आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

हा राजा नसता तर भारतात क्रिकेट टीम तयारच झाली नसती..!


भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात ७२० संस्थानं होती. या सर्व संस्थानांवर कुठल्यानं कुठल्या राजाचे अधिपत्य होते. प्रत्येक संस्थानाला एक वेगळा इतिहास आणि ओळख लाभली होती. पण ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, तेव्हा सर्व रियासती एकमेकांमध्ये विलीन होण्यास सुरुवात झाली. या संस्थानांत एक असे देखील संस्थान होते ज्याच्या राज्याला एक दोन नव्हे तर तब्बल ३६५ राण्या होत्या. हा राजा त्याच्या स्त्रीलंपटपणासाठी प्रसिद्ध होता. आजचे पंजाबचे मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदरसिंह यांचे आजोबा भूपिंदरसिंह हाच तो राजा.

राजा

पटीयाला रियासतीचे वारस असलेले महाराजा भूपिंदर सिंह प्रचंड श्रीमंत होते, तब्बल १७ कोटी रुपयांच्या डिनर सेटमध्ये ते जेवणाचा आस्वाद घ्यायचे. त्यांच्याकडे २९३० हिरे माणकांनी सजलेला एक हार होता. ज्याची किंमत आज तब्बल १६६ कोटी रुपये इतकी आहे. महाराजा भूपिंदर सिंह यांचा जन्म १८९१ मध्ये पतियाळाच्या महाराजा राजेंद्रसिंह यांच्या घरी मोतीबागेत झाला. १९०० साली भूपिंदर सिंह यांनी आपली राजगादी ताब्यात घेतली. बालपणापासूनच भूपिंदर सिंह हे विलासी वृत्तीचे होते. त्यांच्या विलासी वृत्तीवर त्यांच्या दिवणाने ‘महाराजा’ नावाचे मोठे पुस्तक प्रकाशित केले होते. यात भूपिंदरसिंहांच्या अनेक ‘रंगीन’ कारनाम्यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.

new google

महाराजा भूपिंदर सिंह यांचा किल्ला पटीयाला शहराच्या मधोमध १० एकराच्या परिसरात पसरलेला होता. या किल्ल्यात एक मुख्य महल, गेस्ट हाऊस आणि दरबार हॉल असे भाग होते. महाराजाचा महल असंख्य भारतीय चित्रांनी सजवण्यात आला होता. या सर्व चित्रांना महाराजा नरेंद्रसिंह यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आले होते. या महालात १६ काचेचे चेंबर्स होते.या महालात एक हॉल, एक महिला कक्ष व लस्सी खाना देखील होता. या महालांच्या दरम्यान मोकळं पटांगण होतं, जिथे मधोमध कारंजे लावून सुशोभिकरण करण्यात आलं होतं. या महालात महाराजाला युद्धाच्या वेळी उपयोगी पडू शकेल असा भुयारी मार्ग देखील तयार करण्यात आला होता. तिथे एवढं मोठं स्वयंपाकघर होतं ज्यात एकावेळी ३५०० लोकांचं जेवण तयार करण्यात येत होतं.

पटना शहरात भूपिंदर सिंह यांनी एक लीला भवन म्हणून महाल उभारला होता. या महालात प्रवेश करण्यासाठी तुम्हाला नग्नावस्थेत यावं लागेल अशी अट घालण्यात आली होती. महाराजाने आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करण्यासाठी या महालाची निर्मिती केली होती.या महालाच्या भिंतींवर उत्तेजक चित्रे रंगवण्यात आली होती. या महालात एक असा स्विमिंग पूल देखील होता ज्यात ऐकाच वेळी १५० पेक्षा जास्त महिला व पुरुष एकत्र अंघोळ करायचे. असं म्हणतात इथे वेगवेगळ्या रियासतींचे राजे महाराजे आपल्या बायकांची अदला बदल करून शरीर सुखाचा आनंद घ्यायचे.

१९०० ते १९३८ च्या काळात राजा भूपिंदरसिंहने या पटीयाला रियासतीवर राज्य केले. एकूण ३६५ राण्यांचा संसारात त्याचा १० प्रमुख राण्या होत्या. राजा दररोज त्याच्या महालात ३६५ कंदील लावायचे आणि प्रत्येक कंदीलावर त्यांच्या ३६५ राण्यांचे नाव लिहिलेले असायचे. जो कंदील रात्री सकाळपर्यंत विझत नव्हता, त्यावर नाव लिहिलेल्या राणीसोबत भूपिंदरसिंह रात्र व्यतीत करत असे. भूपिंदरसिंहना त्यांच्या १० राण्यांपासुन तब्बल ८३ अपत्ये होती, पण त्यातील फक्त ५३ अपत्ये जगली.

भूपिंदरसिंहाने आपल्या राजवटीत स्वतःसाठी ‘पटीयाला क्लब’ एक खाजगी रन वे तयार केला. त्यांनी स्वतःचे विमान विकत घेतले. एवढेच नाही राजा तब्बल ४४ रोल्स रॉईस गाड्यांचा मालक होता. यातील २० गाड्यांचा राजाकडून रोज वापर करण्यात येई.

राजा

भारतात क्रिकेट लोकप्रिय करण्याचे श्रेय देखील महाराजा भूपिंदर सिंह यांचेच आहे. १९११ साली भारताची पहिली टीम घेऊन ते इंग्लंडला गेले होते. तिथे ते इंग्लंडच्या कोचच्या प्रशिक्षण शैलीने प्रभावित झाले व त्यांनी कोचला भारतात आणले. त्यांनी भारतात मुंबई व अमृतसर येथे दोन स्टेडियमची सुरुवात केली.

‘महाराजा रणजित सिंह’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘रणजी चषक’ देखील भूपिंदर सिंह यांनीच सुरू केला होता. भारतातील क्रिकेट अधिनियमक बोर्डाची स्थापना त्यांनीच केली.

दारुड्या लोकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘पटीयाला पेग’चे जनक देखील महाराजा भूपिंदरसिंह हेच होते. त्यांनी आयर्लंडच्या टीमला हरवण्यासाठी एक योजना आखली होती, यानुसार त्यांनी त्या टीमचा मेम्बर्सला पार्टीसाठी बोलावले व ग्लासमध्ये पाण्याच्या अथवा सोडाच्या तुलनेत दारूचे प्रमाण जरा जास्त ठेवले. त्यावेळी आयरिश खेळाडूंनी या संदर्भात विचारणा केली त्यावेळी भूपिंदरसिंह म्हणाले की हा पतियाळाचा स्पेशल पेग आहे. तेव्हापासून हा पटीयाला पेग सर्वत्र प्रसिद्ध झाला.

महाराजा भूपिंदरसिंहची अजून एक खास बाब म्हणजे त्यांची हिटलरसोबत असलेली मैत्री. महाराजा भूपिंदर सिंह हे हिटलरला भेटायला जर्मनीला गेले होते. हिटलर देखील त्यांची श्रीमंती बघून अचंबित झाला होता. त्याने महाराजा भूपिंदरसिंहला त्याची ‘मायबेक’ गाडी भेट म्हणून दिली होती.महाराजा भूपिंदर सिंहच्या श्रीमंतीचे असे असंख्य किस्से आहेत जे तुम्हाला त्याचा दिवणाने लिहलेल्या महाराजा नावाच्या पुस्तकात नक्की वाचायला मिळतील.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here