी उत्तरामध्ये बिनचुक पंडित नेहरूजींचेच नाव येते. एवढच कशाला आपल्या इतिहासाची पुस्तके देखील हेच शिकवतात की!

पण आज मी जर तुम्हाला असा सांगितला की ज्या इतिहासात भारताचे पाहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू यांचे नाव नोंद आहे त्याच इतिहासाचे एक पान असेही आहे, ज्यात भारताच्या पहिल्या पंतप्रधानांचे नाव बरकतुल्ला खान असे नमूद करण्यात आले आहे! तर, हे ऐकून तुमचा विश्वास बसेल का? मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण पंडित नेहरूंच्या आधीही भारतात पंतप्रधान घोषित झाले होते हे सत्य नाकारता येणार नाही.

आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की हे बरकतुल्ला खान कोण होते? त्यांनी असे काय कार्य केले ज्यामुळे भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला? आणि जर ते पंतप्रधान होते, तर पंडित नेहरूंचे नाव प्रथम स्थानावर का आहे? चला तर मग आजच्या युवाकट्टा लेखात इतिहासाच्या नेमक्या पहिल्या पंतप्रधान पदाच्या मानाचे हेच रहस्य जाणुन घेऊया.

new google

आता अगोदर हे समजुन घेणे फार महत्वाचे आहे की ज्यावेळी बरकतुल्ला खान यांच्या नावाची भारताचे सर्वप्रथम पंतप्रधान म्हणून घोषणा झाली त्यावेळी आपला भारत देश पारतंत्र्यात होता. त्यामुळेच पंडित नेहरूंना स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हटले गेले. आता खरतर स्वातंत्र्यानंतरच्या भारताचा अभ्यास देखील फार महत्वाचा होता. आणि याच कारणाने लोकांनी नेहरूजी विषयी अधिक वाचले आणि ऐकले.

बरकतुल्ला खान

पण बरकतुल्ला खान देखील भारताची एक महत्वाची व्यक्ती आहे ज्याबद्दल बोलले पाहिजे किंवा त्यांच्या कार्याबद्दल माहिती करूँ घेतली पाहिजे. कारण स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे योगदानही कमी नव्हते. भोपाळ येथे 7 जुलै 1854 रोजी जन्मलेले, बरकतुल्ला यांचे कुटुंब म्हणजे भोपाळ संस्थानचा एक महत्त्वाचा भाग होता. काही लोकांच्या म्हणन्यानुसार, बरकतुल्ला यांचा जन्म 1857 किंवा 1858 मध्ये झाला होता अशी मान्यता आहे.

सुलेमानिया शाळेतून अरबी, फारसी आणि इंग्रजीचे शिक्षण घेतलेले बरकतुल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नेते शेख जमालुद्दीन अफगाणी यांच्यामुळे प्रभावित झाले होते. त्यामुळे त्यांनी सर्व देशातील मुस्लिमांना एकत्र करण्याचा निर्णय घेतला. यावेळी आई -वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यावर बहिणीची जबाबदारी होती, तर तिचेही लग्न झाले. त्यामुळे आता बरकतुल्ला खानच्या आयुष्यात स्वतःच्या ध्येयाशिवाय कोणीच नव्हते.

एके दिवशी त्यांनी अगदी कोणालाही न कळवता भोपाळ सोडले आणि थेट मुंबई गाठली. येथे, मुलांना शिकवण्याबरोबरच त्यांनी स्वतः देखील इंग्रजी भाषेत शिक्षण चालू ठेवले. मुंबईत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते इंग्लंडला गेले. जरी ते अभ्यासासाठी इंग्लंडला गेले होते, पण येथूनच त्याच्या आयुष्याची दिशा बदलली. बरकतुल्ला येथे स्थलांतरित भारतीय क्रांतिकारकांचे आश्रयदाता श्यामजी कृष्ण वर्मा यांना भेटले. श्यामजी कृष्ण वर्मा यांचे देखील भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात तितकेच महत्वाचे योगदान आहे जितके इतर क्रांतिकारकांचे.

यानंतर मात्र भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतिकारी कल्पना आणि उपक्रम पसरवण्यासाठी त्यांनी लिखाणाचे
शस्त्र हाती घेतले. आणि ते लवकरच त्यांच्या क्रांतिकारी लेखांद्वारे प्रसिद्धी झोतात आले.

खान यांची लिव्हरपूल विद्यापीठाच्या ओरिएंटल कॉलेजमध्ये फारसीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली, परंतु भारतातील ब्रिटिश राजवटीतील अत्याचाराविरोधात त्यांची लेखणी चालू राहिली. आता इंग्रजांच्या राजवटीत इंग्रजांविरुद्ध कोणी जनजागृति करत असेल तर इंग्रजांकडून या गोष्टीला विरोध होणारच. यामुळेच इंग्लंडमध्ये खानला विरोध सुरू झाला. पुढे हीच परिस्थिती इतकी बिकट झाली की बरकतुल्लाला देशच सोडावा लागला.

यानंतर अमेरिकेत स्थायी होऊन बरकतुल्लांनी अनिवासी भारतीयांना एकत्रित आणि संगठित करण्याचे काम केले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी सम्मलेन घ्यायला सुरुवात केली. 1857 च्या स्वातंत्र्यलढ्या मुळे प्रभावित होऊन, बरकतुल्लाह हे क्रांतीची नवीन भावना जागृत करण्यासाठी अमेरिकेहून जपानला पोहोचले. त्या काळात प्रवासी भारतीय हा क्रांतिकारकांचा मुख्य आधार होता. 1905 च्या अखेरीस बरकतुल्ला एक महान क्रांतिकारी विचारवंत बनले होते.

थोडक्यात सांगायचे झाल्यास बरकतुल्ला यांनी ब्रिटिश राज उलथवून भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष
प्रजासत्ताक स्थापन करण्याचे स्वप्न पाहिले जे त्याकाळी खुप कमी लोकांचे लक्ष्य होते.

पहिल्या महायुद्धाच्या काळात जर्मनी ब्रिटन विरोधात लढत असल्यामुळे बरकतुल्ला आणि राजा महेंद्र जर्मन सरकारचे ख़ास बनून राहिले. शेवटी 1915 मध्ये, भारताचे अस्थायी सरकार स्थापन झाले. पहिल्या महायुद्धादरम्यान, ब्रिटिशविरोधी जर्मन सरकारने अफगाणिस्तानातील भारतीयांच्या या तात्पुरत्या क्रांतिकारी सरकारला लगेच मान्यता दिली. आणि अशा प्रकारे राजा महेंद्र हे या अस्थायी सरकारचे राष्ट्रपति झाले आणि बरकतुल्ला खान पंतप्रधान झाले. 1919 मध्ये बरकतुल्लाह हे सरकारच्या बाजुने स्वातंत्र्याच्या उद्दिष्टाबद्दल बोलण्यासाठी मॉस्कोमध्ये गेले. जिथे लेनिनने त्याना पाठिंबा दिला. आणि अशाप्रकारे त्यांना सोव्हिएत रशियाकडून भारताच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी थेट पाठिंबा मिळू लागला.

=

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

बैलहोंगलच्या या राणीने 27 दिवस शिवाजी महाराजांसोबत युद्ध केले होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here