आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

मित्राचं बोलणं मनाला लागलं म्हणून बुर्ज खलिफा मध्ये २२ फ्लैट्स खरेदी केलेला भारतीय!


संयुक्त अरब अमिरात मध्ये बुर्ज खलिफा नावाची जगातील सर्वात उंच इमारत नेहमीच प्रसिद्धि झोतात असते. आता जगातली सर्वात उंच इमारत म्हटल्यावर तिच्यातल्या एका फ्लैटची किंमत देखील सामान्य माणसाच्या अवाक्याबाहेर आहे हे वेगळ सांगण्याची गरजच नाही.

या बुर्ज खलिफावर बॉलीवुड मधील गाणी देखील प्रसिद्ध आहेत. या बुर्ज खलिफा या गगनचुम्बी इमारतीची उंची 829.8 मीटर इतकी असून जगातील सर्वात उंच फ्रीस्टैंडिंग बिल्डिंग, जगात सर्वाधिक जलदगती आणि लांब लिफ्ट, सर्वात उंच
मस्जिद, जागतिक स्तरावरील सर्वात उंच रेस्टोरंट, हे सगले किताब देखील बुर्ज खालिफच्याच वाट्याला आलेले आहेत.

याच नाही तर अशा अनेक कारणामुळे बुर्ज खलिफा आजच्या काळात आज खऱ्या अर्थाने एक ग्लोबल आइकॉन म्हणून उभी आहे.

जिथे सामान्य मानुस फार फार तर बक्कळ पैसा खर्च करून बुर्ज खलिफा इमारत बघायला जाऊ शकतो किंवा ती स्वप्न बघू शकतो तिथेच आपण आज एक अशा भारतीय माणसाबद्दल चर्चा करणार आहोत ज्याकड़े एक-दोन नव्हे तर तब्बल बुर्ज खलिफा मधील तब्बल २२ फ्लैट्सची मालकी आहे. आणि हे २२ फ्लैट्स खरेदी करण्याचे काय कारण आहे माहितेय का? तर कारण आहे मित्राचं जिव्हारी लागलेल बोलणं!

new google

बुर्ज खलिफा

होय! तुम्ही हे बरोबर ऐकलय! आज आम्ही तुम्हाला एका अशा भारतीया बद्दल सांगणार आहोत ज्यांच्याकडे या जगातील सर्वात उंच इमारतीत एक किंवा दोन नाही तर 22 फ्लॅट आहेत. केरळमध्ये जन्मलेले, नेरीयापारंबिल, जे एकेकाळी एक साधारण मेकॅनिक म्हणून काम करत होते, आज एक मोठे व्यापारी आहेत.

नेरीयापरंबिल हा माणूस मोठी स्वप्न पाहणारा होता. ज्यांनी वयाच्या 11 व्या वर्षीत्यांच्या गावात कापसाच्या बिया आणि चिंचेच्या भुसीने डिंक बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. १९७६ मध्ये मध्ये शारजहानला पोहोचल्यानंतर त्यांना समजले, की या गरम वाळवंट शहरात वातानुकूलन व्यवसाय करणे खूप फायदेशीर आहे. म्हणून त्यांनी जिओ ग्रुप ऑफ़ कम्पनीज ची स्थापना केली, जो आजच्या काळात त्यांचा मुख्य व्यवसाय आहे.

आता एक व्यावसायिक थेट बुर्ज खलिफा मध्ये फ़्लैट घ्यायला कसा गेला हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर नेरीयापारंबिल यांचा हा फ्लैट खरेदीचा प्रवास चक्क एका विनोदाद्वारे सुरु झाला होता. वर्ष 2010 मध्ये, नेरियापरंबिल आपल्या मित्रासह बुर्ज खलिफा पाहण्यासाठी गेले असता, त्यावेळी त्याचा मित्र म्हणाला की इथे राहण्याचे स्वप्न पाहू नका, इथे
राहण्यापासून दूरच, बुर्ज खलिफा मध्ये तर प्रवेश करण्यासाठी देखील पैसे लागतात.

या मित्राचे बोलने मनाला लागले आणि त्याच वर्षी नैरीयापारंबिल यांनी बुर्ज खलिफात एक फ्लॅट भाड्याने घेउन तिथे राहू
लागले. मग काय, हा भाड्याच्या फ्लॅटपासून सुरू झालेला प्रवास आज 22 फ्लॅटचे मालक बनण्यापर्यंत
पोहोचला आहे.

नेरियापरंबिल अजूनही म्हणतात की,जर मला चांगला सौदा मिळाला तर मी आणखी फ्लॅट खरेदी करेन कारण मी एक स्वप्न पाहणारा आहे आणि मी स्वप्न पाहणे कधीही थांबवणार नाही.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here