आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम| युट्यूब

==

लोक पास होऊन विक्रम करायचं ठरवतात या महिलेनं मात्र नापास होण्याचा विक्रम रचलाय…!


जगभरात अनेक प्रकारचे रेकोर्ड होल्डर्स आहेत. हल्ली तर अगदी लहानातल्या लहान मुलं देखील कुठले कुठले रेकॉर्ड्स आपल्या नावे करत असतात. यांपैकी परीक्षेत सर्वाधिक मार्क्स मिळवल्याचा विक्रम, सर्वाधिक वेळा अमुक अमुक स्पर्धा जिंकल्याचा विक्रम, एखादी परीक्षा सर्वाधिक वेळा पास झाल्याचा विक्रम असे बरेच जागतिक विक्रम कोणी ना कोणी आपल्या नावे करतच असतो.

पण आज आम्ही तुम्हाला ज्य महिलेबद्दल सांगणार आहोत तिनेही विक्रमच बनवलाय पण तो नापास होण्यामध्ये.

हो! कोणत्याही परीक्षेत नापास झाल्यावर, तुम्ही ती परीक्षा किती वेळा परत देऊ शकता? एकदा, दहा वेळा, शंभर वेळा किंवा अगदी हजार वेळा? मित्रांनो तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, हो ना? पण आज आम्ही तुम्हाला एका अशा स्त्रीबद्दल सांगणार आहोत जिने परीक्षा देण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्याआहेत, जो एक विश्वविक्रम देखील ठरला आहे.

तर असे आहे की ही महिला रहाते दक्षिण कोरियामध्ये आणि या महिलेचे नाव चा सा-सून आहे. या महिलेने 2009 मध्ये ड्रायव्हिंगची लेखी परीक्षा दिली आणि ती उत्तीर्णही झाली. तिच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा दिवस होता.

नापास

आणि का नसावा? मित्रांनो, या महिलेने 2005 मध्ये तिच्या 10 व्या प्रयत्नात ड्रायव्हिंग टेस्ट कशी तरी उत्तीर्ण केली होती, परंतु ती लेखी परीक्षेत नापास झाली होती. लेखी परीक्षेत अयशस्वी होऊनही ती दुसऱ्या दिवशी पुन्हा लेखी परीक्षा देण्यासाठी आली, पण यावेळी ती पुन्हा नापास झाली. अशा प्रकारे ती दररोज परीक्षा द्यायला यायची आणि ती दररोज नापास व्हायची.

आता प्रश्न आहे की अशाप्रकारे दररोज येउन परीक्षा देणे आणि नापास होने यात कही खर्च तिल आला असेल का? तर या परीक्षांमध्ये तीने एकूण अडीच लाख रुपये खर्च केले. शेवटी सा–सुन ला तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ मिळाले. कारण यावेळी ती तिच्या 771 व्या परीक्षेत उत्तीर्ण झाली. आता याला मेहनत म्हणा किंवा मूर्खपणा म्हणा, पण आता सा-सुनचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदले गेले आहे, जो एक अनोखा विश्वविक्रम आहे.

68 वर्षीय या महिलेला स्वतःची कार घ्यायची होती. कारण ती घरोघरी जाऊन अन्न आणि घरगुती गरजेच्या वस्तू विकत होती. कार घेतल्यास तिचा व्यवसाय वाढू शकला असता. इतक्या वेळा अपयशी होऊनही, सा-सुन ला हे सांगायचे होते, की माझा विश्वास आहे की तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहिलात तर तुम्ही ते साध्य करू शकता ती म्हणते. म्हणून माझ्यासारखे तुमच स्वप्न सोडू नका. बळकट व्हा आणि आपले सर्वोत्तम परीने प्रयत्न करा.

==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक|इंस्टाग्राम| Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हेही वाचा..

भगवान शंकरांचे हे प्रसिद्ध मंदिर जवळ-जवळ ४०० वर्ष बर्फाखाली गाढलेले होते..!

भारतीय सेना अधिकारी सांगून केली तब्बल 17 मुलींची फसवणूक….घातला 80 करोड रुपयांना गं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here