आमचे सर्व लेख व व्हिडिओ मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक|इंस्टाग्राम

===

जगातील सर्वांत लहान माकड होण्याचा मान पिग्मी मार्मोसेटला जातो..!


माकडांच्या अनेक प्रजाती आहेत. आपण ही माकडे सहसा कुठेतरी प्रवास करताना किंवा कोणत्याही मदारी खेळाच्या दरम्यान पाहतो. पण आज आम्ही तुम्हाला पिग्मी मार्मोसेट माकडाबद्दल सांगणार आहोत, हे माकड सामान्य माकडासारखे अजिबात नाहीत. याची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या माकडाचा आकार बटाटा आणि कांद्यापेक्षाही कमी आहे.

जगातील निवडक ठिकाणी सापडणारी ही माकड मोठ्या मुश्किलीने पाहायला मिळतात. ही प्रजाती अटलांटिक, ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, इक्वाडोर आणि कोलंबियाच्या अमेझॉन प्रदेशात आढळते.

new google

या माकडाच्या डोक्याची लांबी ११७ ते १५२ मिमी म्हणजेच ४.६ ते ६.० इंच आणि याच्या शेपटीची लांबी १७२ मिमी ते २२९ मिमी म्हणजेच ६.८ ते ९.० इंच आहे. त्यांच्या सरासरी प्रौढ शरीराचे वजन फक्त १०० ग्रॅम पर्यंत असते.
ते इतके लहान आहेत की ते एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर आरामात बसू शकतात.

पिग्मी मार्मोसेट

मार्मोसेट्स त्यांचे डोके १८० अंशांपर्यंत फिरवू शकतात. त्यांच्या लहान पंजाच्या तीक्ष्ण नखांमुळे त्यांची फांद्यांवर मजबूत पकड असते. एका फांदी ते दुसऱ्या फांदीच्या दरम्यान ते ५ मीटर पर्यंत म्हणजेच १६ फूट पर्यंतची उडी मारू शकतात.

आकाराने लहान असल्याने, जंगलांमध्ये, त्यांना साप, घारसारख्या शत्रूंपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी वनस्पतींचा आधार घ्यावा लागतो. त्याच्या लहान आकारामुळे, पिग्मी मार्मोसेटचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लहान माकड नावाने समाविष्ट केले गेले आहे.

नवीन जन्मलेल्या पिग्मी मार्मोसेटची लांबी साधारणपणे फक्त १३० ते १५० मिमी म्हणजेच ५-६ इंच असते. त्यांचे आयुष्य १५ ते २० वर्षे असते. जंगलांमध्ये त्यांचे आयुष्य आणखी कमी होते, ज्याचे कारण ते सतत झाडांवरून पडतात असे मानले जाते.

लोकांना हे माकड घरात पाळता यावे म्हणून खरेदी करण्यासाठी $ १००० ते $ ४००० पर्यंत खर्च करावा लागतो. त्यांचे शरीर जरी लहान असले तरी ही माकडे भयंकर रागीष्ट आहेत. अनेक वेळा रागाच्या भरात ते आपल्या मालकाला चावायला ही मागे हटत नाही.

===

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.com | All Rights Reserved.

हे पण वाचा..

मुलांनी म्हातारपणी वाऱ्यावर सोडलेल्या या वयस्कर जोडप्याला सोशल मिडीयाने तारलय…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here